STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Thriller

2  

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Thriller

माणूस - आभास एक मानव..

माणूस - आभास एक मानव..

2 mins
133

आजही आठवते या गुहेमध्ये रहात होते सूर्यप्रकाश येताच बाहेर निघत दोनं वाघ जोडीने अंगावर पक्षी जणू सारी जातकुळी एकत्र रहात कंदमुळे खाणे व जमा करणे नाल्याचे पाणी पिणे व झाडावर डुलकी घेणे. अडीअडचणीत असलेल्या प्राणी यांना मदत करणे यामुळे जंगली प्राण्यांना आपलपण वाटे भिती 'डर' अंधार. उजेड हे शब्दच माहिती नव्हते. वाघाच्या पाठीवर डोके ठेवून झोपत असत. ससा पाय चाटीत हरिण पायाजवळ तर पक्षी झाडावर थांबत त्याचा सहवास हेच जीवन असे या सजीव सृष्टीला वाटे. माणसाप्रमाणे शरिर मात्र सारे गुण निसर्गाची भाषा हावभाव सर्व प्राण्यांच्या भाषा त्याला कळत. त्याला दिलेली हाक. मदतीची हाक ' केवळ आवाजाच्या संकेता वरून कळत. कधी गाळात फसलेला हत्ती काढणे तर कधी जाळीत अडकलेला सिंह कपारीतील माकड तर कधी मगरीलने गिळलेल हिरण सोडवणे व तीला मेलेले प्राणी देणे यामुळे वैर' राग !सुड हे शब्दच त्यांच्या भाषेत नव्हते .


मात्र एक दिवस माणूस नावाचा शत्रू त्याच्या जीवनात आला आणि सारेच होते नव्हते झाले एक एक गुण मानवाचा शिकला तसा एकएक प्राण्यापासून दुरावला सारी शक्ती हरवून बसला झाडावर चढणे. डोंगरकडयावर चढणे बंद झाले. फक्त पडलेली शिळी फळे खावू लागला. ताजी फळे तोडू शकत नव्हता असा दुर्मिळ पूर्णपणे तो मानव झाला निसर्ग- मानव यात दरी वाढली व तो जगण्याचा आटापिटा करू लागला त्यासाठी केलेला प्रयत्न त्याला शोध वाटू लागला. पोटाची खळगी भरण्यासाठी झटू लागला. त्यात इतका दूर गेला की निसर्ग म्हणजे काय मी त्याचा घटक होतो आहे हे विसरला. शेवटी जगण्याची धडपड हेच त्याला जीवन, आयुष्य समजुन मेल्याहून मेल्यागत जीवन जगत निसर्गात मुक्तपणे मिळणाऱ्या गोष्टीसाठी पैसे नावाचे कागद घेवून भीक मागत फिरत आहे. सूक्ष्मातील सूक्ष्म जीवापासून ही स्वतःला वाचवू शकत नाही 300 किमीवर क्षेपणास्त्र शोधणारा स्वतःच्या नाकातून जाणारा सूक्ष्मजीव नाही मारू शकत. स्वतःला बुद्धिमान समजणारा बुद्धिहीन प्राण्यापासूनसुद्धा वाचवू शकत नाही.


जिवंतपणी सर्व प्राणीमात्रांना प्रिय आज जिवंतपणी कोणतेही प्राणी जवळ येत नाही. चंद्रावर उडया मारणाऱ्यावर उंदिर उड्या मारत आहे. मला आजही प्रश्न पडतो तो याच गुहेत माझेबरोबर असणारा खरेच मानवजातकुळीत जन्माला आलेला. याला "मानव' माणूस" की अणखी काय शब्द तुम्हीच शोधा व या मृत्यूशय्येवर पडलेल्या प्राण्याला तुम्हीच मुक्ती व ज्ञान त्याचेच भाषेत दयाल की बाबा निर्सग हाच गुरू. निर्सग हाच देव, हेच जीवन आणि तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस कोटी जीवमात्र. सांगा माझ्या या मित्राला कारण माझे अस्तित्व संपलेले आहे फक्त आठवणी या गुहेत शिल्लक आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama