Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

माझ्या गावचे वैशिष्ट्य

माझ्या गावचे वैशिष्ट्य

2 mins
876


मी गोव्याची. या माझ्या मातृभूमीबद्दल मला खूप अभिमान आहे. ह्या लहान राज्याची किर्ती मात्र महान आहे. पणजी ते फोंडामध्ये एक लहानसा गाव लागतो. त्याचे नाव कुंडई. गाव हमरस्त्यावर लहान वाटतो पण आत बराच पसरलेला आहे. या गावात वेगवेगळे वाडे आहेत. त्यातला एक वाडा मानस वाडा. तेच माझे जन्मस्थळ.


मानस म्हणजे मासे पकडण्याची खाडी असलेली जागा. गोव्यात ताज्या माशाकरता प्रसिद्ध असलेली ही मानस कोळंबी करता जास्त प्रख्यात. कोकणी भाषेत 'मानसेची सुंगटां' तसेच शेवटो (स्टेट फिश ऑफ गोवा) शेवटाळे, (बोईट) खेकडे यांचा माळा करून हमरस्त्यावर येणारे जाणारे गाडीवाले ते खरेदी करतात.

आणखी एका मोठ्या गोष्टीकरता माझा गाव प्रख्यात आहे तो म्हणजे औद्योगिक वसाहतीसाठी. इंडस्ट्रीयल इस्टेट ऑफ कुडाईम, गोवा. औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या प्रकारची औषधे व अनेक प्रकारचे कारखाने आहोत. ही वसाहत निर्माण करण्याकरता आमच्या व अशा अनेकांचा काजू, आंब्यांच्या बागायती घालवल्या. ही माझ्या लहानपणीची गोष्ट. तेव्हा आमच्या बागा गेल्या म्हणून खूप वाईट वाटले होते. लहान असल्याने पैसे वगैरे मिळाले हे काही आम्हा मुलांना माहीत नव्हते. सध्या त्या वसाहतीत मोठमोठ्या औषधाच्या कंपन्या व अजूनही वेगळ्या भरपूर कंपन्यांनी तेथे जम बसवलेला आहे. आता इंडस्ट्रीयल इस्टेट ऑफ कुडाईमचा प्रसार व ख्याती पाहून माझ्या गावाचा मला खूप अभिमान वाटतो.


गावात वाडे व त्या वाड्यात मोठ मोठाली कौलारू घरे आहेत. प्रत्येक घरासमोर फुलबाग असते. त्या फुलबागेत नाना तऱ्हेची फुले. जशी जाई, जुई, मोगरा, शेवंती आणि अनेक प्रकारची फुले असतात. सकाळ-संध्याकाळी फुले उमलतात व त्यांचा दरवळ चौफेर पसरलेला असतो. तेव्हा गावात फेरफटका मारायला खूप मस्त वाटतं.


त्याचप्रमाणे माझ्या गावी कोकणचा मेवा खूप असतो. तो म्हणजे आंबे, फणस व त्यामुळे आंबापोळी, फणसपोळी उन्हाळ्यात खूप मिळते. कच्ची कोकम व त्यापासून बनवलेले कोकम सरबत वाह! मस्तमस्त लिहितांनासुद्धा तोंडाला पाणी सुटले. गावात कोकम, तिफळ, सुखे मासे भरपूर मिळतात व ते वर्षभरासाठी साठवण करून ठेवतात.


बरेचजण मुंबई अशा ठिकाणी राहत असले तरी वर्षातून एक-दोन वेळा गावी जाऊन येत असतात व त्याचमुळे तिथली मोठाली घरे घरपण टिकवून आहेत. कधी गोव्याला गेलात तर जरूर माझ्या गावाला भेटा व आनंद व मेवा लुटून या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational