Smita Bhoskar Chidrawar

Drama

4.0  

Smita Bhoskar Chidrawar

Drama

लेकाच् माहेरपण

लेकाच् माहेरपण

2 mins
225


मुलं हळूहळू मोठी होतात ...आईच्या मागे मागे करणारं मुल अचानक आईचा हात सोडून चालायला , पाळायला लागतं आणि त्याचे पंख आकाशात भरारी मारण्यासाठी सज्ज होऊ लागतात...आकाशाला गवसणी घालायाच्या स्वप्नांनी त्याला घरटं सोडून जावं लागणार असतं. आईचं मन याला तयार नसतं , माझं एव्हढस पिल्लू आपल्या शिवाय कसं राहील याची काळजी सतत तिला वाटत राहते...

पण आपली स्वप्न सत्यात उत्रवावित म्हणून शेवटी तिला हृदयावर दगड ठेवावाच लागतो . आणि तो दिवस येतो ...आईला आणि पिल्लालही त्याच्या शाळेचा पहिला दिवस आठवतो . पण फरक इतकाच की तेव्हा पिल्लू आईला सोडून जायला तयार नसतं, ते रडत असतं आणि आई त्याला समजावत असते . पण आता मात्र आई रडत असते आणि पिल्लू तिला समजावत असतं. खरंच आपलं पिल्लू इतकं शहाणं आणि समजदार झालं ते तिचं तिलाही कळत नसतं ...

थोड्याच दिवसात पिल्लू छान सेटल होतं आणि आई बाबा पण निर्धास्त होतात . आणि मग सगळ्यांनाच वेध लागतात ते सुट्टीचे...बहुतेक सगळ्यानाच क्रिसमसची सुट्टी असते आणि मग आई सज्ज होते लेकाच्या किंवा लेकीच्या माहेरपनासाठी ...हो हे महेरपणच असतं लेकरांच...लग्न झालेली मुलगी कशी माहेरी येते आणि लाड करून घेते अगदी तशीच ही लेकरे मनसोक्त माहेरपण अनुभवतात ...घरात अगदी सगळे सणवार याच सुट्टीत साजरे होतात ....

' लेक येता घरा ...तोची दिवाळी दसरा ' असं म्हणत घरात रोजच सणवार साजरे होत असतात...


 तो येण्याआधीच सगळ्या घराला त्याचे वेध असतात लागलेले..

स्वागतासाठी त्याच्या डोळे असतात आसुसलेले...

दिवाळी , दसरा सगळे सणवार 

आता असतो फक्त एकच सण तो म्हणजे लेकवार...

लेकाच्या प्रेमानं माय बाप सुखावतात ...

त्याच्या सहावासासाठी ऑफिसला दांड्याही मारतात...

सहवासात त्याच्या सारेच सुखावतात...

सगळं काही विसरून फक्त त्याच्या पाहुणचारात रमतात...

प्रेमाच्या , नात्यांच्या रोषणाई मध्ये घर उजळत...

आणि लेकाच माहेरपण करतांना भरून ते पावत ...

काय करू आणि काय नाही असं सगळ्यांना होतं...

लेकरू सुद्धा मग आईच्या कुशीत प्रेमाने विसावत ...

रोज नव्या पदार्थांची घरात असते रेलचेल..

लेकरासाठी होत असते आईच्या जीवाची घालमेल...

परतीचा हळवा, नकोसा क्षण येतो आणि पुन्हा एकदा पिल्लू घरातून उडून जातो...

सोबत आईने दिलेली मायेची शिदोरी अगदी पुरवून पुरवून ठेवतो...

आणि हृदयाच्या कप्प्यात प्रेम साठवून घेतो...

हसत हसत निरोप द्यायचा हे पिल्लाने अगदी निक्षून सांगितलेल असतं ...

म्हणूनच ओठावर हसू पण मनात मात्र अश्रूंचा धबधबा बरसत असतो...

आणि डोळ्यात पाणी दिसू न देता घरट्याचा प्रत्येक कोपरा आई बाबांच्या सोबत पुढच्या सुट्टीची वाट बघत राहतो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama