Jyoti gosavi

Abstract Others

3  

Jyoti gosavi

Abstract Others

लोकांना आली रंगीत दाढी

लोकांना आली रंगीत दाढी

1 min
218


चमत्कार चमत्कार चमत्कार


 मंडळी एक चमत्कार झालेला आहे. आशिया खंडामधील हिंदुस्तान नामक देशांमध्ये ,महाराष्ट्र नामक राज्यांमध्ये, आणि मुंबई नामक प्रांतांमध्ये लोकांना रंगीबेरंगी दाढ्या आलेल्या आहेत . स्त्रिया , पुरुष, लहान मुले सर्वांना ह्या दाढ्या  आलेल्या आहेत.


 लाल, निळ्या, हिरव्या पिवळ्या सर्व रंगाच्या दाढ्या आलेल्या आहेत.

 मंडळी, मंडळी तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. लोकांचा असा समज झालेला आहे की मास्क हे नाकातोंडावर न लावता ते हनुवटीवर लावायचे असतात. त्यामुळे त्यांना रंगी-बेरंगी दाढ्या आल्यासारखे दिसते. 


लोकांनो सुधारा ,लोकांनो सुधारा. करोणाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. आत्ताच कुठे आपण जरासा निश्वास टाकला की, गेला बाबा करोना!

 परंतु तो गेलेला नसून कुठेतरी तुमच्या-आमच्या मध्ये लपलेला आहे. पुन्हा एकदा संपूर्ण लाॅकडावून होण्याआधी जागे व्हा. स्वतःला, राष्ट्राला, महाराष्ट्राला उन्नत करण्यासाठी हातभार लावा. पुन्हा एकदा सारे ठप्प झालं तर ते आपल्याला परवडण्यासारखं नाही. त्यातून वर येण्यासाठी आपल्याला पुढील पाच वर्षे लागतील. त्यापेक्षा आत्ताच अजून थोडे दिवस सोशल डिस्टंसिंग पाळूया. तोंडावर मास्क लावूया आणि हात देखील धुवू या. 

आता लसीकरण चालूच आहे हळूहळू सर्वांना होईल आणि सगळे जण सुरक्षित होऊ पण थोडासा सब्र ठेवा.

तरच आपण येणारे पुढील सारे सणवार आनंद उत्सव कौटुंबिक कार्यक्रम यांचा आनंद घेऊ शकतो मेहरबानी करा

 तोंडाला मास्क लावा

 हात धुवा

 डिस्टन्स पाळा. 

कोरोना टाळा


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract