लव यु जिंदगी..
लव यु जिंदगी..
आज मी लवकरच जिमला पोहोचले होते. अजून कोणी आले नव्हते, म्हणजे सकाळच्या बॅचची थोड़ी मुलं होती. पण लेडीज कोणी आल्या नव्हत्या. मी खिडकीतून बाहेर पाहात होते. तसेही आज झुम्बा क्लास होता. सरांना यायला वेळ होता. मी बाहेर निरीक्षण करत होते.
खूप गर्दी होती रोडवर, लहान मुले, स्त्रिया, पुरुष सगळे आपापल्या तंद्रित, मधून जाणाऱ्या बसेस, गाड़या, गर्दीच गर्दी. एके ठिकाणी काही कॉलेजवरुन येणाऱ्या मुली दिसल्या, किती छान होत्या त्या! त्या चौघी जणी होत्या, सगळ्या स्लिम ट्रिम सुंदर मस्त हसत गप्पा मारत निघाल्या होत्या. मला त्यांना पाहून त्यांचा हेवा वाटला. या कशा स्लिम आहेत आणि मी एक इतकं वजन घेऊन वावरते आहे. गेली वर्षभर जिम करते पण काही फरक दिसत नाही. मला खूप वाईट वाटले. मी उदास झाले.
इतक्यात गुड मॉर्निंग पूर्वा म्हणत सर आत आले. मी वळून मागे पाहात बोलले, गुड़ मॉर्निंग सर. पण सरांना समजले माझा चेहरा पाहून की काहीतरी बिनसले आहे.
सर म्हणाले, व्हाट हॅपन पूर्वा? व्हाय यू लुकिंग अपसेट?
काही नाही सर असंच.
काही असेल तर बोल पूर्वा आय कैन हेल्प यू.
सर मी गेली वर्षभर जिम करते पण वेट लॉस काहीच होत नाही. सो आय फील अपसेट.
ओह, अगं पूर्वा वेट लॉस व्हायला थोडा वेळ लागतो. प्रत्येकाची बॉडी कशी कोणत्या गोष्टीला किती रिस्पॉन्स देते हे लगेचच नाही सांगता येत. तुझे डायट, एक्सरसाइज यांचा ताळमेळ बसणे पण गरजेचे आहे.
सरांना मध्येच तोडत पूर्वा म्हणाली, सर मी प्रयत्न पण करतेच आहे तुम्ही पाहता ना रोज. पण काही मुली किती स्लिम असतात मग मीच का अशी?
तसे सर हसले आणि म्हणाले, पूर्वा जगात सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात ना आणि तुझे म्हणावे तितके ओव्हरवेट पण नाही. हा तुला पीसीओडीचा त्रास आहे सो थोड़ं जास्त वेट आहे पण प्रॉपर डायट आणि एक्सरसाइजने हे वेट पण कमी होईल. पण तुला थोडा पेशन्स ठेवावा लागणार आहे. पण म्हणून तू काय फॅट आहेस किवा सुंदर दिसत नाहीस असा याचा अर्थ होत नाही. तू छान गाणं म्हणतेस तुझा आवाज सुंदर आहे. जॉब करत करत तू तुझा हा गाण्याचा छंद जपला आहेस हे पण काही कमी नाही ना. आणि यात काही तुझे वेट डिस्टर्ब तर करत नाही ना. मग का इतकी काळजी करतेस तू तुझ्या करियरकड़े लक्ष दे. वेट हळू हळू कमी होईल. आणि अशीही तू सुंदर दिसतेस.
थॅंक यू सर, पूर्वा आता बरीच सावरली होती. बकीच्याही मुली आल्या होत्या, क्लास सुरु झाला. पूर्वा जिमनंतर ऑफिसला जात असे. रोजचे हेच रूटीन होते. आणि शनिवार-रविवार ती गाण्याच्या क्लासला जात असे. गाणं खूप आवडायचे तिला. आज ती क्लासला आली.
मैडम म्हणाल्या, मुलींनो एक बातमी आहे. पुण्यात एक मोठा म्युझिक शो होणार आहे, तर या शोमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी मला नावे सांगा. आणि या शोमध्ये जिचा आवाज सुंदर असेल तिला एका चित्रपटात पार्श्वगायनाची संधी मिळनार आहे.
सगळ्या जणी खुश झाल्या प्रत्येकीने नाव नोंदवले. पूर्वानेही आपले नाव दिले. येत्या पंधरा दिवसानी हा शो होणार होता. पूर्वा अगदी जोमाने याची तयारी करू लागली. तिल स्वतःलाही माहित होते की तिचा आवाज खरंच छान आहे. दुसऱ्या दिवशी ती जिमला गेली. आणि सरांना ही बातमी सांगितली. त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या चांगली तयारी कर म्हणाले. पूर्वा खूप खुश होती. आज तो मोठा म्युझिक इवेंट सादर होणार होता.
पुण्यातील बालेवाड़ी स्टेडीयमवर हा कार्यक्रम होता. सगळा स्टेडियम लोकांनी भरला होता. संगीत क्षेत्रातील मोठ मोठी मान्यवर या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून येणार होते. कार्यक्रम सुरु झाला. बरेच कन्टेस्टंट आले होते. पूर्वाच्या गाण्याला वन्स मोअर मिळाला होता. तिचे गाणे खरेच छान झाले. दोन आठवड्यांनी या शोचा निकाल होता. पूर्वा जिमला आली तसे सरांनी तिच्या शोबद्दल विचारले, ती खूप खुश होती.
आज रविवार होता सो पूर्वा निवांत होती. लेट उठायची. आजही ती बेडवरच लोळत होती. छान डिसेेंबरची थंडी होती. बेड वरुन उठावेसे वाटत नव्हते तिला. अचानक तिचा फोन व्हायब्रेट झाला, कोणाचा तरी कॉल येत होता. तिने नाखुशीनेच कॉल रिसिव्ह केला. आणि पलीकडिल व्यक्तीचे बोलने ऐकून एकदम बेडवर उठून बसली. तिला त्या म्युझिक शोमधून सिंगर म्हणून सिलेक्ट केले होते. ती आनंदाने ऒरडतच रूमच्या बाहेर आली.
आई-बाबांना ही गुड़ न्यूज दिली. तेही खुश झाले. पूर्वाने जिमच्या सरांना कॉल लावला आणि ही न्यूज त्यांनाही दिली. दुसऱ्या दिवशी ती जिमला गेली. आणि आश्चर्य सगळे जण तिची वाट पाहात होते. सगळ्यांनी फुलांचा बुके आणला होता. हातात हात घेऊन तिचे अभिनंदन केले.
सर पुढे आले म्हणाले, पूर्वा खूप खूप अभिनंदन तुझे. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा.
थॅंक यू सर सो मच.
सर पुन्हा म्हणाले, पूर्वा तुला त्या कार्यक्रमात कसे जज केले सांग?
म्हणजे काय सर, मला नाही समजले.
तू तुझ्या वेटवरुन डिस्टर्ब झाली होतीस ना? मी इतर मुलींसारखी स्लिम, सुंदर का नाही असे तुला वाटत् होते ना? मग सांग तुझ्या या यशात तुझे वेट आड़ आले का? तू जशी आहेस तशी सर्वांना आवड़लीस ना? तुझ्या दिसण्यापेक्षा तुझा आवाज सुंदर आहे मग तू कशी काय इतरांशी तुलना करतेस? तुझ्या या यशासमोर बाकी कोणतीच गोष्ट मोठी नाही हो ना?
तशी पूर्वा बोलली हो सर मी चुकीचा विचार करत होते. माझ्याकड़े इतक्या सुंदर आवाजाची देणगी असताना मी स्वतःला कमी लेखत होते. पण आता मला समजले की तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचे गुण जास्त महत्त्वाचे! तुम्ही जशा आहात तसेच लोकांनी तुम्हाला स्वीकारले पाहिजे हेच खरे!!
मग आता पूर्वाची नवीन ओळख आहे पार्श्वगायिका पूर्वा, गिव्ह हर बिग हॅंडस प्लीज... सर म्हणाले आणि सर्वांनी खूप टाळया वाजवल्या. पूर्वासाठी केक आणला होता त्यावर सिंगर पूर्वा असे लिहिले होते. तिने केक कापला. सर्वांनी पुन्हा तिला शुभेच्छा दिल्या. पूर्वा खूप आनंदात होती. काही दिवसांपूर्वी तिच्या वाढत्या वजनाचे जे मळभ तिच्या मनात साचले होते ते आता पूर्णपणे निवळले होते. खरंच दिसणं वरवरचं असतं पण तुमचे गुण, तुमची क्वालिटी हीच तुमची खरी ओळख असते हे पूर्वाला मनोमन पटले होते... आपण कायम आपल्या आयुष्याला दूषण देत असतो. माझे जीवन असे मला सुखच मिळत नाही मला हा त्रास आहे माझी कोणी काळजी करत नाही असे खूप काही... आपल्याकड़े जे नाही त्याचाच आपण जास्त विचार करतो आणि जे आहे त्याकड़े दुर्लक्ष करतो. आयुष्य सुंदर रीतीने आनंदात जगायचे असेल तर रोज सकाळी उठल्या उठल्या म्हणत जा... लव यू जिंदगी... लव यू जिंदगी... बघा कधीच दुःख तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाही...