STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics Others

4  

Jyoti gosavi

Classics Others

मला भेटलेले बाळासाहेब

मला भेटलेले बाळासाहेब

3 mins
1

मला भेटलेले बाळासाहेब वयाची फक्त 17 वर्षे पूर्ण होऊन अठराव्या पदार्पण केले होते आणि जे जे हॉस्पिटल मुंबई येथे नर्सिंगच्या ट्रेनिंगला आले, तेव्हाच 82/ 83 च्या दंगली उसळल्या, आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचा परिचय झाला. प्रत्यक्षात काही पाहिले नव्हते, परंतु लोकांच्या तोंडून कशी शिवसेनेची लोक या दंगलीमध्ये मुसलमानांना टफ देत आहेत, याबाबत चर्चा सुरू होत्या, आणि एकदा अशी वदंता आली की इथे नर्सिंग होस्टेलमध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे मुली आहेत आणि संपूर्ण जे जे हॉस्पिटल हे मुसलमान एरिया मध्ये, ते लोक इकडे अटॅक करणार, खरं खोटं माहित नाही परंतु ,काही शिवसैनिक तिथे पहारा देत होते. आणि खरंच हे लोक इतके उद्दाम झाले होते की, आमच्या बॅचला एकच मुस्लिम मुलगी होती पण ती सुद्धा आम्हाला दंगलीत धमक्या देत होती की, माझ्या काकाला बोलावते आणि त्याच्याकडे बंदूक आहे, आणि तो तुम्हाला ठार करेल, आमचा पिंड पहिल्यापासून इन्किलाब करणाराच, कोणी काही बोलले नाही पण मी मात्र म्हणले तुझा काका इथं येईपर्यंत आम्ही एवढ्या जणी तुझी चटणी करून टाकू😃 आणि 82/ 83 च्या त्यात दंगलीमुळे त्यानंतर मी बाळासाहेबांची भक्त झाले ,आणि मला मोखाड्याला पुन्हा एकदा बाळासाहेब भेटले, प्रत्यक्षात नाही हो,☺️ मी मोखाड्याला तेव्हा स्टाफ नर्स या जॉब वरती होते, तिथल्या आदिवासी लोकांच्या प्रथेप्रमाणे नवीन येणाऱ्या प्रत्येक सिस्टर नी दिलेले इंजेक्शन दुखतं, ती बरोबर बोलत नाही. त्यात एकदा त्यांनी मी ड्युटीवर असताना ॲम्बुलन्स मागितली, आणि माझ्या हॉस्पिटलला ट्रान्सफर करण्यासाठी ॲम्बुलन्स फॅसिलिटी नव्हती. झालं! संध्याकाळी माझ्या क्वाटर्स वरती शिवसेनेचा मोर्चा ,क्वाटर्स म्हणजे तरी कसली हो ,कुडाच्या झोपडीत राहत होते. दरवाजा आणि छत पक्के, बाकी चारी बाजूंनी कुडाच्या भिंती, माझ्याकडे एका भिंतीवर बाळासाहेबांचे एक साधारण दोन बाय अडीच या आकाराचे कॅलेंडर होते. ते लोक माझ्या झोपडी पर्यंत आले आणि आत वाकून पाहू लागले, आत बाळासाहेबांचा फोटो पाहताच त्यांच्या म्होरक्याने त्या लोकांना हाकलले. चला, निघा बरं! ही बाई आपलीच आहे पुन्हा हिला त्रास द्यायचा नाही. आणि त्यानंतर माझी आणि त्या लोकांची चांगली गट्टी जमली. पुढे एक दोनदा अगदी धक्काबुक्कीत जाऊन देखील त्यांना प्रत्यक्ष बघितले, आणि शेवटचे पाहिले ते ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर, तीच त्यांची शेवटची सभा, जिथे त्यांनी स्टेज वरती डोके टेकून सर्वांना अभिवादन केले होते. पण प्रत्यक्ष भेटण्याआधी देखील बाळासाहेब कधी मार्मिक मधून कधी कुठल्या भाषणातून कायम भेटतच होते. अहो गिनीज बुकात नोंद झाली आहे, एकच नेता, एकच मैदान, आणि वर्षानुवर्षे इतकी गर्दी आणि मैदान गाजवणारा नेता, पुन्हा होणार नाही. हळूहळू काळ पुढे सरकत गेला मीही माझ्या संसारात अडकले अर्थात सेनेची कास सोडली नव्हती, जिथे राहत होते त्या त्या ठिकाणी माझी महिन्यातून एखादी तरी शाखेवर चक्कर असायची. पुढे तो काळा दिवस उगवला 17 नोव्हेंबर 2012 माझ्यासारखी कित्येक लोक घरचा माणूस जावा अशा पद्धतीने धाय धाय रडत होती. अगदी एकमेकांच्या नातेवाईकांना माहिती करून फोनवर सुद्धा आम्ही रडलो. मी आणि माझे गावाकडची बहीण फोनवर देखील रडत होतो. आणि माझी केरळ ट्रिप तेव्हा बुक होती, दिवाळी झाल्यानंतर केरळच्या ट्रीपला जावे लागले. आणि काय योगायोग पहा केरळमध्ये जेवढी पण तीर्थक्षेत्र किंवा समुद्रकिनारा तिथे बाळासाहेब पुन्हा भेटले, त्रिवेंद्रम कन्याकुमारी आणि रामेश्वर या तीनही ठिकाणी जेव्हा आमच्या भेटी झाल्या, तेव्हाच बाळासाहेबांच्या अस्थी विसर्जनाला आल्या होत्या. प्रत्यक्षात अंतयात्रेत सामील होता आले नाही पण त्यांच्या अस्थि विसर्जनाचा सोहळा मात्र तीन ठिकाणी मिळाला. हिंदुर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या  अस्थी विसर्जनासाठी कन्याकुमारी , रामेश्वरम आणि त्रिवेंद्रम येथे आणल्या होत्या. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर बाळासाहेबांचे वालुकामय भव्य शिल्प बनवलेले होते .भगवे झेंडे चारी बाजूंनी लावलेले होते. बाळासाहेबांच्या नावाचा जय जय कार आणि अस्थी विसर्जन आम्ही याची देही याची डोळा अनुभवले. मनात दुःख तर होतेच, आम्ही पण त्या घोषणात सहभागी झालो मानवंदना दिली बाळासाहेबांना सॅल्यूट मारला डोळ्यातून चार अश्रू देखील ओघळले, पण आपले बाळासाहेब कन्याकुमारीपर्यंत फेमस आहेत इथे लोकांना त्यांचा अभिमान आहे याने आमचा ऊर भरून आला. त्यामुळे दर 17 नोव्हेंबरला हटकून त्या दिवसाची आठवण येतेच आज जरा सर्वांबरोबर शेअर करत आहे ं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Classics