kanchan chabukswar

Horror

4.0  

kanchan chabukswar

Horror

लॉकेट..................... सौ कांचन चाबुकस्वार

लॉकेट..................... सौ कांचन चाबुकस्वार

6 mins
337


कॉलेजच्या मुला-मुलींची ट्रिप गोव्याच्या बीच वरती विसावली होती.

सगळ्या पोरांना भरपूर नेत्रसुख मिळत होते, मुली संकोचून गेल्या होत्या, जिकडे बघावे तिकडे विदेशी पाहुणे छोट्या बिकिनी घालून हिंडत होते. म्हणूनच प्रधान आचार्यांनी गोव्याच्या ट्रीपला भयंकर नाखुशीने मंजुरी दिली होती. पण मुलांच्या हट्टापुढे त्यांना मान तुकवावी लागली.


सगळी मुलं मुली आपापल्या जोड्या करून मिळेल त्या खुर्च्यांवर ती विसावले होते. काही प्रेमी जोडपे जरा दूरवरच्या झाडाखालच्या खुर्च्यांवर विसावले होते. युसुफअली आणि त्याची मैत्रीण माया हे सर्व लोकांपासून जरा दूरवर जाऊन वाळू मध्ये बसले होते.

अचानक माया उठली आणि समुद्राच्या दिशेने चालू लागली, युसुफला पण जायचं होतं पण थोडावेळ आराम आणि आणलेल्या बिअर चा स्वाद घेऊन मग तो पाण्यात उतरणार होता. बाजूच्या पिशवी मधला बिअरचा कॅन काढताना वाळू बाजूला झाली, आणि एक सोनसाखळी एका बदामाच्या आकाराच्या लॉकेट सकट चमकली.

मायाला हाक माराव तर माया बरीच दूर गेली होती, सहज म्हणून त्यांनी लॉकेट उघडायचा प्रयत्न केला,

लॉकेट उघडता क्षणी कसलासा धूर बाहेर आला आणि बघतो तो काय, लॉकेटमध्ये बनाना बोट वरती बसलेल्या एका सुरेख तरुणीचे छायाचित्र होते. त्या तरुणीने ही सुरेख सोनेरी रंगाची बिकिनी घातली होती, सोनेरी लाटा वाऱ्यावर उडत होत्या, डोळ्यावर मोठा गॉगल होता, तिची स्वर्ण कांती उन्हामध्ये चमकत होती. अतिशय सुरेख असा तो फोटो होता.

नकळत युसुफने तो फोटो आपल्या ओठाजवळ जवळ नेला, फोटोचे चुंबन घेणार इतक्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावरती स्पर्श केला.

युसुफ वळला, आश्चर्याने त्याचा जबडा उघडाच राहिला. त्या फोटो मधली तरुणी त्याच्या बाजूला उभे राहून मंद हसत होती.


त्या तरुणीने खूण केली, की ते लॉकेट तिचं आहे. युसुफ हसला," पेनल्टी" युसूफ म्हणाला.


ती तरुणी मंद हसून म्हणाली," संध्याकाळी पाच वाजता बीच रिसॉर्ट वरती जरूर ये, तुझं बक्षीस तुला मिळेल."

 तिला नाव विचारणार तेवढ्यात ती वळली आणि तडक निघून गेली.


" युसुफ, युसुफ, ये लवकर ये." माया हाक मारत होती.


ते लॉकेट पटकन गळ्यात घालून युसुफ मायाच्या दिशेने धावला. तास दोन तास दोघांनी पाण्यामध्ये मजा केली, आणि जड पावलाने सगळी मुले आपल्या हॉटेलमध्ये परत आली.


    बीच वरती जो काय प्रकार झाला होता तो युसुफने रोड्रिक्स ला सांगितला.

रोड्रिक्स म्हणाला," सांभाळून, इथे लुटमारीचे आणि पळवून नेण्याचे बरेच प्रकार होतात, तू एकटा जाऊ नकोस मी पण तुझ्या बरोबर येतो."

युसुफला कोणालाच बरोबर न्यायचे नव्हते, त्याने हसून ती गोष्ट टाळली.

 लंच टाईम उरकल्यानंतर युसूफ आपल्या रूममध्ये गेला आणि स्वतःला तयार करण्यामध्ये त्यांनी जवळजवळ तास घालवत वेळ घालवला. साडेचार चा गजर लावून त्याने पलंगावरती पडून डोळे मिटून घेतले.


बरोबर तयार होऊन युसुफ एकटाच बीच रिसॉर्ट वरती पाच च्या ठोक्याला पोहोचला.


ती सुरेख तरुणी बागेमध्ये एकटीच फिरत होती, ती धावतच युसुफच्या दिशेने आली, त्याचा हात प्रेमाने हातात धरून ती म्हणाली," माझं लॉकेट आणलेस ना? माझ्या डॅडींनी दिलेली गिफ्ट आहे ती. मी डॅडींना सांगितलं, त्यांच्याकडून तुला सरप्राईज गिफ्ट आहे. फक्त आज डॅडी काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत, उद्या मात्र ते तुला निश्चित भेटतील. "


युसुफला बक्षिसाची काहीच घाई नव्हती, त्या सुरेख तरुणीचा सहवास अन त्याला हवा होता, काहीतरी रोमँटिक, ॲडव्हेंचरस करण्यासाठी त्याचे शरीर फुरफुरत होते.


दोघेही हातात हात घालून बराच वेळ बागेमध्ये फिरत राहिले, त्या तरुणीने युसुफला डिनर साठी पण थांबण्यास सांगितले, युसुफला तेच पाहिजे होते. तो आनंदाने थांबला.


ती तरुणी त्याला रिसॉर्ट मधल्या एक आतल्या असलेल्या आपल्या खोलीमध्ये घेऊन गेली. तिचा सुट जरा एका बाजूला होता त्यामुळे आजूबाजूला एकदम शांतता होती. रिसॉर्टच्या डायनिंग हॉल मधून मंद संगीताचे सूर उमटत होते, समुद्रावरुन येणारा थंडगार वारा अतिशय उल्हसित असे वातावरण तयार करत होता. आता दोघेही जण त्या तरुणीच्या रूम मध्ये आले.

तरुणीने रूममध्येच डिनर ची ऑर्डर दिली आणि ते दोघेजण सोप्या वरती बसून गप्पा मारू लागले.


तिचं नाव निशा, तिचे डॅडी मोठे बिझनेसमन असून त्यांचा फिशरी चा भला मोठा कारखाना गोव्याच्या दुसऱ्या बाजूला होता, बहुतेक विकेंड साठी म्हणून ती आपल्या कुटुंबासमवेत या बीच वरती येऊन समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटत असे.


   थोड्याच वेळात डिनर घेऊन वेटर रूममध्ये आला, डिनर बरोबर विस्की बियर आणि बर्फाचा क्रिएट पण होता. युसुफला आता आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. जेव्हा वेटर रूम मध्ये आला तेव्हा निशा बाथरूम मध्ये गेली होती तेव्हा वेटर नि फक्त युसुफकडे वर पासून खाल पर्यंत न्याहाळून डिनर टेबल वरती ठेवलं आणि तो निघून गेला.

निशा बाहेर आली, टीव्ही वरती मंद संगीत लावून त्या दोघांनी संथपणे नृत्य केले. युसुफच्या कानापाशी येऊन निशा म्हणाली "ही माझी गिफ्ट बर का."

  तिच्याकडे आसुसलेल्या नजरेने बघत युसूफ म्हणाला," फक्त एवढेच?"

त्यावर निशानी पलंगाकडे सूचक कटाक्ष टाकला.


    व्हिस्कीचे घोट घेत, दोघांनीही डिनर चा आस्वाद घेतला. युसुफचा चा फोन वाजला," कुठे आहेस तू?" प्रोफेसर चा फोन होता.

" मी इथेच माझ्या नातेवाईकांना भेटायला आलो आहे, बीच रिसॉर्ट मध्ये, लवकरच परत येईन, माझ्यासाठी डिनर साठी थांबू नका." 

 युसुफन सांगितल्यावरती फोन बंद झाला.


कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विस्की किंवा बियर घेणे अलाऊड नव्हते, युसुफला फुकटची संधी आल्यामुळे त्याने ही संधी सोडली नाही.


   डिनर झाल्यानंतर निशा त्याला समुद्रकिनाऱ्यावरती घेऊन गेली, तिथल्या डेक वरती, एक सजवलेली बोट उभी होती, युसुफला ओढत निशा आत घेऊन गेली." चल आपण जरा समुद्रावर चक्कर मारून येऊ"

युसुफला मजा वाटत होती म्हणून त्यानी विरोध केलाच नाही.


    बोट आपोआप चालू झाली, दिवे मंद झाले, निशा त्याला ओढत ओढत आपल्या रूममध्ये घेऊन गेली, सजवलेल्या पलंगावरती त्याला ढकलत तिने स्वतःला त्याच्या वर लोटुन दिले. सुरुवातीला युसुफला फार मजा वाटली, अचानक निशाच्या तोंडातून, दोन चमकदार सुळे चमकले, तिचे डोळे लालसर झाले, तिची सुंदर कांती, आता गडद चॉकलेटी रंगाची झाली, सुरेख कोमल केस, झिपर्‍या सारखे झाले. निशा युसुफ वरती बसली होती, त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारून तिने आपलं तोंड त्याच्या गळ्याजवळ आणलं.

खोलीभर कसलातरी धूर भरून राहिला. युसुफला अतिशय भीती वाटली, तिच्या मिठीतुन सुटुन त्याने बोटीच्या टोकाकडे धाव घेतली, संपूर्ण बोटी वरती त्या दोघांव्यतिरिक्त कोणीही नव्हते, बोटीच्या कडेला उभे राहून त्याने मागे वळुन बघीतले, किनारा खूप दूर राहिला होता, बोट कुठे होती त्याला कळत नव्हते, निशा त्याच्यापाठोपाठ डेक वरती आली, अजूनही निशाच लॉकेट युसुफच्या गळ्यात होतं. काही न कळून युसुफने पाण्यात उडी मारली, त्याला विशेष पोहता येत नव्हते. त्यातून समुद्राच्या पाण्यात तर नाहीच नाही.

बराच वेळ गटांगळ्या खाऊन युसुफचा श्वास संपत आला, अचानक त्याला एक छोटीशी नाव तरंगताना दिसली, कसे तरी हात मIरत तो नावे पर्यंत पोहोचला, तेवढ्यात एक हात नावे तून बाहेर आला, युसुफने हातात हात दिला आणि वर बघितले, ती निशा होती. प्राणपणाने हात झटकून परत युसूफ पाण्यात पडला.


बराच वेळ गटांगळ्या खात अचानक त्याच्या हाताला एक लाकडी तुकडा लागला, अतिशय आशेने युसुफने तो तुकडा पकडला तर त्याच्या वरती निशा बसली होती, ती परत परत त्याला वरती ओढायचा प्रयत्न करत होती. अतिशय भीतीने युसुफ ची बोबडी वळली होती, कितीही ओरडला तरी ऐकणार कोणीच नव्हतं, परत परत गटांगळ्या खात शेवटी तो बेशुद्ध पडला.


     हॉटेलमध्ये बराच वेळ वाट बघून शेवटी दोघेही प्रोफेसर बीच रिसॉर्ट च्या दिशेने निघाले.

तिथे पोचल्यावर ती युसुफचा फोटो दाखवून त्यांनी चौकशी केली. तिथल्या वेटरने युसुफचा चा फोटो ओळखला. त्याने सांगितलेली माहिती धक्कादायकच होती. त्या खोलीमध्ये युसूफ एकटाच बसला होता, खोली त्याच्याच नावावरती बुक होती, त्या खोलीमध्ये कोणीही मुलगी नव्हती. त्याचं एकट्याच जेवण घेऊन वेटर तिथे गेला होता. बिलाचे पैसे आधीच दिलेले होते.

त्याच्यानंतर युसूफ एकटाच समुद्रकिनारी असलेल्या बोटींच्या दिशेने गेला होता. आणि मग त्याचा काही पत्ता नव्हता.

आता मात्र कॉलेजची पूर्ण टीम घाबरली. त्यांनी ताबडतोब पोलीस मध्ये कंप्लेंट केली.

रोड्रिक्स ने दिलेल्या माहितीनुसार कुठल्यातरी मुलीने युसुफला भेटायला बोलावले होते. आता मात्र सगळेजण भयंकर चिंतातुर झाले.

 युसुफला ला कोणी पळवून तर नेले नाही?

नांगरलेल्या बोटींच्या मालकांना चौकशी केल्यावरती, सगळ्या बोटी नांगरलेल्या होत्या. कुठलीही बोट बाहेर पडली नव्हती.

दोन दिवस गेल्यावरती समुद्राच्या दूरवरच्या टोकाकडे अचानक गर्दी दिसल्यामुळे पोलीस चौकशीसाठी गेले.

 युसूफ तिथे पालथा पडला होता, त्याचा श्वास बंद होता, पाण्यामध्ये बुडवून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानी हातात काहीतरी घट्ट धरण्याचा प्रयत्न केला होता, पण हातात फक्त वाळू होती.


     " युसुफ उठ, आपलं राहिलेलं काम आपण पूर्ण करू, माझ्या डॅडींना पण तुला बक्षीस द्यायचे आहे, आणि माझ्याकडून पण तुझं बक्षीस अर्धवटच राहिले, युसुफ उठ."

युसुफ ने वळून डोळे उघडले, फोटोतली निशा गोड हसत उभी होती, तिने हात पुढे केल्यावर युसुफ ने तिच्या हातात हात आपला हात दिला. त्याला ओढून निशाने त्याला उभे केले, गर्दीमधून दोघेही तरंगत तरंगत बाहेर गेले.


गर्दीमध्ये प्रोफेसरांनी मृतदेह ओळखला आणि त्याच्या आई-वडिलांना कळवण्याची व्यवस्था केली. ट्रीप अर्धवट सोडून सगळेजण आता परत जाणार होते.


बीच वरील एक्सीडेंट समजून पोलिसांनी केस बंद केली. काही चोरी झाली नव्हती, किंवा त्याचा मृत्यू असं कुठलंही दुसरं कारण समजत नव्हतं, त्याच्याबरोबर समुद्रावरती कोणीही दिसलं नव्हतं.


पुढच्या महिन्यामध्ये ख्रिसमससाठी गोव्यामध्ये बरीच गर्दी होणार होती म्हणून हॉटेलवाल्यांनी आपापले हॉटेल्स सजवण्यास सुरुवात केली.


    डिसेंबर मधल्या पर्यटकांमध्ये रॉबर्ट एकटाच आलेला होता. बीच वरती बसून तो शांतपणे फोटो काढत होता. कॅमेरा ची पिशवी आपल्याजवळ खेचताना वाळू बाजूला झाली आणि काहीतरी चमकलं. एक सुरेख सोनसाखळी आणि बदामाच्या रंगाचं आकाराचं लॉकेट तिथे पडलं होतं.

रॉबर्टने हळूच लॉकेट उघडलं, त्याच्यातून किंचित् धूर आला, बनाना बोटी वरती बसलेल्या सोनेरी रंगाची बिकनी घातलेल्या एका सुरेख तरुणीचे छायाचित्र आत मध्ये होतं. इतक्या सुरेख मुलीचे चित्र बघून रॉबर्टने हळूच ते चित्र आपल्या ओठा पाशी आणलं, तो चुंबन घेणार एवढ्यात त्याच्या खांद्यावरती कोणीतरी स्पर्श केला,

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror