Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Jyoti gosavi

Romance Action


3.5  

Jyoti gosavi

Romance Action


लपवालपवी एस एम बॉसच्या घरात

लपवालपवी एस एम बॉसच्या घरात

8 mins 108 8 mins 108

एस एम (स्टोरी मिरर) बॉस स्पर्धा जाहीर झाली आणि लोकांमध्ये उत्कंठा वाढली. यामध्ये कोण कोण पार्टीसिपेंट असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा होऊ लागल्या. कारण दरवर्षी एस एम बॉस ही स्पर्धा मोठ्या झोका मध्ये होत असे. यावर्षी एकंदरित 15  स्पर्धक घेतले. पैकी पाच गायक, पाच अॅक्टर, पाच गायक, आणि पाच मॉडेल्स अशी मंडळी घेतली होती काही टीव्ही सिरीयलमध्ये कामदेखील करत होते.


एक एन्ट्री मात्र स्पेशल एंट्री होती. तो होता विनित बारगिर . तो स्पेशल एंट्री मधून आला होता. तो मॉडेल देखील होता, कुस्तीपटू देखील होता, आणि गायक देखील होता. त्यामुळे त्याच्या करियरची जरी सुरुवात असली तरी लोकांनी त्याला सुरूवातीलाच डोक्यावर घेतले. बारगीर असे आडनाव म्हणजे त्याचे घराणे खानदानी कुस्तीगीर, एका वेळी बारा जणांशी कुस्ती खेळण्याची आणि बारा जणांना पाडण्याची, गिरवण्यांची क्षमता असणारे त्याचे पूर्वज होते म्हणून त्यांचे आडनाव बारगिर पडले .


स्टोरी मिरर बिग बॉस या शोमध्ये एक से एक नावाजलेल्या व्यक्ती होत्या. माॅडेल होत्या, स्वत ॲक्टर होत्या आणि गायक देखील होते. पंधरापैकी सात पुरुष आठ महिला आणि ओन्ली वन कुस्तीगीर होता विनीत. आल्या दिवसापासून सर्वांचाच आवडता आणि लाडका .शिवाय तोदेखील सर्वांशी नम्रतेने वागणारा, आपल्या ताकतीचा अनाठाई प्रयोग न करणारा असा होता. वयाने मोठ्या ॲक्ट्रेस होत्या त्यांना मावशी काकी म्हणे. बाकीच्यांना दादा काका भाऊ असे रिस्पेक्ट फुल बोलत असे. परंतु टास्क पूर्ण करण्याच्या वेळी मात्र कोणाची मुलाहिजा ठेवत नसे, सर्वांशी भांडण देखील होई, परंतु नंतर एकदा टास्क पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा सर्वांशी गोड वागायला जाई. त्यामुळे एक मॉडेल दोन एक्टर आणि एक गायिका अगदी त्याच्या वरती लट्टू होत्या.  परंतु एक मुलगी अशी होती, ती मात्र त्याला जरादेखील भाव टाकायची नाही .ती होती मॉडेल आणि ॲक्ट्रेस शर्वरी वैद्य .ती उभरती मॉडेल होती आणि 2/3 सिरीयल तिच्या येऊन गेल्या होत्या. अर्थात इतक्या जणी आपल्या मागे आहेत याचे त्याला भूषणच वाटत होते. परंतु त्याचे सगळे लक्ष शर्वरी वर होते ,आणि शर्वरी मात्र त्याला मुळीच विचारत नव्हती. 


काय करावं बरं? म्हणजे ही मुलगी आपल्या गळाला लागेल. असा विचार त्याच्या मनात येत होता. त्यालादेखील फ्लर्टींग करायला आवडत होते. पण एका लिमिटमध्ये. त्यातून मुलांचे असे असते जी मुलगी भाव टाकत नाही हे पाहिल्यावर तिच्याच मागे लागतात. तो शनिवारचा दिवस होता. या आठवड्यातला आजचा शेवटचा टास्क, त्यानंतर शनिवार रविवार एस एम चे सर्वो, दत्ताराम बिहू राऊत येणार होते, आणि त्या आठवड्याचा डिसिजन कळणार होता. कोण घरात राहतील आणि कोण बाहेर जातील हे समजले असते. तो टास्क होता, एकमेकांच्या वस्तू लपवणे. आणि एक तरी वस्तू मिळाली पाहिजे ज्याची हरवलेली एकही वस्तू मिळणार नाही ही व्यक्ती शोमधून बाद .टास्क चे परसेंटेज होते .त्या टास्कचे मार्क होते.


प्रत्येक स्पर्धक आपापल्या वस्तू एखाद्या बॅगमध्ये, बकेटमध्ये, कुठे कुठे लपवून ठेवत होते. जेणेकरून दुसऱ्याला आपल्या वस्तू मिळू नयेत. त्यामध्ये स्त्रियांच्या वस्तू जास्ती, कानातले -गळ्यातले, बांगड्या, लिपस्टिक, मेकअप किट, इत्यादी इत्यादी. पुरुष मंडळी आपले सॉक्स, बूट, चप्पल, शर्ट ,चष्मा गॉगल ,चेन असं काय काय सर्व कुठे एका बॅगमध्ये घाल, कुठे एखाद्या पेटीमध्ये ठेव. एकत्र जमा करून त्याच्यावरती राखण करत बसले होते. महिला मंडळी आपल्या पर्समध्ये ,बॅगेमध्ये वस्तू भरून बसल्या होत्या. पण असं 24 तास कोणी बसू शकत नाही. किमान वॉशरूमला तरी जायला हवे. अशावेळी एक जण वॉशरूमला गेला की बाकीचे त्याच्या वस्तू पळवत. असत. अशा प्रत्येकाने एकमेकाच्या बऱ्यापैकी वस्तू लपवून ठेवल्या होत्या. अपवाद होता फक्त विनीत. त्याने त्याच्याकडील सामान कुठे लपवले ते कोणालाच सापडत नव्हते. त्याच्या कॉटवर काही म्हणजे काही नव्हते. शिवाय सर्वजण जरासे त्याला घाबरूनच होते. कारण सामान लपवताना , ओढा ओढीत चुकून जरी त्याचा हात पडला किंवा त्याचा धक्का लागला तर आपले फ्रॅक्चर व्हायचे. पण सर्वजण त्याच्या बेडवरती डोळे लावून मात्र बसले होते. त्यामध्ये शेवटी त्याला वॉशरूमला तर जावे लागणार, तसा तो गेलाही, सर्वांनी त्याच्या बेडकडे नजर फिरवली पण, सर्वांच्या पदरी निराशाच आली. त्याच्याकडे लपवण्यासारखे काही दिसत नव्हते. तेवढ्यात शर्वरी चे डोळे चमकले तिला त्याच्या उशी जवळ काहीतरी चमकल्यासारखे वाटले. आणि तिने पळत जाऊन ती वस्तू उचलली. ती वस्तू म्हणजे त्याची आवडती चांदीची गदा. 


तो पहिल्यांदा जेव्हा मोठ्या स्पर्धेला उतरला होता आणि कोल्हापूर केसरी स्पर्धेमध्ये त्याला प्रथम क्रमांक, कोल्हापूर केसरी ही पदवी, आणि सोन्याच्या गोफा मध्ये गुंफलेली चांदीची गदा, असे बक्षीस मिळाले होते .ती त्याची अत्यंत प्रिय गोष्ट तो कधीही स्वतःपासून दूर करत नव्हता .तो सोन्याचा गोफ आणि चांदीची गदा तो आपल्या गळ्यात मिरवत असे .त्या टास्कमध्ये अशी गोष्ट होती ज्याची वस्तू शेवटपर्यंत मिळणारच नाही तो बाद ,म्हणजे प्रत्येकाला माहीत पाहिजे की आपली वस्तू कोणी पळवली आहे. ती त्याला मागायची . हे सर्व लहानपणी पत्त्यांचा "नाॅट ॲटम" नावाचा एक गेम होता. त्यामध्ये तुम्हाला हवे ते पत्ते तुम्ही अंदाजपंचे समोरच्या कडे मागायचे. त्या व्यक्तीने दिले तर ठिक, नाही दिली तर शोधायची. पण आपली एक तरी वस्तू हस्तगत करायची. त्यादिवशी दुर्दैवाने चुकून त्याच्या चेनचा फासा झोपेमध्ये निघाला, आणि इथेच बेडवरती पडली. वाष्रूम ला जाऊन आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपल्या गळ्यामध्ये चेन नाही. मग त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. त्याचं काय हरवलं हे कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे तो काय शोधतोय ते पण लवकर लक्षात येईना. मग जेव्हा त्याच्या गळ्याकडे पाहिले, तेव्हा त्याची मानाची गदा दिसत नाही हे सर्वांच्या लक्षात आले. एक प्रकारे सर्वांना मनातून आनंद झाला. कारण याचे एकट्याचे काही लपवले नसल्यामुळे याला विनाकारण सगळे मार्क मिळणार होते. आणि  तो विन होणार होता. परंतु आता होणार नाही .परंतु याची गदा कुठे आहे आणि कोणी घेतली हे काही कोणाला माहिती नव्हते. उद्या रविवार त्यामुळे आज प्रत्येकाने आपली एक तरी वस्तू पुन्हा हस्तगत केली पाहिजे, प्रत्येक जण त्याच चिंतेमध्ये होता आणि दुसरा कधी जातोय आणि त्याचं सामान मी कधी उचकटून पाहतोय अशीच प्रत्येकाची इच्छा होती. त्या दिवशी रात्रभर बिग बॉस मधील कोणी झोपले नाही. फक्त झोपल्याचे ॲक्टींग करत होते आणि आपल्या वस्तू शोधत होते. शेवटी प्रत्येकाने काही ना काही स्वतःची वस्तू हस्तगत केली. कधी हिसकावून घेतली, कधी चोरून घेतली, पण येनकेन प्रकारे प्रत्येकाला आपली वस्तू एकतरी परत मिळाली होती. आता फक्त अपवाद होता विनीत, त्याची एकच वस्तू हरवली होती आणि ती त्याला मिळत नव्हती. आणि ती कुणी घेतली याबद्दल त्याला काही कळत नव्हते .

सर्वजण त्याचे काय गेले,? काय गेले ?विचारत होते त्याला शोधू लागत होते. एकटी शर्वरी मात्र काही विचारत नव्हती. अशी पण आतापर्यंत ती त्याला विचारतच नव्हती, पण आता त्याला तिच्याशी गोड बोलण्याची पाळी आली होती. 


शरू डियर, शर्वरी तु काय अशी एकटीच बसतेस? तू काय बोलत नाही कोणाशी? तू माझ्याशी पण कधी बोलत नाहीस, तुझी माझी काय दुष्मनी आहे का? 

नाही दुश्मनीचा प्रश्नच नाही. 

मग माझी एक वस्तू गेली आहे तुला माहित आहे का?

मी कशाला तुझी वस्तू चोरू.


आम्ही आपल्या आपल्या वस्तू शोधून शोधून मिळवल्या. यावेळी तूच टास्क हरणार आहेस. तुला शून्य मार्क मिळणार आहेत. शर्वरी म्हणाली .

विनीत ला खूप राग आला. पण बाई असल्यामुळे तिला काही जाऊन झापड देता येत नव्हती. त्यामुळे त्याने डोके शांत ठेवले पण त्याला तिची शंका आली, की बहुदा माझी चेन आणि गदा हिला सापडले असावी. कारण ही एकटी आहे की जी मला काय हरवले म्हणून विचारत नाही. म्हणजे तिला माहित आहे कि माझे काय हरवले. 


मग त्याने ठरवले आता आरपार लढाई. त्यानुसार जाऊन तो तिच्याशी भांडण करून आला. काहीना काही कारणाने वाद घालून आला. माझी वस्तू तुझ्याकडेच आहे माझे मला परत दे सांगू लागला, पण शर्वरी अशी वेड पांघरून बसली होती की जसे तिला काहीच ठाऊक नाही. मग त्याने ठरवले आता आपण पराभवाचे पांढरे निशाण लावायचे .म्हणून तर जाऊन पहिले तिची माफी मागू लागला. तिच्याशी गोड बोलू लागला .परंतु शर्वरी काही टस का मस झाली नाही . जेव्हा आपले साम, दाम चालत नाही तेव्हा त्याने भेद करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणालाच ठाऊक नव्हते की, कोणाकडे वस्तू आहे. मग त्याने सहज शर्वरी पाठमोरी असताना पाहिले तर, तिने मस्त केसाचा अंबाडा घातला होता आणि त्या भोवती तिनें ती चेन  गुंडाळली होती, गदा अंबाड्याच्या मधोमध खोचली होती.  त्याच्यावरती काळा कलर चे नेट लावलेले होते. आणि आकडे लावलेले होते. त्यामुळे ती कोणाला दिसलीच नव्हती. 

पण चुकून थोडीशी गदा केसांच्या बाहेर आली आणि चमकली. आणि विनीत ला समजले शर्वरी नेच आपली वस्तू लपवली आहे. तो तिला पकडायला धावला ,तो तिच्या केसाला हात घालणार तोच ती झटकन वळली, आणि त्याचा इरादा तिला समजला. आणि त्यांच्यात पळापळ सुरू झाली. पकडापकडी सुरू झाली. विनीत ताकतीला भारी होता, परंतु शर्वरी चपळ होती. ती काही त्याला सापडत नव्हती. 


शेवटी एक मोमेंट आला कि ती वॉशरूमकडे पळाली. त्याने पाठोपाठ जाऊन तिचा हात धरला आणि तिच्या केसातील आपल्या प्रॉपर्टी ला हात घालणार, तोच तिने पटकन ती चेन एका सेकंदात खेचून काढली. तेथे" हम आपके है कौन" सारखा सिन घडला. त्या झटापटीत पाय घसरून विनीत खाली पडला आणि त्याला पकडता पकडता त्याच्या अंगावरती शर्वरी पडली. तरी पण त्याने सोडले नाही, त्याने तिला एका हाताने आपल्या छातीशी गच्च धरून ठेवले आणि दुसऱ्या हाताने तो तिच्या हातातील चेन खेचत होता. आता काय करावे शर्वरीला सुचेना, आता आपल्या हातून गेम चालला. मला एक दिवस तरी याला हरवायचं होतं! ती संधी आता आलेली, परंतु हातातून चालली.

 

काय करावं? , काय करावं? आणि तिला पटकन आयडिया सुचली. तिने ती चेन आणी गदा पटकन आपल्या टॉप मध्ये ब्रेसीयरच्या आत टाकून दिली. आता मात्र विनीतचा नाईलाज झाला. तो काही तिथली गदा हस्तगत करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने शर्वरी ला सोडून दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा बिग बॉस चा दरबार भरला. दत्ताराम बिहू राऊत जी, सेट वरती स्टेजवर अवतरले, तेव्हा नेहमी सगळी टास्क जिंकणारा माणूस आज झिरो वरती होता. 

हिरो आज झिरो स्कोर वरती होता. आज त्याला घराबाहेर पडावे लागणार होते. त्याची हरवलेली वस्तू कुठे आहे त्याला माहित होते. किमान ती वस्तू माहिती असेल तरी त्याला त्यातून कन्सेशन मिळाले असते. परंतु त्याने काही कॅमेऱ्यासमोर ती वस्तू कुठे आहे आणि कोणाकडे आहे हे मुळीच सांगितले नाही. आणि शर्वरी कडे जसा "हम आपके है कौन" मध्ये हातातल्या शूज सकट सलमान माधुरीला सोडून देतो आणि ज्या नजरेने वरती उभे राहून तिच्याकडे पाहतो, तीच नजर त्याने शर्वरी कडे टाकली. त्याक्षणी शर्वरीला स्वतःची शरम वाटली, केलेल्या चिटींग कशी लाज वाटली. आणि त्याच्याविषयी मनात एक प्रेम भावना देखील उत्पन्न झाली. एक आदर उत्पन्न झाला .

 

ठरलेल्या नियमानुसार जरी त्याचा पब्लिक डिमांड आणि स्कोअर कितीही चांगला असला तरी आज तो आऊट होता. तो निमूटपणे बिग बॉसच्या घरातून आपली नेम प्लेट काढून बाहेर आला. आणी समोर चालू असलेल्या दरबारात उभा राहीला. परंतु आयोजक असे थोडेच सोडणार? त्यांना कॅमेऱ्यामुळे सर्व काही माहीत होते. हा जेव्हा निमुटपणे बाहेर निघून आला, त्यानंतर ते सीसीटीवी फुटेज सर्वांना दाखवले गेले. यामध्ये एक गोष्ट अशी झाली की सर्वांची सहानभूती विनीत कडे गेली. त्याचे संस्कार, त्याची नम्रता, तो स्पर्धेबाहेर गेला परंतु त्याने वरील गोष्टींचा उच्चार केला नाही हे लोकांना खूप आवडले. आणि बाय पब्लिक डिमांड विनीत पुन्हा घरामध्ये आला. 

**********************


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Romance