माझं मत
माझं मत
परमेश्वराने इथं प्रत्येकाला काही कारणास्तव पाठवलेलं असतं, हे फार थोड्या जणानाच कळतं.. त्यातील च असा एक मुलगा जो दिसायला अतिशय काळाकुट्ट, निग्रो होताच तो..एकदम हडकूळा असा ज्याचं डोकं थोडस शरीरापेक्षा मोठं ,त्याच्या हाताची बोटे मात्र अतिशय लांबसडक आणि मी तर म्हणेन साक्षात धन्वंतरी ने त्याच्या बोटांना स्पर्श केला होता त्यामुळं झाडांना झालेल्या रोगातून ते झाडांना बरे करायचे! खरंच, एक निग्रो मुलगा ज्याला आई बाप नसतात,एका कुटुंबाने संभाळलेलं हे पोरं ज्याला लहानपणी साधे व्यवस्थित उच्चार करता येत नव्हते ,ते पोरं भविष्यात क्षितिजास गवसणी घालेल असं कुणालाही वाटलं नव्हतं,पण म्हणतात ना कमळ चिखलात उगवतं, अगदी तसच झालं...आईबापाच्या प्रेमास लहानपणीच पोरका झाला खरंतर तिथूनच त्याच्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली..अस म्हणतात ना निसर्ग माणसाला पोसतो, व परिस्तिथी सर्व काही शिकवते अगदी हे खरंय कार्व्हर ह्यांच्या बाबतीत...हलख्याच्या परिस्थिती ला सामोरं जाऊन आज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या तोंडात आदरपूर्वक हे नाव घेतलं जातं हेच त्यांच्या कष्टाचं चीज आहे ,हो ना....?
