मला पंख असते तर
मला पंख असते तर


मला पंख असते तर
आकाशात गेलो असतो
चांदोमामाच्या खांद्यावर
जाऊन बसलो असतो
मला पंख असते तर
उडत गेलो असतो
चिऊ ताई सोबत
सारे जग फिरलो असतो
मला पंख असते तर
ढगात गेलो असतो
मऊ ढगांच्या गादीवर
शांत झोपलो असतो
मला पंख असते तर
झाडावर चढलो असतो
घरट्यातील पिल्लांसोबत
खूप खेळलो असतो