kanchan chabukswar

Horror

3.2  

kanchan chabukswar

Horror

लॉकेट - भाग दुसरा

लॉकेट - भाग दुसरा

7 mins
298


पोलीस कमिशनर अर्जुन इनामदार आपल्या ऑफिस मध्ये बसले ले असताना फोन खणखणला, डिसेंबर महिन्याच्या गोव्याच्या गर्दीमध्ये, विशेष करून परदेशी पर्यटकांमध्ये पोर्तुगीज वरून आलेल्या रॉबर्ट चा मृतदेह समुद्रकिनारी सापडला होता. रॉबर्ट पालथा पडला होता, त्यांनी हाताला काहीतरी घट्ट धरायचा प्रयत्न केला होता, पण हात उघडला तेव्हा फक्त वाळूच निघाली.

विदेशी पर्यटकांची गर्दी रॉबर्टच्या बाजूला जमली होती,

    " रॉबर्ट, मला तुला गिफ्ट द्यायचं आहे, आपला खेळ अर्धवटच राहिला, तू कशाला पाण्यात उडी मारलीस्? चल आता तुझी वाट बघत आहेत."

रॉबर्ट ने वळून बघितले, तिथे निशा गोड हसत उभी होती, तिच्या हातात हात देऊन, रॉबर्ट वाळू मधून उठला, दोघेही जण गर्दीतून तरंगत तरंगत बाहेर गेले.


गेल्या दोन महिन्यांमध्ये युसुफ, रॉबर्ट यांचे मृतदेह समुद्रकिनारी सापडले होते. युसुफला समुद्र पाण्यामध्ये पोहता येत नसलं तरी रोबोट रॉबर्ट पोहणे यामध्ये एक्सपर्ट होता, तरीही त्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. यु सारखीच युसुफ सारखीच त्याची पण कथा होती, बीच रिसॉर्ट च्या हॉटेल रूममध्ये तो एकटाच होता, जेवण झाल्यावर तो समुद्रकिनारी गेला होता, नांगरली यापैकी कुठलीही बोट बाहेर पडली नव्हती, आणि त्याच्या नंतर तो गायब झाला होता.


रॉबर्ट आत्महत्या करेल असं काही कारणही नव्हतं, पोर्तुगालमध्ये त्याचं घर आणि कुटुंब होतं. त्याला कुठलेही टेन्शन किंवा व्यसन नव्हतं. पोर्तुगाल मधून भारतावर ती दबाव यायला लागला, भारतामध्ये येणारे पर्यटक जर मृत्युमुखी पडणार असतील तर पर्यटकच येणार नाहीत म्हणून. अजिंक्य इनामदार बारकाईने या केसची माहिती घेत होते. दोन्ही बळी एका मुलीच्या मागे गेले होते, कोण होती ती मुलगी? डिसेंबर महिन्यामध्ये पोलिसांच्या निगराणी मध्येच क्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत झालं. कोणाही एकट्या माणसाला बीचवरती हिंडण्यास मनाई होती. तरीपण तरुण-तरुणी रात्री संध्याकाळी एकटेच पोहायला निघून जात असत. विशेष करून विदेशी पर्यटक एकट्याने पाण्यात पोहायचे समाधान मानत असे.


इनामदारांनी रवींद्र आणि तेजस्वी या दोन पोलीस ऑफीसर ड्युटी वरती लावले होते, त्यांच्या हाताखाली बरेचसे हवालदार काम करत होते. तेजस्वीची दिवसभराची ड्युटी आणि विजय ची रात्रीची ड्युटी होती. जानेवारी महिन्यात थंडी गोव्याला गुलाबी थंडी म्हणून प्रसिद्ध होते तेव्हा परत भरपूर पर्यटक गोव्याच्या बीच वरती धमाल करण्यासाठी येत होते. परवानगी नसताना देखील पंजाब मधल्या कॉलेज ची ट्रिप गोव्याच्या किनाऱ्यावर ती येऊन थडकली. पंजाबी मुलांना नदीमध्ये पाण्याची सवय पण समुद्र बघून त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला. सगळे पैसे वाले धनाढ्य बापाची पोर पोरी आणि खुलेपणा त्यांच्या रक्तातच भिनलेला.


परत तेच, सुचना असूनही रवींद्र एकटाच बनाना बोट वरती बसून पाण्यावरच्या साहसी सहली वरती निघाला. िनार्‍यावरुन त्याचे मित्र मंडळ त्याला अजूनच प्रोत्साहन देत होते, त्याच्याकडे बघून बऱ्याच मुलांनी बनाना बोट भाड्याने घेतल्या आणि ते पण पाण्यावरती निघाले. प्रोफेसर फक्त मुला मुलींचे कपडे सामान सांभाळत किनार्‍यावरती बसले.


पायातले बुट काढताना अचानक प्रोफेसर महिंद्रा च्या पायाखाली काहीतरी चमकलं. वाळू बाजूला करून बघितलं तर एक सुरेखशी सोन्याची साखळी आणि त्याच्याखाली बदामी आकाराचे लॉकेट. महिंद्रा नी यांच्या  सह- प्रोफेसरला साखळी आणि लॉकेट दाखवलं आणि विचारलं," काय हे !आमच्या बरोबरचया पोरी न पैकी कोणाचा आहे का?" प्रोफेसर राजेंद्र म्हणाले "बघूया मुली आल्यावर ती विचारू."


महिंद्र प्रोफेसरने जेव्हा लॉकेट उघडून आत मध्ये बघितलं तेव्हा बनाना बोटी वर्ती बसणारी सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली एक सुरेख तरुणीचा छायाचित्र त्यांना दिसलं. त्यांनी ताबडतोब लॉकेट बंद केलं आणि साखळी आपल्या खिशात ठेवून दिली.


मुला-मुलींचा पाण्यावरचा हायदोस संपल्यानंतर सगळी टीम परत किनाऱ्यावर ती आली तेव्हा प्रोफेसर महेंद्र नी साखळीचा उल्लेख करून ती सगळ्यांना दाखवली. मुलींनी तर नाही म्हणून सांगितलं मुलांनी मात्र लॉकेट उघडून आत मध्ये कोणाचा फोटो येते बघितलं. रवींद्र नी खोटं सांगितलं," साखळी माझीच आहे" सगळ्या मुलांनी नाही केलं तरीपण रवींद्र साखळी गळ्यात घालून बसला.


रात्री जेवणाच्या वेळानंतर परत काही मुलांना समुद्रकिनारी जायचे होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारली.

सगळी मुलं मुली नाराजीने हॉटेलच्या आपल्या रूममध्ये परत आले, रवींद्र एकटाच असताना, तो पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीच्या गॅलरीमध्ये आला आणि त्यांनी ते लॉकेट उघडून बघितलं.


लॉकेटमधून थोडासा धूर बाहेर आला आणि त्याला त्या तरुणीचे छायाचित्र दिसले. जेव्हा त्यांनी ते छायाचित्र आपल्या ओठापर्यंत नेलं तेव्हा अचानक त्याच्या पाठीवर ती कोणीतरी स्पर्श केला. बिकिनी मधली ती सुरेख तरुणी गॅलरीमध्ये त्याच्या बाजूला उभी होती.

" तू इथे कशी काय?" रविंद्र ने प्रश्न केला.

" मी बीच वरती होते तेव्हा प्रोफेसर तुम्हा सगळ्यांना साखळी बद्दल विचारत होते. तू म्हणालास की ही साखळी तुझी आहे म्हणून मी तुझ्या पाठोपाठच इथपर्यंत आले. खरे तर ही साखळी माझी आहे माझ्या डॅडींनी मला ती दिली आहे,"

" तुझं नाव काय? पण आमच्या बॉईज हॉटेलमध्ये तू आज कशी काय शिरली?" रविंद्र ने विचारले

" हॉटेलचं नाव ना, निशा रिसॉर्ट, माझं नाव निशा, हे रिसॉर्ट आमच आहे." निशा म्हणाली.

" पण तुला माझी साखळी सापडल्यामुळे आता मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचे आहे, चल आपण डॅडींना जाऊन भेटू आणि तुझे गिफ्ट मी तुला देईन. " निशा म्हणाली

" इथेच थांब मी प्रोफेसर यांना सांगून येतो" रवींद्र म्हणाला

" अरे हॉटेलमध्येच आमचं पण घर आहे प्रोफेसरांनी काय सांगायचं, चल तू माझ्या बरोबर, चल आपण काहीतरी ड्रिंक घेऊ नाहीतर आईस्क्रीम खाऊन तुला जे हवं ते आणि मी डॅडी बरोबर तुझी ओळख करून देते." निशा घाईघाईत म्हणाली.


नाही तरी रवींद्र जरा बिनधास्त मुलगा होता, निशाच्या झिरझिरीत गाउन मधून तिची सोनेरी रंगाची बिकिनी स्पष्ट दिसत होती, तिचं गिफ्ट काय आहे याची त्याला फारच उत्सुकता होती, त्याला वाटले जर निशाचे डॅडी हॉटेलमध्ये असतील तर भेटून घेऊ काय हरकत आहे. मागचा पुढचा विचार न करता त्याने मोबाईल आपल्या खिशात टाकला. त्याच्या लक्षात आलं की मोबाईलचा चार्ज एकदमच कमी झालेला आहे. मोबाईल चार्जिंगला ठेवून तो निशा बरोबर बाहेर पडला.


सगळ्या मित्रांच्या खोल्यांमधून हसण्या खेळण्याचे आवाज जोरात येत होते. सगळे दरवाजे लावलेली असल्यामुळे कोणीही त्याला बघितले नाही. निशाने त्याला व्यवस्थित अंधार्या काळोख्या कॉरिडोर मधून हॉटेलमध्ये भरपूर फिरविले. तिथे बागेमध्ये बसून दोघांनी आईस्क्रीम खाल्ले. बागेच्या मागच्याच बाजूला समुद्र येऊन भेटला होता.


अचानक मागच्या बाजूने एक बोट बागेच्या टोकापर्यंत आली. निशा अचानक उठली आणि जोरात ओरडून म्हणाली," हे बघ माझे डॅडी आले," रवींद्र ला काहीच दिसले नाही, पण तो उठून उभा राहिला निशा अचानक बागेच्या टोकाकडे धावत सुटली, धावता-धावता तिचा गाऊन गळून पडला, त्यामुळे ती अतिशय सुरेख मादक दिसू लागली, ते बघून रवींद्र ला हृदयामध्ये काहीतरी हरवल्यासारखे झाले आणि तो तिच्या मागे पळू लागला. पळता पळता दोघेजण जिथे बोट लागली होती तिथपर्यंत आले, निशाने रवींद्र ला ओढत ओढत बोटीमध्ये नेले.


रवींद्रचा रूममेट संजय आपल्या खोलीमध्ये परत आला तेव्हा रवींद्रचा पत्ता नव्हता. त्याचा फोन मात्र चार्जिंगला ठेवलेला होता. त्यांनी बाहेर येऊन गॅलरीत बघितले तर रवींद्र धावत धावत बागेच्या टोकाकडे जातांना दिसला. त्याने प्रोफेसरला ताबडतोब जाऊन सांगितले. प्रोफेसर महेंद्र संजय यांनी एकीकडे पोलिसांना फोन केला आणि ते पण बागेच्या टोकाकडे धावत निघाले. बाग संपताक्षणी समुद्र चालू होता आणि प्रोफेसर यांना कुठलाही धोका नको होता. त्यांनी फोन केल्यामुळे पोलीस पण सावध झाले.


संजय आणि प्रोफेसरने बघितले की रवींद्र धावत धावत बागेच्या टोकाकडे गेला आणि तिथून त्यांनी चक्क पाण्यामध्ये उडी मारली. खरं म्हणजे आता पोहायला जाण्याची कोणालाच परमिशन नव्हती. मग रवींद्र आणि पाण्यामध्ये का बर उडी मारली? रवींद्र धावण्या वरून जसं काही रवींद्रला कोणीतरी ओढत घेऊन चाललं आहे असं वाटत होतं.


रवींद्रच्या पाठोपाठ इन्स्पेक्टर विजय आणि त्याच्या बरोबरच्या पोलिसांनी देखील पाण्यामध्ये उडी मारली. रवींद्र जणूकाही कुठल्या तरी अज्ञात शक्तीच्या द्वारा ओढला जात होता. निशाची साखळी त्याच्या शर्टच्या खिशामध्ये होती. इन्स्पेक्टर विजयच्या हाताला रवींद्रची कॉलर लागली, त्याबरोबर त्यांनी कॉलर धरून रवींद्रला ओढायचा प्रयत्न केला. झटापटीमध्ये रवींद्रचा शर्ट फाटला आणि पाण्यावरती तरंगत तरंगत बुडून गेला. जसा रविंद्रचा शेवट त्याच्या अंगातून निघून पाण्यामध्ये जाऊन पडला तसा तो एकदम शुद्धीवर आला. इन्स्पेक्टर विजयच्या हाताला घट्ट धरून तो किनार्‍यापर्यंत आला.


आता सगळे टीम वरती आश्चर्य करण्याची पाळी होती. पोलिसांनी अजून कुमक मागवून घेतली. निशा रिसॉर्टचा कानI आणि कोपरा शोधून काढला. त्यांना कुठेही निशा किंवा डॅडी दिसले नाहीत. रिसॉर्ट च्या म्हाताऱ्या नोकरांनी सांगितलेली कथा सगळ्यांचे डोळे उघडणारी होती.

रिसॉर्टच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरती एका बंद खोलीमध्ये, निशा आणि तिच्या वडिलांचे भलेमोठे चित्र लावलेले होते, सोनेरी बिकीनी घातलेली गोड हसणारी निशा आणि बोटीवरून हात दाखवणारे तिचे डॅडी.


रविंद्र ने सांगितले की हीच ती मुलगी, तिच्याबरोबर तो समुद्र पर्यंत गेला होता. म्हाताऱ्या नोकराच्या सांगण्यावरून, पोहायला गेलेल्या निशाचा अतिशय क्रूरपणे मृत्यू झाला होता, तिच्या गळ्यातील साखळी तिच्या बनाना बोटीमध्ये अडकली होती आणि गळा आवळल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. एकुलत्या एक लेकीच्या मृत्यूमुळे निशाच्या डॅडींनी आत्महत्या केली होती. त्यावेळेला निशाच्या मागे तिचा मित्र बसला होता, निशाच्या संपत्तीसाठी त्याने तिचा खून केला होता, तेव्हापासून निशा तिच्या पाठी मागे लागणाऱ्या तरुणांचा बळी घेत होती.


अर्जुन इनामदारांनी सगळ्या पोलीस दलाची एक मीटिंग घेतली. समुद्रकिनारी होणारे अपघात हे काहीतरी विचित्र होते याची त्यांना पण कल्पना होती. सगळ्या टीमने मिळून निशाची साखळी खोल समुद्रामध्ये नेऊन टाकली. जो मुलगा साखळी गळ्यात घालत असे त्याच्यामागे निशा लागत असे, अशा रीतीने अर्जुन इनामदारांनी लॉकेट चे गुढ रहस्य सोडवले.


गोव्याच्या किनाऱ्या पासून दूर अंतरावर ती नेऊन टाकलेली साखळी एका माशाने गिळून टाकली. त्या माशाला एका मोठ्या माशाने खाल्ले, त्याला दुसऱ्या माशाने. दूर दूर अंतरापर्यंत साखळीचा प्रवास झाला, ऑस्ट्रेलियाचे मासेमारी जहाज मासे मारत असताना त्यांच्या जाळ्यामध्ये मासा अडकला.

 ऑस्ट्रेलियाच्या किनार्‍यावरती तिकडील कोळी बांधवांच्या हातामध्ये तो मासा सापडला,

 सावध रहा....... कोणालाही सोनसाखळी मिळाली तर गळ्यात घालू नका.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror