Author Sangieta Devkar

Inspirational Others

3  

Author Sangieta Devkar

Inspirational Others

माझी कमाई

माझी कमाई

4 mins
179


प्रियाने इंजीनियरिंग पूर्ण केले आणि आता जॉब ला ही लागली होती. लग्नाचे वय ही झाले होते बरीच स्थळ तिला येत होती. प्रिया ला लहान बहिन होती पूजा नाव तिचे. ती अजुन शिकत होती. अनिकेत चे स्थळ प्रिया ला आले तो ही इंजीनियर होता दोघांच्या पसंतीने लग्न ठरले. दिसायला दोघे ही सुरेखच होते. चांगला मुहूर्त बघून लग्न झाले. अनिकेत ला तीन बहिनी आणि आई होती वडील अलिकडेच वारले होते. आईचा ख़ुप जीव होता अनिकेत वर तो ही आई ला दुखवत नसे. मोठी बहिन तिचे लग्न झाले होते पन नवऱ्याशी पटत नाही म्हणून घटस्फोट घेऊन आता माहेरीच राहत होती. दुसऱ्या बहिनी चे लग्न झाले होते ती याच शहरात होती बघावे तेव्हा आई कड़े असायची. लहान बहिन कॉलेज ला होती. आई आणि मुलींचे सूत चांगले जमायचे अनिकेत आई आणि बहिनी साठी काही ही करायला तयार असायचा.


प्रिया लग्न होऊन सासरी आली. 15 दिवस तिने कामावर सुट्टी टाकली होती पण अनिकेत सोबत तिला म्हणावा तितका वेळ घालवता आलाच नाही. आई किंवा बहीण सतत त्याच्या अवतीभवती असत. लग्नाला ख़ुप खर्च झाला या सबबी वर हनीमून सुद्धा कँनस्ल केले. प्रिया बोलली मी करते खर्च आपण जावू . प्रिया माहित आहे मला तू पण कमवतेस म्हणून माज दाखवू नकोस समजले. अरे माझे पैसे ते तुझे पण आहेत की? हो ना मग घरात आई कड़े दे ते पैसे तेवढेच खर्चाला होतील. पण आपले हे दिवस पुन्हा येणार आहेत का? हे बघ मला अक्कल शिकवू नकोस. म्हणत अनिकेत निघुन गेला. प्रिया ला ख़ुप वाईट वाटले आपला अनिकेत सोबत लग्नाचा निर्णय चुकला तर नाही ना? अशी शंका तिच्या मनात आली. आई शी कॉल वर ती बोलली. आई म्हणाली अग खरच झाला असेल खर्च हनीमून ला काय नंतर ही जाता येईल आणि अनिकेत चा स्वभाव अजुन तुला तितका समजला नसेल हळूहळू समजेल लगेचच तर्क वितर्क काढु नकोस. मग प्रिया ला गप्प बसावे लागले. त्यांच्या लग्नाला सहा महीने होत आले होते अनिकेत ला ख़ुप ईगो होता त्यात आई बहिन त्याला गोड बोलून फुस लावायचे काम करायच्या.


आईशी किती वेळ फोनवर बोलतेस काय इतके बोलायचे असते. किंवा तिने काही सव्हताला आणले तर बहिन लगेच मला आवडले फार मी घेवू का ग वाहिनी म्हणत त्या वस्तु वर डल्ला मारत असे. प्रिया चा पगार अनिकेत घेत असे तिला किरकोळ पैसे खर्चाला देत असे. माहेरी सारखे जायचे नाही असा नियम सासु चा होता. अनिकेत च्या कंपनी कडून त्याला परदेशी पाठवनार होते कंपनी ची ब्रांच तिकडे होती . प्रिया ला बरे वाटले येथून सुटका होतेय आणि मनासारखे जगायला मिळेल या कल्पनेने सूखावून गेली. ठरल्या प्रमाणे अनिकेत आणि प्रिया कॅनडाला आले . प्रिया ने ही तिथे जॉब शोधला. आता तर अनिकेत जास्तच पैसे घरी पाठवू लागला. प्रिया बोलली अनिकेत ला अरे इथे आपला खर्च जास्त होतोय आपल्याला पैसे जास्त लागतात . इथे सगळ काही महाग मिळते. मग तुझा खर्च कमी कर असे तो बोलला. ती शाकाहारी होती मात्र अनिकेत सगळ काही खायचा आणि इथे आल्या पासून ड्रिंक ही जास्तच करू लागला होता. कधी तरीच तो प्रिया ला बाहेर घेवून जायचा.


एकदा ते डिनरला गेले तेव्हा त्याने सव्हता साठी नॉनवेज मागवले पण प्रिया ला बोलला तू साध काहीस घे उगाच जास्त खर्च नको. प्रिया ला ख़ुप वाईट वाटले. ती काहीच बोलली नाही. घरी किंवा मित्रां कड़े पार्टी ला गेले तरी तो तिला टोकायचा तिला काही ही चालते तिची काही स्पेशालिटी नसते अस बोलून तिचा पाणउतारा करत असे. तिने सव्हता साठी खर्च नाही करायचा . घरचे सगळे काम तिनेच करायचे. तो काही ही मद्त करत नसे. त्याच्या आई आणि बहिनी त्याचे कान भरत असायच्या. तो मात्र नव नवीन कपड़े घ्यायचा प्रिया ला मात्र काय गरज आहे अस बोलून दाखवायचा. प्रिया ला अनिकेत चे वागणे आता सहन होत नव्हते. सव्हता नोकरी करून पैसे कमवत होती ती तरी तिची कीमत शून्यच होती. हा सगळा प्रकार होता एक्स्ट्रा मेल ईगोचा! बायको कमवनारी असली तरी तिला पाया जवळच ठेवायचे हिच वागणूक आई आणि त्याच्या बहिने नी दिली होती. त्याला त्यांच् च म्हणन पटत असे. बायको चे लाड़ केले तर डोक्यावर बसते ही मानसिकता होती अनिकेत ची. खर तर त्याची आई बहिन यांना प्रियाची हुशारी ,नोकरी हे बघवत नव्हते मग एखाद्याला सुखी का ठेवायचे ही तुच्छ मानसिकता होती.


प्रियाला आता कॅनडात करमत नव्हते इथे बोलायलादेखील आपल असे कोणी नव्हते. पण मधून नोकरी सोडून पण जावू शकत नव्हते. दोघांमध्ये आता या गोष्टीवरुन वाद होऊ लागले. अनिकेतबद्दल प्रेम आदर अस काहीच प्रियाला वाटत नव्हते. दोघ एकाच घरात राहुन परक्यासारखे राहत होते. चांगल्या पदावर काम करत असूनही प्रियाला अनिकेतकडून घरी तुच्छ वागणूक मिळायची. अनिकेतसाठी ती फ़क्त पैसे कमावणारी आणि त्याची शय्यासोबत करणारी हक्काची बायको होती. प्रियाच्या मनात यायचे की मी नोकरी करूनसुद्धा माझी कमाई काय? माझे महत्त्व काय? माझ्याच कमाईवर माझा हक्क नाही? माझी किंमत शून्यच! अशा प्रश्नांनी तिचे डोके भनभनुन जायचे. हळूहळू प्रिया नैराश्याकड़े झुकू लागली होती.


(सदर कथा म्हणजे घटना मी जवळून ऐकली आहे. आज ही असे पुरुष आहेत. कमवणाऱ्या बायकोचा पगार तिला मनाप्रमाणे खर्च करता येत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational