"लेखणी"
"लेखणी"
मी पाहिले या लेखणीला...
'बुधभूषण' लिहिताना,
१४ व्या वर्षी संस्कृत भाषेतून,
राजनितीशास्त्र रचताना....
मी पाहिले या लेखणीला...
'शेतकऱ्यांचा आसूड' लिहिताना
ब्राम्हणवादाला नष्ट करुन
दलितांवरील अन्यायाला दूर करताना..
मी पाहिले या लेखणीला
'काव्यफुले, बावनकशी लिहितांना ..
सत्यशोधक समाज उभारून
प्लेग रोग्याची सेवा करताना...
मी पाहिले या लेखणीला
राज्यघटना लिहिताना,
गिधाडांचे राज्य बाजूला सारून
गुलामगिरीला नष्ट करताना...
मी पाहिले या लेखणीला
'फकिरा' कांदबरी लिहिताना,
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या,
झुंजार लेखणीला अर्पण करतांना...
मी पाहिले माझ्या लेखणीला
महामानवांचा इतिहास लिहिताना
सर्वांच्या विचारांची माळ गुंफून
त्रिवार वंदन करताना...
