माझं मत काही का नाही विचारत ?
माझं मत काही का नाही विचारत ?
प्रिया आज खुप आनंदात होती. तिलाप्रमोशन मिळाल होत... ऑफीस स्टाफने तिचअभिनंदन केल, मैत्रिण तर खुपच खुश झाली.सगळे तिच्या कामाच नेहमीच कौतुक करत.तिने आईबाबांना ही बातमी दिली त्यांनाहीखुप आनंद झाला... आपल्या लेकीने जे काहीयश मिळवलय त्याच त्यांना नेहमी अभिमानवाटायचा... प्रिया... एका बँकेत नोकरी करतहोती. ती दिसायला गोरीपान, सुंदर, सुशिक्षित,स्मार्ट आणि तिच्या कामात परफेक्ट होती.ती एवढी हुशार होती, पण त्याचा तिला गर्वनव्हता. गावात तिला सगळे ओळखायचे,आदर करायचे. एवढ असुनही ती साधीराहायची. तिला तसच आवडायच पण तरीहीकुणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच ती होती.तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती,म्हणुन ती स्वतःसाठी फार कमी पैसे खर्च करायची. त्यांच छोट आणि सुखी कुटुंब होत.देवाने जे काही दिलय ना त्यातच ती खुप खुश होती.
प्रियाच आता वय चोविस सूरू होत. त्यामुळेघरात तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सूरू झालहोत. तिचे आई बाबा लग्नसमारंभ कींवाइतर कुठल्याही कार्यक्रमाला गेले की नातेवाईक प्रियासाठी स्थळ सुचवायचे, बरते चांगले तिच्या योग्य शोधायचे ना तर कसेपण विचार न करता सूचवायचे या अश्याअघाऊ नातेवाईकांचा प्रियाला ना रागच येऊलागला. लग्नावरून कुणी आईबाबांना बोललकी तिला वाईट वाटायच. पण आईबाबांपेक्षाजास्त काळजी आणि घाई नातेवाईकांनाचझाली होती. " लग्न म्हणजे खेळ वाटलाका यांना ? एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो.हे कळत कस नाही या लोकांना याच तिलावाईट वाटायच... पण काय करणार प्रियाज्या खेड्या गावात राहत होती. तिथे मुलींचीलग्न जमताना त्या मुलीला न विचारता घरच्यांची त्या स्थळाला पसंती असली कीत्या मुलीच्या होकाराला कींवा मताला किंमत देत नसत. तिही अश्याच खेडेगावात राहणारी.प्रियाचही लग्नाच वय झाल होत, प्रत्येक मुलीचभावी जोडीदाराबद्दल मनात एक चित्र कोरलेलअसत. काही थोड्या फार अपेक्षा असतात.तिचे नातेवाईक मंडळी बरिचशी जुन्या विचारांची होती. आपण खेडेगावात राहत, आणि आपण चार पावसाळे जास्त पाहीलेत त्यामुळे आपण लग्न ठरवून टाकायच मुलगी काही आपल्यापुढे जात नाही.
प्रिया आईबाबासोबत एकाजवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती.तिथे पवार बाईंनी ही मुलगी कोण? अस सविताला विचारल... सविताने प्रिया माझ्या नणंदेचीमुलगी आहे. सगळी माहीती सांगीतली. तरत्या पवार बाईंना त्यांच्या नीरजसाठी प्रियाहीच मुलगी छान आणि सुंदर आहे, बाकी तरसविता. ही प्रियाची मामी.ने सांगितलच होत सगळ, त्यांनी फोटोहीदेऊन टाकला. त्या बाईंनी ही नीरजबद्दलसगळ सांगितल. तो गव्हमेंट सर्व्हीसला आहे.चांगला पगार, बंगला, गाडी आणि शेतीहीआहे. तर विचार करून सांगा... त्या मुलीच्याघरच्यांशी बोलण करून द्या म्हटल्यावर यांनीमीही घरचीच आहे. ते होच म्हणतील मी ऊद्याचतुम्हांला फोन करून कळवते. पवार बाईंचाआनंद गगनात मावत नव्हता. मग सवितालापवार बाई जवळच्याच नात्यातल्या होत्या. त्यांना हे लग्न जुळाव अस वाटत होत.
प्रियाच्या मामीने घरी आल्या दुसर्या दिवशीसगळ तिच्या आईबाबांना स्थळाविषयी सांगीतल.मुलाला गर्व्हमेंट सर्व्हीस, बंगला, गाडी आणिशेतीही आहे, फॅमिली आणि माणसेही चांगलीआहेत आणि मी त्या मुलाची आईही आमच्यानात्यातील आहेत. त्यामुळे तुम्ही जर प्रियासाठीया स्थळाचा विचार केला तर आपली प्रियाअगदी सुखात राहील... पोरीच कल्याण होईल.आणि हो बघा ना ते एवढे शहरातले पणत्यांनी प्रियाला पसंद केल. आपण तरी कुठे एवढे मोठे आहोत. मामींच बोलण ऐकल्यावरतिच्या आईवडीलांनी प्रियासाठी हे स्थळबघायच ठरवल. या तिघांच बोलण झाल. तेव्हाप्रिया घरी नव्हती. प्रियाच्या बाबांनाच मामींनी" मुलाकडच्यांना कधी बोलवायच म्हटल्यावरत्यांनी रविवार ठरवून टाकला."
सविताला खूप आनंद झाला. त्यांनी पवार बाईंना रविवारी बोलवलय तुम्हांला मुलीच्या घरी म्हटल्यावर तिला खूप आनंद झाला. प्रिया ऑफीसमधुन घरी आली तिला आईबाबांनी ही गोड बातमीदिली. त्यांनी मुलाविषयी आणि स्थळाविषयीतिला सगळ सांगितल. "त्या मुलाच्या आईने तुला लग्नात पसंत केलय, आणि तुझा फोटोआम्ही पाठवलाय... त्यांना आवडली आहेस तुआणि ते रविवारी तुला बघायला येणार आहेत.अस सांगितल. प्रियाही आईबाबांना मुलगायोग्य वाटला तर ती काहिच म्हटली नाही.सगळ अस अचानक घडत होत. त्यांनी सगळठरवून टाकल होत... आणि प्रियाला जरामनाला वाईट वाटल.... तिने बाबांनाच विचारल." बाबा, तुम्ही सगळ ठरवून मोकळे झालातपण लग्न मला करायच तर निदान तुला तोमुलगा पसंद आहे का ? अस आहे. हे साधविचारावही नाही वाटल का ? " अग प्रिया, विचारण्यासारख काय आहे त्यातअग मामींनीच हे स्थळ सगळ बघुन ठरवलआहे. आणि चांगले श्रीमंत लोक आहेत, मुलगाही सरकारी नोकरी आहे ग, सगळ तुझ छानचहोईल बघ... " म्हणून आम्हीही हो म्हणूनच सांगितलं ना..."
प्रियाला काहीच समजत नव्हत. पण तिच्या अपेक्षा फार नव्हत्या. पण तिला घरी तिच्या अपेक्षा काय आहेत हे विचारलच नाही. ती शिकलेली होती. म्हणूनबोलत असे, पण बाकीच्या मुली घरच्यांच्यापुढे बोलत नसत. रविवारी तो मुलगा नीरज नाव त्याच, त्याच्याफॅमिलीतील लोकांसमवेत आला होता. तिचाबघण्याचा कार्यक्रम पार पाडला. नीरजला प्रिया आवडली होती. घरातील लोक चांगलीआहेत, सगळ काही छान आहे, नाव ठेवण्यासारख काहीच नाही आणि नीरजही चांगलाआहे. " नीरजला तु पसंद आहे. " अस तिच्याआईने सांगितल. सगळ छान होईल बघपण तिला तुला " निरज पसंद आहे का ?हे विचारलच नाही " तिला रागच आला...बाकीच मोठी माणस चार पावसाळे जास्तपाहीली आहेत म्हणून ठरवू शकतात. पणआयुष्य मला काढायच आहे त्याच्यासोबतमग यांनी एक शब्द तरी विचारायला नको...सगळ्यांनी मुलगा नात्यातील आहे त्याची फारचौकशी नाही केली कारण सविता मध्यस्थी होत्या. त्यांनी होकार दिला होता. हे सगळ असअचानक घडत होत. प्रियाला काहीच कळतनव्हत... तिनेच बाबांना म्हटल..." माझ्या मताला काही किंमत आहे की नाही ?"लग्न मी करत आहे तर तुम्ही मला मुलगा कसा वाटला, पसंद आहे का विचारल सुध्दा नाही.... "
आईवडिलांनी तिलाच समजावुनसांगितल. प्रियाही फार काही न बोलता तयारझाली. पण निरज अजूनही तिच्याशी बोललानव्हता. घरचे सगळे खुपच आनंदात होते.प्रियासाठी चांगल आणि श्रीमंत स्थळ मिळाल होतं... दोन दिवसांनी प्रियाची आत्या सहज म्हणुनभेटायला आलेली. तिलाही प्रियाच लग्न ठरल.हे ऐकुण आनंद झाला... पण जेव्हा आईबाबांनीतिला मुलाविषयी, त्या स्थळाविषयी सगळसांगितल तेव्हा तिचा चेहराच उतरला. तिने सांगितलं की सगळ ठीक आहे. सर्व काही आहेत्यांच्याजवळ, पण तो मुलगा व्यसनी आहे.कुणीही मुलगी देत नाही त्याला. मी त्यांनाओळखते. मग मात्र प्रियाच्या आईने सुमतीलाखुप बोलल्या... " तुम्हांला प्रियाला अरूणसाठीहवी होती तुमची सुन म्हणून, आता तिला चांगला सरकारी नोकरी वाला भेटला, शिवायसगळ काही आहे ना म्हणून तु काही सांगत आहात.... माझ्या वहीणींंच्या नात्यातल हे स्थळ आहे. "
सगळं चांगलं होईल माझ्या प्रियाचं... अस तिची आईने म्हणतात, सुमतीनेउत्तर दिल की " प्रिया माझी भाची असली तरी माझ्या मुलीसारखी आहे ती मला आणितिच वाईट व्हाव अस मला तरी कस वाटेल,जे मला माहीत आहे तेच मी तुमच्या कानांवरघातल... तुम्ही बघा काय करायच ते... "अजून थोडीच वेळ गेली आहे, पैशापायीमुलीच आयुष्य उध्वस्त करू नका... " त्यांनानाही म्हणून सांगा.... सुमतीला तिच भुतकाळआठवला... " दादा, जे माझ्याबाबतीत झालते प्रियाच्या सोबत नको व्हायला... तु परत तीच चुक करू पाहत आहे. माझा नवरा व्यसनीआहे हे तुमच्या कानी आल होत पण तुम्हीसर्वांनी दुर्लक्ष करून, तो सुधारेल म्हणून माझलग्न लावून दिल, तसाच मी संसार केला.मी काय दुःख सोसल, आयुष्यभर सहन केलपण माझ नशिब की मुलगा चांगला शिकला निनोकरीला लागला... " प्रियाच्या बाबांनी उलट तिच्या आत्यालाचसगळ समजावुन सांगितल. " हे स्थळ खरंच चांगलं आहे. आणि हो तू म्हणतेस तसं थोडंफार पित असेल तर ऊद्या लग्न झाल्यावर बायकोआल्यावर सोडेन तो... आणि आपली प्रियात्याला सुधरावेल... सुमती मात्र तिच्या दादाच्याअश्या बोलण्यावर खुप चिडली..." दादा, अरे अस काय बोलतो आहेस तु ?तो मुलगा खरच खुप व्यसनी आहे तुम्ही आधीविचाराना कूणालाही मग ठरवा हवतर..."कधीतरी पिण वेगळ आणि रोज दारू पिउन येण यात फरक आहे... आणि काय रे तु म्हणतोकी तो सुधारेल..." तो मुलगा तीस वर्षात त्याच्या आईच्या हाताखाली नाही सुधारू शकला, आणि लग्न झाल्यावरकसा लगेच सुधारेल... ? असे त्याला जरसुधारण्यात वेळ गेला तर संसार कसा होईल ? "प्रियाच्या आईने पुन्हा तिलाच समजुन सांगितल.ती बिचारी काय बोलणार ?
प्रिया घरी आली. आत्याला बघुन तिलाखुप आनंद झाला. पण ती थोड बोलुन लगेचनिघून गेली... प्रियाने तिच्याबद्दल विचारल...तर कुणीच काही बोलल नाही. आज का कुणासठाऊक रात्री प्रियाचे बाबा एकटेच विचार करतबसले होते. त्यांना डोळ्यांसमोर लहानपणापासून ते आतापर्यंत प्रियाला कस सांभाळल तेसगळ आठवत होते. त्यांना ते आठवून हसायलायेत होत. पण त्यांना राहुन राहुन सुमतीचबोलण आठवत होत की तो मुलगा व्यसनी आहे. " प्रियाच्या आयुष्याचा प्रश्न आहे..."सुमती बरोबर बोलते.
एका कार्यक्रमानिमित्त ठरवुन नीरजच्याघरी संध्याकाळी प्रियाच्या आईबाबांना जाण्याचायोग आला... नीरजच्या आईबाबांनी त्यांचछान स्वागत केल.... ते सगळे बोलत बसले होते... पण निरज काही दिसत नव्हता. तो आलानसेल म्हणुन प्रियाचे बाबा स्वतःशीच मनातबोलत होते. तेवढ्यात नीरज तिथे आला.तो मात्र काहीतरी बडबड करत आला त्याचीआई ताडकन् उठली नि त्याच्याजवळ जाऊनकाहीतरी सांगत होती. पण नीरज दारू पिउनआलेला होता... त्याला काही बोलण्याच सुधरतनव्हत. हेच प्रियाच्या आईबाबांनी बघितल.ते तिथुन लगेच निघाले. त्याची आई त्यांनाथांबा म्हणुन विनवण्या करत होती. पण ते थांबलेनाही तर त्यांच्याच इथे कामाला असणार्याचौकीदाराला प्रियाच्या बाबांनी सहज म्हटल..." तुमच्या नीरज साहेबांना आज जास्त झालीवाटत, माझ काम होत. उद्या परत येतो..."तो माणुस बोलला, की " साहेब तुम्ही या उद्यापण सकाळी या ना या वेळेला ते रोजच असेपिऊन येतात..." त्यांना एक नाही ओ अजुनबरीच व्यसन आहेत... बर म्हणत त्यांनी कायसमजायच ते समजून घेऊन दोघेही तिथुनलगेच निघाले व घरी आले... प्रियाची आई तरतिच्या वहीणीला खुप बोलली.
त्यांचे डोळे उघडले होते. त्यांनी खूप घाई केली होती. आपण काय करायला चाललो होतो,एका छोट्याशा वाटणार्या चुकीमुळे प्रियाच आयुष्य ऊध्वस्त झाल असत. त्यांनी त्या स्थळालास्पष्ट नकार देऊन टाकला आणि आईबाबाम्हणून त्यांनी स्वतः मुलीसाठी स्थळ बघायच ठरवल तेही नीट आधी सगळ बघुन. प्रियालासगळ त्यांनी खर सांगुन टाकल नि तिची माफीमागितली. मग आईबाबांनी तिला सांगितल की" तुला मुलगा जर पसंद असेल तरच आम्हीपुढच सगळ बघुन ठरवू , कुणाच ऐकायच नाहीआता... " " तुला संसार करायचा आहे, त्यामुळे तुझा होकर महत्वाचा आहे. प्रियालाही आपल्याबाबा तिची किती काळजी करतात हे दिसुनआल. सुमतीला प्रियाच्या बाबांनी घरी बोलवलव तिची माफी मागितली. तिला पण छान वाटल, की प्रिया त्या व्यसनी मुलासोबत लग्नकरत नाही. दोघीही छान बोलत होत्या. त्यांच्यातल बाँडींग पहिल्यासासुन छान होत.आत्यानेच प्रियाला तुला कसा मुलगा चालेल,तिच्या अपेक्षा वगैरे तर तिने जे उत्तर दिल.तेव्हा त्यांनी त्यांचा मुलगा अरूणविषयी तिलाविचारल...." त्यालाही विचारते त्याच मत पणतुझ आधी सांग..."
प्रियाला क्षणभर भूतकाळात हरवली.ति आणि अरुण म्हणजे आत्याचा मुलगा.बालपणीची त्यांची मैत्री आठवली. तिला त्याच्याविषयी सगळ माहित होत. तो आता इंजिनीअरहोता.... तिला तो आवडत होता... " काय ग प्रिया ? कुठे हरवलीस ? "प्रिया भानावर आली, तिने लाजत मानेनेच होकार दर्शविला. सुमतीने तिच्या आईबाबांनाही विचारल. त्यांनी अरुणला विचारल, त्याचातर होकारच होता. त्याला प्रिया आधीपासुनआवडत होती पण आता दुर नोकरीलाअसल्यामुळे ते फार बोलत नव्हते. सगळ्यांनाघरच्यांना खुप आनंद झाला... प्रियाही खुश होती.की तिला अरुणसारखा चांगला, समजदारआणि बालपणीचा मित्र असलेला जीवनसाथीमिळाला... त्यांच्या भेटीनंतर ती आता भावीआयुष्याची स्वप्ने रंगवु लागली होती.
अरुणही प्रियाला बघून खूप खुश झाला... दोघांच्या पसंदीने ते लग्न ठरल !! लग्न ही पायरी प्रत्येकाच्या आयुष्यात येते. अजूनही ग्रामीण भागात मुलींना लग्न ठरवतानात्यांची पसंती, होकार विचारत घेतला जात नाही.मुलाला मुलगी पसंद झाली, की सगळ ठरवलजात... कधी तर नात्यातल स्थळ असल तर मुलीच्या घरचे फार चौकशी करत बसत नाहीत. पण आता पूर्वीसारख राहील नाही. मुलीला लग्न करून दुसर्या घरी जायच असत, ज्याच्यासोबत सगळं आयुष्य काढायचतो व्यक्ती माणूस म्हणून चांगला पाहिजे, पैसाघर, गाडी, हे कधीही कमावता येऊ शकत.पण माणूस चांगला पाहिजे. चार पावसाळे जास्त पाहिलेल्या थोरा मोठ्यांच्या सल्ल्यानेच लग्न करतो, हे छान आहे पण मुलीला आयुष्य काढायचं आहे, तिला तर तिची पसंती विचारू शकतो ना, तिच मतही महत्वाचं आहे ना? ग्रामीण भागात किंवा कुठेही खेड्यापाड्यात असं चित्र दिसतं, त्यावरून लिहिण्याचा छोटासा प्रयत्न... लग्न जर चौकशी करून ठरवलं तर एका मुलीचं आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो. """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
