Prashant Shinde

Inspirational

2.9  

Prashant Shinde

Inspirational

माझं हिरवा घड्याळ...!

माझं हिरवा घड्याळ...!

3 mins
2.2K


माझं हिरवं घडयाळ...!

घड्याळ शब्द कानावर पडला की वेळ पाहणे,वेळ सांभाळणे,वेळेत सर्व गोष्टी करणे,वक्तशीर राहणे सार सार पटापट मनात येत आणि वेळ जातोय याच भानच हरपत.मन विचारांच्या सागरात डुंबत आणि खोल खोल आठवणींचा शोध घेत घेत खोलवर अंतर्मनात उतरत.आठवणींचे पदर उलघडतात ,सारा जीवन पट बारीक सारीक गोष्टींसह डोळ्या समोर उभा राहतो.

माझं शालेय शिक्षण खेड्यात पूर्ण झालं आणि शहरात येऊन पडलो.खेड्या कडच्या मुलांना त्यावेळी शिक्षणासाठी शहरा शिवाय दुसरा पर्याय नव्हता.मोजकीच महाविद्यालय असायची त्यामुळे विद्येच माहेर घर म्हणून आमची पुण्यात वर्णी लागली.वय अस होत की ती विद्या कोण आणि ती राहते कोठे आणि तीच पुणे माहेरघर कसं हे कळत नव्हतं. किंबहुना ते कळाल असत तर शोधाची जननी गरज हे उमजलच नसतं.अंतरात घरची ओढ एवढी प्रचंड की पुण्यात पाऊल ठरत नव्हता की बुड टेकत नव्हतं.पहिले पाच सहा महिने घरातून हकालपट्टी नशिबी ठरलेली वाटायची आणि परत पुण्यात फेकले जायचो.आर्थिक उलाढाल पण फार मोठी होती.चार आठ आणे उधार देणे घेणे व्हायचे.वसुली साठी तिष्टावे पण लागायचे.पण स्नेह धागा इतका पक्का की

सारेच एका माळेतले मणी म्हणून दोस्तीची माळ अबाधित राहायची.

अमृततुल्य, कांचन, विश्व, कल्पना, अनेक चहाच्या टपऱ्या आम्हाला आधार वाटायच्या. आता आता हे आधार कार्ड बाहेर पडलं याची मुहूर्त मेढ मला वाटत असमहिच रोवली आणि त्याचा इतका मोठा वटवृक्ष झाला आणि आधाराचं पीक तिला गाळात जाऊन पोहचल. गरजे पोटी निर्माण झालेली आधार केंद्र उधारीवर चालायची म्हणून म्हंटल जाता जाता आधाराच्या आधाराचं श्रेय पदरात मनातल्या मनात पडलं म्हणून बिघडलं कुठं.असो.

गावा कडून पुण्याला येताना ,माझा सर्वात मोठा भाऊ मला एसटीत बसून देण्यासाठी बरोबर आला होता.सर्वात मोठा म्हणजे आम्ही सात भावंड,आसनी मी त्यात सर्वात लहान. थोडक्यात शेंडे फळ.नक्त व्हावं पण धाकट होऊ नये याचे सर्व माप दंड आणि परिणाम सारे मनसोक्त अनुभवले.अगदी पाठीवरच्या वळा पासून ते शाब्बासकीच्या थापे पर्यंत आणि डोक्यावरच्या गार पाण्या पासून ते पायावरच्या गरम पाण्या प्रयन्त सार सार सुखान भोगलं आणि दुःखान

पचवलं.

एसटी गाडी सुरू झाली तसं जयंतदादाचा चेहरा उतरला. मला ते जाणवलं. मलाही कससच वाटलं. तसा तो म्हणाला हे घड्याळ घे. माझी आठवण म्हणून आणि लक्षात ठेव,घड्याळ सांभाळायचं म्हणजे वेळ सांभाळायचं.पुण्यात जातोयस म्हणजे विद्येच्या माहेर घरात जातोयस.प्रत्येक क्षणी आपण काहीतरी नवीन शिकतोय याच भान ठेव आणि जीवनात यशस्वी हो.गाडी सुटली आणि मी पुणेकर होण्यासाठी मार्गस्थ झालो.

एकदा विश्व हॉटेल मध्ये मी, गोंदया, सुध्या , गायक्या चौघांनी सकाळचा नाश्ता केला आणि खिशात बिल भरायला पैसे नव्हते.मैत्री म्हणजे काय हे चांगलेच कळाले. प्रत्येकांनी आपापले बिलाचे पैसे दिले आणि काढता पाय घेतला. कच्चे मित्र पक्के वैरी म्हणजे काय हे काजवे चमकून समजले.तो ओरसंग ती वेळ जशीच्या तशी आठवते आणि आजही जीवाची घालमेल होते. खिशातून चिल्लर काढली आणि नेमके चार आणे कमी पडले. आता पाचावर धारण बसली. शांत पणे हातातील घड्याळ काढले आणि काउंटर वर ठेवले , म्हंटले नंतर चार आणे नंतर देतो आणि घड्याळ घेऊन जातो. त्याकाळी चार आण्याची पट माझ्या पेक्षा किती मोठी होती हे आठवलं की अंगावर काटा येतो.रूमवर आलो पैसे घेतले आणि हॉटेल गाठले.पैसे दिले आणि घड्याळ ताब्यात घेतले.दादा मिळाल्याचा आनंद मिळाला.दादा अपघातात १९८० साली गेला पण या घड्याळाच्या रूपाने अजूनही माझ्या मनगटावर असतो आणि प्रत्येक योग्य गोष्टीसाठी प्रोत्साहन देतो आणि अयोग्य गोष्टींसाठी वेसण घालतो.दादाची आजन्म साथ लाभण हे मी माझं सौभाग्यच मानतो.हे किल्लीच हिरव हेन्री सँडो(Henri sando) चं घड्याळ १९७२ पासून आजपावेतो माझ्या मनगटावर दादांच्या प्रेमाची साक्ष देत योग्य अयोग्य वेळेचं भान राखण्यास सज्ज राहून साथ देत आहे..या घड्याळाचा आणि दादांच्या प्रेमाचा जन्मोजन्मीचा ऋणानुबंध दृढ आहे आणि असाच जन्मोजन्मी घट्ट राहणार यात शंका नाही...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational