Ujwala Rahane

Inspirational

4  

Ujwala Rahane

Inspirational

लेकी बोले सुने लागे

लेकी बोले सुने लागे

4 mins
466


   आई तुम्ही स्पष्ट बोलत जा, उगाच घालून पाडून नको. जे आहे ते मला सांगा माझ्या चूका मी दुरुस्त करेन.

आज स्नेहा थोडी जास्तच रिअ‍ॅक्ट झाली.कारण आजकाल तिच्या सहनशक्तीच्या पलिकडे झाले होते.


  स्नेहा एका software कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. आशिष आणि स्नेहाचा प्रेमविवाह. तो ही . त्यामुळे अचार विचार संस्कृती यात जमीन अस्मानाचा फरक. 


 आशिषच्या घरात खुपच धार्मिक वातावरण. देवधर्म कुळधर्म कुलाचार. नेहमीच चालायचे.स्नेहाला सगळेच नवीन,देवधर्म तिच्या ही घरात होता. पण सतत देवदेव करत बसायला कोणालाच वेळ नव्हता. आई थोडेफार करायची ते ही सणावाराला. पण बाबा जास्त देवाला मानायचे नाहीत.


  आईबाबा दोघेही पेशाने डॉक्टर होते. ते आपल्या रुग्णसेवत देव जास्त शोधायचे.एकंदरीत दोन्हीही घरातील वातावरणात जमीन अस्मानाचा फरक होता. 

  त्यात सासुबाईंना स्नेहा पसंतच नव्हती. पण शेवटी आशीषचा ठाम निर्णय. त्यामुळे त्यांना झुकावे लागले.


  सासुबाईंना भावाची मुलगीच सुन म्हणून आणायची होती. तसा त्या भावाला शब्द देऊनही बसल्या होत्या.

भावाची मुलगी दहावी बारावी झालेली. घरकामात हूशार. सगळे स्वयंपाक पाणी व्यवस्थित करायची.


  मुख्य म्हणजे आत्या आली कि, तिच्या पुढे मागेच असायची. मग काय आत्या बाईच्या ऐकण्यात होती. म्हणून त्यांना आवडायची नाही म्हणजे काय आवडलीच होती.पण आशीषने काकूबाई म्हणून तिला चक्क नकार दिला होता. हे दु:ख त्यांच्या मनात सलत होते.


   आशीषचे वडील मात्र नेहमीच स्नेहाचे कौतुक करायचे .कारण स्नेहा अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. सगळ्यातच तीची कुशलता होती. सहज आणि सुबकता तिच्या कामात होती. मुख्य म्हणजे जे येत नाही ते शिकून घेण्याची तिची धडपड असायची.


  घरातील सगळे करून ती आपले क्षेत्रातही अग्रेसर होती. पण नावडतीचे मीठ आळणी तद्वत. सासुबाईं नेहमीच तिच्यात चुका काढायच्या. कोणावर ना कोणावर घालून. तिला काहीबाही बोलत राह्यच्या. सतत तिचे संस्कार, सोवळेओवळे यावर टिकाटिपण्णी असायची. 


  स्नेहाला हे कळायचे शेवटी लेकि, बोले सुने लागेच ना! पण ती शांत असायची कारण घरातील वातावरणाचा आपल्या आॉफीसच्या कामावर परिणाम होणार नाही. यासाठी दक्ष असायची. 


 पण कधी कधी अती झाले कि, त्याचे पडसाद तिच्या आॉफीसवरील कामावर पडत मग तिकडे बॉसचे टोमणे चालू होत.स्नेहा घर आणि आॉफीस वेगळे ठेव.लग्न झाले आहे आम्हाला माहीत आहे. कामात चूका नको. स्नेहाला वाईट वाटायचे. 


  सासरे नेहमीच स्नेहाची समजूत घालायचे. निवळेल वातावरण म्हणायचे.आशीष पण खुप चांगला होता. त्याच्या मध्ये व आई मध्ये खटके उडायला नको म्हणून ती त्याला काही सांगायची नाही. यामुळे सासुबाईंचे चांगलेच फावायचे. कळत नकळत मी किती चांगली आहे हे दाखवून द्यायचा त्या प्रयत्न करायच्या.

 

  आज तेच झाले. सकाळीच त्यांची भाच्ची आली होती. सासुबाईं सकाळ पासून गरज नसतानाही स्वयंपाकघरात लुडबुड करत होत्या. एरवी कधीही स्वयंपाकघरात न फिरकणाऱ्या सासुबाईंना आज बरेच पदार्थ करायचे होते.आपल्याकडे असे करतात हे तसे करतात. असे परत, परत भाच्चीला सांगत होत्या.


 खुप दिवसात आपल्या पद्धतीचे वरण खाल्लेच नाही आपण कुठे सगळ्या पदार्थांत कांदा टोमॅटो घालतो. सोवळ्यात चालत पण नाही. त्यात भाच्ची बाई पण भर घालत होत्या. हो ना आत्या आज्जीच्या पध्दतीनेच आई सगळे करते. आणि मी पण. मी पण ग माझ्या सासुबाईं सांगतिल तसेच करायची. पण आता sss


  स्नेहा सगळे ऐकत होती. एकीकडे तिचा रोजच्या प्रमाणे हात चालत होता आणि एकिकडे ति आयपॉडवर आजच्या क्लाएंट बरोबरच्या मिटींगची तयारी करत होती. 


  आत्या भाच्चीच्या चाललेल्या सुसंवादाने तिला कामात बराच व्यत्यय येत होता.तिचे मन मधून मधून विचलित होत होते. 


  अचानक तिकडून मॅनेजर ओरडला. स्नेहा आधी घरचे काम आटप आणि मग आॉफीसच्या कामाचे डिस्कशन करू एक काहीतरी काम करा तुम्ही बायका.एक ना धड भाराभर चिंध्या नुसत्या घरीच बसा त्यापेक्षा. स्नेहाला बॉसचे शब्द मनाला खुप लागले.


 म्हणूनच ती आज पहिल्यांदा भडकली. आई आमच्या कडचे रितीरिवाज खुप वेगळे आहेत. सोवळे ओवळे आम्ही शब्दाचे पाळतो.


 आईबाबांनी कोणाला ही दुखवायचे नाही हे संस्कार केले माझ्यावर. आई तुम्हाला काय हावे तसेच मी करते. आशीष आणि बाबांना आवडते भाजीत टोमॅटो कांदा. हे तुम्हीच सांगितले. 


  माझी आवडनिवड कधीच मी सांगितली नाही आणि तुम्हीही कधी विचारली नाही. आणि आईबाबांचे संस्कार म्हणून कधी उलट बोलत नाही. आशीषवरचे प्रेम मला हे सगळं सहन करायला सहनशक्ती देते.


  देवघरातील स्वामी मला सांगतात

तेंव्हा काय जे बोलायचं ते मला सरळ सरळ बोला कोणावर घालून नको.


 त्यामुळे उलट तुमच्याविषयी आदर निर्माण होईल अनादर नाही. शेवटी ति म्हण आहेच ना ज्याचा उपयोग तुमचा नित्य व्यवहारात असतो. मला पण त्या म्हण आचरणात आणायला भाग नका पाडू. चला निघते मी. 


 मला आॉफीस मध्ये आज मिटींग आहे. सगळे व्यवस्थित करून ठेवले. आहे. समर्थांच्या फोटोला हार व पेढे पण आणून ठेवले आहेत. आज गुरूवार ना! 


  येते मी थोडा उशीरच झाला आज. आल्या वर छान गप्पा मारू रश्मी ताई, वेगळ्या विषयांवर आणि रश्मी ताईंना रसगुल्ले आवडतात ना ते पण करुन ठेवले आहेत आणि हो रश्मी ताई संध्याकाळी मी लवकरच येईल हं! मग मस्त फिरवून आणते तुम्हाला. तयार रहा!


 स्नेहा आॉफीसची तयारीला लागली. झटपट छान तयार होऊन ती बाहेर पडली सुध्दा. गॅलरीतून रश्मी बघत होती तर सासुबाईं आता ही रश्मी आपल्याला काय बोलणार म्हणून अचंबित होऊन रश्मी कडे बघत होत्या. स्नेहा मात्र मस्त फोरव्हीलर सफाईदारपणे गॅरेज मधून बाहेर काढत होती. गाडी चालवताना बॉसला सुनावण्यासाठी बॉससाठी लेक शोधत होती. कारण लेकि बोले सुने लागे ना!.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational