जवाॅ झुल्फे
जवाॅ झुल्फे
जवाॅ जुल्फे काल वक्त नावाचा जुना चित्रपट पाहत असताना, गाण्यांमध्ये कुठेतरी जवाॅ जुल्फे हा शब्द आला. हा शब्द मला फार आवडला खरंच कवीची किती सुंदर कल्पना आहे . अहो साधी केसांची जुल्फ, बटा, पण तरुणपणामध्ये ती जवाॅ जुल्फे होतात. मग त्यावरून जुल्फे या विषयावर बरीच गाणी आठवली. छेडो ना मेरी जुल्फे सब लोग क्या कहेंगे हमको दीवाना तुमको काली घटा कहेंगे ये रेशमी जुल्फे ये शरबती आँखें इन्हे देखकर जी रहे है सभी तुम्हारी जुल्फ की साये मे शाम कर दुंगा ये केसुवो की घनी छाव है है मेरे खातिर मराठीमध्ये तिची चाल तुरुतुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली खरोखर शृंगारच्या भावामध्ये केसूए, झुल्पे, बटा हे सगळं एक अविभाज्य अंग आहे. अनेक वेळा मोकळे केस सोडलेली स्त्री जेवढी सुंदर दिसते तेवढी बांधलेले केस सोडून नाही. जास्त करून ज्या सिनेमांमध्ये रेखा गृहिणीचा रोल करते तिथे कायम रेखा जयाप्रदा यांचे लांब सडक केस म्हणजे एका सोज्वळ सज्जन गृहिणीचे प्रतीक म्हणून समजले जातात. न्हालेल्या केस वाळवत पाठमोरी उभी असणाऱ्या स्त्रीचे सौंदर्य अजूनच काही खानदानी. आशा भोसले च्या मादक मधाळ आवाजातलं मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. गुरुदत्त च्या डायरेक्शन मधलं चौदवी वी का चांद हो या आफताब हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो त्यात तिच्या केसांमध्ये झोपेत देखील कमळासारखा खुलून दिसणारा वहिदा रहमान चा चेहरा. जुल्फे है जैसे कांदो पे बादल झुके हुए आणि मग अशा ह्या जवा जुल्फा मधून हळूहळू रुपेरी तारा चमकू लागतात, तरी पण ती जुल्पेच असतात. आणि कधीतरी एकदा आयुष्यात मग त्या रुपेरीचे पूर्ण चंदेरी होते. आता ती जुल्फे जवाॉ नसतात, हळूहळू केस विरळ होत जातात कधी त्या बटाच्या जटा होतात, ते कळत नाही. प्रत्येक स्त्रीला अगदी शेवटपर्यंत असतील त्या बटा व्यवस्थित बांधून त्याच्यावर एखादं नाजूकस फुल माळायचा मोह आवरता येत नाही. आणि पुरुषाला देखील आपले उरलेले चार केस आरशात पाहून विंचरायचा मोह आवरत नाही. आपल्या तरुणपणातले पुढे जब जब जुल्फे तेरी कवारियो का दिल मचले आठवत तो आपले आताचे उरलेस उरले केस विंचरत असतो.
