मानवतेचे ऊर्जास्त्रोत्र
मानवतेचे ऊर्जास्त्रोत्र
आपण सर्व मानव आहोत संगणक नाही प्रत्येक क्षणी जीवनाचा आनंद घ्या. प्रत्येक क्षणी जीवनाचा आनंद घ्या "नयनं नीति नीतेरिमानि मूल्यानि नैतिक मुल्याणी" अर्थात योग्यप्रकारे आचरण, व्यवहार करणे योग्य रस्त्यावर चालणे म्हणजेच नीती मूल्य!! योग्य आचरण व व्यवहार मार्गावर चालणारी व्यक्तीच नीतीतत्व मानून जीवन व्यतीत करत असते. या तत्त्वाने संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या रतन नवल टाटा याविषयी लिहिणे हेच परमआंनदाचे कार्य आहे.ज्या दिवशी रतन टाटा देशाचे पंतप्रधान होतील त्या दिवशी भारताला सोनेरी दिवस येतील हे म्हणणे अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही असे दैदिप्यमान कर्तुत्व असलेल्या रतन टाटा यांचा माणूस म्हणून तळागाळातील लोकांना परिचय आहे. मग ते मुंबई येथील ताज महल हॉटेल वरील अतिरेकी हल्ला असो वा करोनासारखी महामारी असो अथवा कॅन्सर सारख्या भयानक रोग आजाराची लढण्यास लढण्यास उपयुक्त ठरलेले कॅन्सर हॉस्पिटल असोत मानव सेवेत उदयोग जगतातील रतन टाटा हे नाव अग्रस्थानी आहे .
26 नोव्हेंबर 2008 संपूर्ण देशाला दुःखद अशी घटना मुंबई येथ टाटा समूहाचे हॉटेल असलेल्या ताज हॉटेल वर अतिरेक्यांनी केलेला हल्ला या हल्ल्यात हजारो लोक मरणं पावले .यामध्ये टाटा समूहांचे हॉटेलमधील कर्मचारीही समावेश होता त्यात मरण पावलेल्या व जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची लाईफ टाईम सुविधा केली. कर्मचाऱ्यांची कर्जे माफ केली. कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू केली . इतकेच काय तर हॉटेल परिसरातील टपरीवले छोटे व्यवसायिक यांची उद्ध्वस्त झालेली दुकाने नव्याने व भरून दिली .हॉटेलची संबंधित नसलेल्या परंतु हल्ल्याचा बळी ठरलेला परिसरातील प्रत्येक व्यक्ती ज्याला हल्ल्याची झळ पोहोचले आहे मग ते पोलिस असो वा कर्मचारी असो वा होटेलात चेकआऊट केलेला पर्यटक असो प्रत्येकाला टाटा समुहाने नव्याने उभारण्यासाठी मदत दिली. हॉटेलात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना लाईफ टाईम शिक्षणाची सोय केली. अंत्यसंस्कारास जातीने उपस्थित राहून प्रत्येकाच्या घरी वैयक्तिक भेटी देऊन मी अजून आपणासाठी काय करू शकतो हे म्हणणारा व्यवसायिक यश प्राप्त केलेला व्यवसायिक मानवतेचे सुंदर अप्रतिम अद्वितीय उदाहरण आहे. मानवते विषयी हळवे असलेले टाटा तितकेच मिश्कील आहेत हे आपल्याला समजते जेव्हा विमानात प्रवास करताना प्रवास करताना चुकीने कपड्यांवर हवाई सुंदरी कडून फळांचा रस सांडला असता, तिचा शतदा माफी मागणारा, हळवा ,केविलवाणा, चेहरा पाहून पुढच्या वेळी माझ्या कपड्यांवर विस्की आणि सोडा पडू देत असे सांगणारे रतनजी टाटा आपल्या मनाला भावून जातात.
उतार-चढाव येणारच जे आपल्याला पुढे जायला मदत करतात.याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा समुह आहे.
टाटा समूहाचे रतन टाटा अशा समुहाचे सर्वेसर्वा आहेत कंपनीचे मिठापासून सॉफ्टवेअर व अणुचाचणी पर्यंत देशाला जगात सर्वोत्कृष्ट बनविण्यात अग्रस्थानी आहे.रतन टाटा यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले तरीही हार न मानता टाटा समूहाला त्यांनी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले
(1) लवकर जाण्याची घाई न करता त्यांना सोबत घेऊन जायला हवे घेऊन हवे दूरवर जायला हवे म्हणणारे टाटा आज या मुक्कामाला येऊन पोहोचले
(2) त्यांच्या योग्य निर्णय काही लोक दु:खी हि झाले असतील परंतु योग्य गोष्ट करण्यासाठी कोणतीही तडजोड करता कामा नये असे ते नेहमी म्हणतात (
3)परिणाम साधायचा असतील तर आपल्याला आपल्या कामाची पद्धत सुधारायला हवे त्यांच्या यशाचे रहस्य आहे
भारताचे पहिले उद्योगपती भारतरत्न जमशेदजी टाटा यांचे नातू असलेले रतन टाटा हे भारतातील टाटा ग्रुप कंपनी या सर्वात मोठ्या भारतीय संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. टाटा स्टील, टाटा मीसर. टाटा पावर .टाटा कन्सल्टन्सी .टाटा हॉटेल्स .टाटा टेलिसर्व्हिसेस. यासारख्या शेकडो कंपन्यांचे मालक व टाटा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष असलेले रतन टाटा यांची राहणी अतिशय साधी आहे .
1962 ला कंपनीच्या परंपरेनुसार स्टील विभागातून आपली आपल्या कारकीर्दीत त्यांनी सुरुवात केली
1962 ते 70 या कालावधीत त्यांनी स्टील विभागात काम केले
1971 ला राष्ट्रीय रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स नेल्कोचे ते प्रभारी संचालक होते नेल्को चे शेअर दोन टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर नेले कालावधीतच नको बंद पडली तरीही हार न मानता
1977 मध्ये एम्प्रेस मिल ची जबाबदारी घेतली
1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीचे ते अध्यक्ष झाले व त्यानंतर 1991साली जेआरडी टाटांनी टाटा यांना टाटा समूहाचे चेअरमन म्हणून नियुक्त केले
उत्तुंग आकाशात घेतलेल्या गगन झेपेला आणखी एका नव्या पंखांचे बळ मिळाले .
मानवी विकासासह भारतीयांचे जीवनमान वाढवणे हे आपल्या जीवनाचे लक्ष ठेवून त्यांनी 2000 मध्ये छोट्या कुटुंबासाठी नॅनो कार बाजारात आणली कालांतराने इंडिगो प्रमाणे हा प्रयोग निकाली काढावा लागला .तरीही टाटा कंपनी आपले क्षेत्र विस्तारत राहीली.रतन टाटांनी 21वर्षात कार महसूल 40% चाळीस टक्क्यांनी व नफा पन्नास टक्क्यांनी वाढवत नेला. टाटा कंपनीच्या 100 पेक्षा जास्त कंपन्या 150 देशात विखुरलेल्या सक्रिय आहेत आणि त्यात सात लाखांहून अधिक कर्मचारी सेवेत रुजू आहेत संपूर्ण समूहाचा बाप माणूस म्हणून रतन टाटा यांच्याकडे पाहिले जाते.
आपल्याला जे काम आवडते ते केलेच पाहिजे आणि वेळेत केले पाहिजे असे म्हणताना, कोणतेही काम छोटे किंवा मोठे न मानता प्रमाणिकपणे करत राहिले पाहिजे असे टाटा मानतात खरंतर आपण देशाच्या प्रगतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून योगदान देऊ शकतो जसे की पाण्याचा अपव्यय न करणे विजेचा अवाजवी वापर टाळून अथवा लागेल तेवढेच पानात वाढून घेणे या अगदी छोट्या गोष्टी आहेत परंतु देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत आपला देश बनायला मजबूत बनवायला लहान लहान गोष्टीही मदत करतात . खराब सवयी गांभीर्याने घ्यायला हव्यात व त्यावर त्यावर चिंतन करायला हवे. यशस्वी लोकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे जर तो यशस्वी होऊ शकतो तर मी का नाही? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा !आपल्या सगळ्यांकडेच समान योग्यता नसली तरीही प्रतिमा विकसित करण्याचा समान संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक वेळी आपला निर्णय योग्य असेलच असं नाही परंतु निर्णय योग्य ठरवता आला पाहिजे. मेहेनत सारेच करतात परंतु काहीच लोक यशस्वी होतात म्हणून यशस्वी लोकांप्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न करायला हवा . अशा विचारांची देणगी देणारा यशस्वी उद्योजक, नैतिक मूल्य नीतिमत्ता यांचे जिवंत उदाहरण व उत्तुंग मानवता जातीच्या प्रति असलेली दयाळू वृत्ती देशाप्रती असलेला त्याग दिसुन येतो जेव्हा आपल्या नफयातला 66 टक्के भाग चारीटेबल ट्रस्ट व गरिबांना दान म्हणूमुन देतात. जगातला सर्वात श्रीमंत उद्योजक यादीत असलेला श्रीमंत मनाचा माणूस म्हणजे रतन टाटा होय सन 2000 मध्ये पद्मभूषण. व सन 2008 पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रतन टाटा स्वतःच समस्त मानवजातीसाठी सन्मान आहे. नैतिकता आदर स्नेहभाव मानवता या शब्दांना ज्या व्यक्तींमुळे वजन प्राप्त होते त्यापैकी एक आहेत रतन रतन नवल टाटा होय.
त्यांना आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनस्वी प्रार्थना.
