Namita Tandel

Inspirational

4.0  

Namita Tandel

Inspirational

लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक

लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक

2 mins
216


मुंबई शहरातील विरारचे मेजर प्रसाद महाडिक ह्यांना २०१७ साली भारत चीन सीमेवर तैनात सुरू असताना हौतात्म्य प्राप्त झाले..मेजर प्रसाद महाडिक ह्यांचा विवाह गौरी सोबत २०१५ साली झाला होता.. परंतु पतींना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर गौरी खचल्या नाही.. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की,पुलवामा मध्ये ज्या गोष्टी घडल्या गेल्या आहेत.. त्यामुळे सगळ्या जवानांचे कुटुंब दुःखी आहेत.. त्यांना तुम्ही काय संदेश देणार?

ह्यावर गौरी अभिमानाने म्हणाल्या, मी जवानाची पत्नी असल्याचा मला गर्व आहे.. पती गेल्यानंतर लोक मला विधवा म्हणत होते..पण तरीसुद्धा मी गळ्यात मंगळसुत्र घातले.. कारण ते आजही माझ्या सोबत असल्याची मला जाणीव होते.. पुलवामामुळे अनेक कुटुंबावर संकट आले आहे.. पण त्या सगळ्यांना मी एकच सांगते आहे.. लोक येतात आणि सहानुभूती देऊन निघुन जातात.. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जवानांची पत्नी आहात.. ह्यापासुनच तुम्हाला ताकद येईल..


गौरी महाडिक वकील असुन एका कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होत्या.. परंतु पती मेजर प्रसाद महाडिक ह्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडुन दिली.. आणि लष्करात भरती होण्याचा ध्यास धरला.. त्यांना लष्करात भरती होण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले.." माझ्या पतींना मी नेहमी आनंदी राहिली पाहिजे हेच बघायचे होते.. त्यामुळे त्यांना माझा अभिमान वाटला पाहिजे असं मी केलं पाहिजे.. म्हणुन मला त्यांचा गणवेश परिधान करून लष्करात भरती व्हायचे आहे..


पहिल्यांदा 'संयुक्त संरक्षण सेवा' परीक्षेमध्ये त्यांना यश मिळाले नाही.. दुसऱ्यांदा चिकाटीने परीक्षा दिल्यानंतर सोळा जणी मधुन त्या पहिल्या आल्या.. १ एप्रिल २०१९ ला प्रशिक्षण सुरू झाले.. कठीण प्रशिक्षण संपल्यावर ७ मार्च २०२० रोजी लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या..


गौरी महाडिक ह्यांनी पतीच्या पाऊलावर पाऊल ठेऊन देशसेवेसाठी तयार झाल्या.. जेव्हा चेन्नई मधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधुन खडतर प्रशिक्षण घेऊन लेफ्टनंट म्हणुन सैन्यात भरती झाल्यानंतर पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी तेव्हा सांगितले.."वर्दी परिधान केल्यावर मला आजही मेजर प्रसाद महाडिक सोबत असल्याची जाणीव होते.. एका बाजुला त्यांना गमवल्याचे दुःख आहे पण दुसऱ्या बाजुला त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मला संधी मिळाली ह्याचा देखील आनंद आहे.. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मला जेवढी देश सेवा करता येईल तेवढी मी करणार आहे..


मेजर प्रसाद महाडिक ह्यांच्या आईला पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले, मुलाला हौतात्म्य प्राप्त झालं त्याचं दुःख आहेच.. पण दुसऱ्या बाजूला मुलाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सुन लष्करात भरती झाल्याबद्दल अभिमान आहे.. त्यांनी गौरीला अगदी तिच्या मनासारखे करण्यासाठी परवानगी दिली.."

अश्या प्रकारे पतीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशसेवेसाठी उतरली वीरपत्नी लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक देवी गौरीच्या रूपातच...


लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक ह्यांच्या देश सेवेच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम..

***********************************


स्त्री ही अनंत काळापासुन आदिशक्तीच्या स्वरूपात आहे.. पौराणिक कथेत त्या मातेला वंदन केले आहे.. बदलत्या काळानुसार स्त्रीचे रूप बदलले गेले आहे.. आई, ताई, मुलगी, बायको ह्या नात्यातील अष्टपैलू हिऱ्या सारख्या भुमिका बजावताना व्यवसाय आघाडीच्या क्षेत्रात उच्च पदावर पुरुषांच्या पुढेही गगनभरारी घेत आहेत.. मुलगा आणि मुलगी समान म्हटले जाते.. परंतु अजुनही भेदभाव केलेला दिसुन येतोच.. परंतु प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांचा इतिहास वाचला की, पुढे जाण्याची शक्ती आत्मसात करता येते..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational