प्रशांत पवार

Abstract Classics Fantasy

3  

प्रशांत पवार

Abstract Classics Fantasy

माझं गाव - फणसवळे

माझं गाव - फणसवळे

2 mins
11


२०१२ चे ते साल मी नवीच कॅमेरा घेतला होता, गणपती सणाला गावी जाण्याचा बेत ठरलेला होता. त्यात नवीन कॅमेरा घेतला होता. गणपतीच्या २ दिवस अगोदर गावी गेलो. गावी गेल्यावर असे वाटले कि तो नवीन कॅमेरा आता बॅग मध्ये ठेवूच नये. मग घरी जाऊन काही वेळाने कॅमेरा घेतला आणि एकटाच निघालो एक एक क्लिक करत. पाच दिवसाचे गणपती विसर्जन करून पुन्हा मुंबई ला येऊन कामावर रुजू झालो. कॅमेरा मधले सर्व फोटो फेसबुक ला ऍड केले. आणि कॉमेंट्स चा भडीमार सुरु झाला. सर्व उत्सुक होते कि हे ठिकाण कुठेले आहे.... ?माझं गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात गडगडी नदीच्या तीरावर आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माझं छोटेसे गाव "फणसवळे". "कोकण" म्हटले कि कोकण या शब्दातच सर्व काही आले निसर्ग, आंबे फणस काजू नारळ पोफिळीच्या च्या बागा , निसर्गाने सर्व काही भरभरून दिले आहे इथे. तालुक्यापासून थोडे दूरच आहे पण जेवढे दूर आहे म्हणून प्रवासात क्षीण येतो तो मात्र तिथे गेल्यावर पूर्ण निघून जातो. तालुक्यावर गावाकडे निघालो कि, ती रस्त्यावरची नागमोडी वळणे, आपल्यापुढे धाव घेणारे एका पाठोपाठ एक असे सह्याद्री च्या डोंगर रांगा. रस्त्यासोबत गावी घेऊन जाणारी नदी आणि खळखळणारे पाणी जणू कडू आपले स्वागतच करत आहेत असे वाटते. पहाटे घरासमोर दिसणारी सह्याद्री कडा जी सूर्य किरणांनी व्यापून तांबूस झालेली दिसते. पावसाळ्यात जवळच असलेली नदी आणि माझ्या घरा शेजारी असलेला ओढा सुंदर मंजुळ गाणी गात वाहत असतात. तेवढ्यात दुरून कुठेतरी एखादा रानपक्ष्याचा आवाज येतो आणि मन त्याच्याकडे धाव घेते. चाहोबाजुंनी घनदाट जंगल, समोर उभा सह्याद्री आत येण्यासाठी फक्त एक नागमोडी रस्ता आणि त्याच्या कडेने वाहणारी नदी आणि डोंगर दरीमध्ये वसलेले माझे गावं. शहराच्या धाकधुकीतून गावी गेले कि मन प्रसन्न होते. एकमेकांच्या सुखदुःखात धावणारी जिवाभावाची माणसं, वाहनांचा गोंगाट नाही, मोबाईल नाही, फक्त निसर्ग. जे आपल्यासाठी साठवून ठेवले आहे निसर्गाने


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract