तुझ्या प्रश्नाचं उत्तर
तुझ्या प्रश्नाचं उत्तर
कालआपल्या ओळखीतलेच कुणीतरी मला म्हणाले, “तुझं माझ्यावर प्रेम आहे, हा माझा गैरसमज आहे”.क्षणार्धात पायाखालून जमीन सरकली. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे तुझ्या माझ्याशिवाय इतरांना खुप माहिती आहे. अन याचा विचार केल्यावर खुप दुःख झाले अन मनःस्ताप हीअन वाटलं माझंच काहीतरी चुकलं. तू म्हणतेस मी एक मित्र म्हणून राहावे अन हे मी मान्यही केले पण तू बोललेले कदाचित तुलाच पटले नाही. प्रेमा नंतर मैत्री, की मैत्री नंतरप्रेम? या गणितात तू अडकवून घेतलेस स्वतःला. अगदी सोपे गणित आहे पण तुला ते कसे सोडवायचेहेच कळाले नाही कदाचित. मी तुला एकदा भेटावे म्हणून खुप प्रयत्न केला गं पण तू त्यासतयार नाहीस क मलाही माहीत नाही. कदाचित तुला भिती वाटत असेल मला भेटलीस तर तुझं लपवलेलेप्रेम पुन्हा कोंब काढून त्यास नवी पालवी फुटेल. पण आता तू सत्य स्विकार कर.तुझामाझ्या सोबतचा तो प्रत्येक क्षण, ती प्रत्येकवेळ, तो प्रत्येक दिवस मी जपून ठेवलाय माझ्यासाठी अन फक्त माझ्यापुरता पण तुला ते जमलेका नाही कुणास ठाऊक. मी दिसताच तुझ्या गालावर येणारे हसू. कधि अल्लड कधी तुझा अवखळपणाकधी न विसरता येणारे ते क्षण. जसेच्या तसे. तुझी पहिली भेट अन माझ्य मनातले तुझ्यासमोर मांडले त्या दिवसाची खुणगाठ मनशी अगदी घट्ट बांधुन घेतली आहे मी. पण आताचेतुझे हे वागणे खुप छळतेय गं. क्षणार्धात होत्याचेनव्हते झाले अन काही प्रश्न अनुत्तरीतच राहीले काही तुझे काही माझे. तुझ्या प्रश्नांचीउत्तरे माझ्याकडे कधीच नव्हती कारण मी फक्त तुझ्यासोबत जगत होतो. माझा प्रश्न अन उत्तरसर्व काही तुच…. निरोपहीघेतला नाहीस, एक शेवटची भेट ही नाही. अन हे सर्व सोडून तु देखील एक प्रश्न उभा केलासकी ज्याचे उत्तर माझ्याकडे नाही. भुतकाळात जरा डोकावलीस ना तर तुला तुझ्या प्रश्नाचंउत्तर तुझ्याकडेच सापडेल याची खात्री आहे मला.शेवटीएकच सांगावेसे वाटतेय, सांगावेसे म्हणजे एक विनंती तु जर खरचं माझ्यावर मनापासुन प्रेमकेले असशील अन कधी माझी आठवण आली ना, तर संध्याकाळी त्या जागी जाऊन २ मिनीट तरी बस.अन जे प्रश्न मला विचारलेस ते माझ्यासाठी योग्य होते का याचि पडताळनी कर….

