Smita Bhoskar Chidrawar

Drama Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Drama Others

गौराई माझी लाडाची

गौराई माझी लाडाची

8 mins
257


" बाई बाई , मनमोराचा कसा पिसारा फुलला " 

" फुलले रे क्षण माझे , फुलले रे " विभाच्या मैत्रिणी अगदी मनसोक्त चिडवत होत्या आणि विभाच्या गालावर फुललेले गुलाब बघून त्यांना भारी मज्जा वाटत होती.खूप मोठा ग्रुप नव्हता त्या मैत्रिणीचा मोजक्याच पण अगदी जिवाभावाच्या होत्या त्या सगळ्या.आणि सगळ्यात पहिला नंबर लाऊन आज विभाचं लग्न ठरणार होतं त्यामुळे सगळ्या अगदी खुश होत्या.

आज जय आणि विभाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी जयच्या घरचे सगळे येणार होते.आणि विभाला तयार करण्यासाठी सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या. चेष्टा मस्करीला अगदी उधाण आलं होतं.

" इतका राजबिंडा नवरा कसा काय पटवलास ग ? राज क्या है जरा हमे भी तो बताओ " कविता वीभाला चिडवत म्हणाली .

विभा दिसायला साधारण पण जय मात्र अगदी हँडसम होता त्यामुळे त्याने विभाला इतक्या सहज कसं पसंत केलं हे सगळ्यांनाच पडलेलं कोडं होतं . विभा सावळी , कमनीय बांध्याची पण अतिशय हुशार होती .नुकतीच उत्तम गुणांनी पदवी घेऊन नोकरी सुरू केली होती तिने .कोणीही अगदी सहज स्मार्ट म्हणावे इतपत सुंदर तर नक्कीच होती .पण जय मात्र दिसायला अगदी देखणा होता , कसाबसा पदवी मिळवून स्वतःचा व्यवसाय करत होता.अगदी सधन असं कुटुंब , एकुलता एक मुलगा त्यामुळे जयने विभाला पसंत केल्यावर विभाच्या घरचे लगेच तयार झाले .

दोन मुली आणि , साधारण परिस्थीती असल्यामुळे विभाचे लग्न इतक्या चांगल्या घरी होतेय म्हणून तिचे आई बाबा खूपच आनंदात होते.

विभाला सुद्धा जय मनातून आवडला होता .अगदी पहिल्याच भेटीत दोघानी आपली पसंती दर्शवली होती .एकांतात प्रेमही प्रकट केलं होतं .आता सगळं नीट जुळून पटकन लग्न व्हावे अशी सगळ्यांचीच इच्छा होती.

" पोरीनो आटपलं की नाही तुमचं ? मंडळी कधीही येतील बरं .आणि आता चला माझ्या मदतीला स्वयंपाकघरात पुरे झाली ती थट्टा मस्करी. विभा , खरंच नशीब काढलस ग पोरी.आता अशीच आनंदात रहा " विभाच्या आई सुधाबाई म्हणाल्या.एकीकडे आनंद तर दुसरीकडे लेक दूर जाणार म्हणून हुरहूर लागली होती त्यांच्या मनाला.पोरीला काही क्षण मिठीत घेऊन त्या लगेच कामाला निघून गेल्या.आपले दुःख प्रकट करावे की आनंद हेच त्यांना कळत नव्हतं.

" नजर ना लगे , किती गोड दिसतेय ना विभा ? " रश्मी म्हणाली 

" जीजूची विकेट डाऊन होणार " विद्यासुद्धा सामील झाली 

विभा लाजून चूर झाली होती . तिचं मन जयच्या विचाराने धडधडू लागलं .

मंडळी आली , जयची नजर विभाला शोधू लागली .विभाच्या मैत्रिणी चोरून आसुसलेल्या जयला बघत होत्या . विभाची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती.

" दो दिल मिल रहे है , मगर चुपके चूपके " स्वप्नाने पुन्हा चिडवायला सुरुवात केली.

अखेर लाजत लाजत विभा बाहेर आली .सुंदर गुलाबी साडी , कानात आणि गळ्यात मोत्याचे नाजूक दागिने , हातात मोत्याच्या बांगड्या , सुंदर हेअरस्टाइल आणि हलकासा मेकअप , आज ती खरंच अगदी गोड दिसत होती. तिचं मोहक रूप बघून आज खरोखर जयची विकेट डाऊन झाली होती.

" आज मान मोडणार आहे एका माणसाची , वर बघून बघून . विभा बस बाई " निशा हळूच म्हणाली आणि जय लाजला .

विभाही खरंच जयवर मोहित झाली होती. नेव्ही ब्लू कलर च्या शर्ट मध्ये जय अगदी एखाद्या हिरोसारखा दिसत होता .

सगळी बोलणी झाली , आणि लग्न ठरलं !

सगळीकडे अगदी आनंदी आनंद झाला. लवकरचाच मुहूर्त ठरला .सगळ्यांच्या परवानगीने जय आणि विभा बाहेर फिरायला गेले . जयने संधी मिळताच विभाचा हात हातात घेतला . विभाच्या मनात मोरपीस फिरलं .तसा जय शांतच होता आणि विभा बडबडी पण आज तिला बोलायला शब्दचं नव्हते. 

वेळ कसा भुरकन निघून गेला ते कळलंच नाही दोघांना .

जय विभाला घेऊन सोनाराच्या दुकानात गेला आणि तिला हवं ते घे म्हणाला. पण विभा नको म्हणाली तसं जयला राग आलेला तिला स्पष्ट जाणवला पण तरीही तिने महागडी भेट घेणे टाळलेच . मग ते एका ड्रेसच्या दुकानात गेले आणि जयने त्याच्या पसंतीचा ड्रेस विभासाठी घेतला .विभाला तो फारसा आवडला नव्हता पण तरीही तिने जयच मन मोडायच नाही म्हणून ' छान आहे ' अशी कॉम्पलीमेंट दिली आणि दोघेही घरी निघाले .

घरी येताच सगळ्यांनी अगदी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली 

 " जय कसा आहे ? " 

" बोलका आहे की शांत आहे ? "

" कुठे कुठे गेला होतात ? " 

" स्वभाव कसा आहे ? " 

" काय खाल्ले ? त्याला काय आवडतं ? " 

" काय काय केलं ? " एक ना दोन , इतक्या प्रश्नाने विभा बावरली आणि तिने हसून फक्त जयने घेतलेला ड्रेस दाखवला आणि सोन्याची वस्तू घ्यायला आपण नकार दिल्याचेही सांगितले .

" काय हे सगळेजण अगदी तुटून पडलात माझ्यावर ! चांगले आहेत खूप जय , आणि इतक्या कमी वेळात स्वभाव कसा कळेल मला ? होईल ना ओळख हळूहळू " विभाने लाजत सांगितले .

" बरं झालं ग तू काही घेतलं नाहीस ते सोन्याचं . आणि तुझा स्वभाव इतका लाघवी आहे की तू चटकन आपलंसं करशील सगळ्यांना .कित्ती महागडा दिसतोय ड्रेस ? " बाबा म्हणाले .

" हो ग खरंच , दृष्ट काढावी लागणार आज पोरीची " आईच्या डोळ्यात पाणी आले .

" ताई मी ट्राय करते ना हा ड्रेस बघू तरी जीजुची चॉईस आणि हे काय ग आहो जाहो बोलतेस ? सरळ अरे जया , जानू असं म्हणायचं " विभाची धाकटी बहीण अंजली म्हणाली .

" अग ए अंजू , आगाऊपणा बंद कर बरं तुझा , असं चारचौघात अरे तुरे म्हणतात का ? जास्त शहाणपणा वाढलाय तुझा , आता शहण्यासारख वागा . पुढच्या वर्षी तुमचाच नंबर आहे बरं लग्नाचा . आणि तो ड्रेस दे बघू तिचा तिला परत .जावईबापूंनी दिलाय पहिली भेट म्हणून . " आईने तंबी दिली .

आज सगळेच खुप आनंदात होते .विभाचं लग्न इतक्या चांगल्या घरात होणार म्हणून सगळ्यांचीच काळजी मिटली होती .घरची मंडळी सुद्धा चांगली वाटत होती .

लग्न लवकरच होणार असल्यामुळे उद्याच खरेदी करून घ्यावी असं ठरलं होतं . म्हणजे जयकडचे परत जाऊ शकणार होते .त्याची आत्या गावातच असल्यामुळे ते सगळेजण तिकडेच राहणार होते .

" उद्या जरा बजेट बघून करा बरं खरेदी .तश्या तुम्ही दोघी समजदार आहातच पण तिकडच्या मंडळींची पसंती बघूनच घ्या सगळं " बाबांनी प्रेमळ सूचना दिली .

" हो हो , काळजी नका करू . मंडळी खूपच साधी आहेत हो . जयच्या आई लताताई तर अगदी साध्या भोळ्या वाटतात नाही ?.पण विभाचे सगळे कपडे मात्र त्यांच्याच पसंतीचे घेऊया आणि जयला सुद्धा हवं ते घेऊ द्या . थोडक्यावरून उगीच प्रोब्लेम नको " आई म्हणाली .

सगळी मंडळी खरेदीला जमली . बायकांनी बायकांची खरेदी सुरू केली आणि पुरुष जयला घेऊन गेले .विभाला पैठणीची खूप हौस होती आणि एक छानसा घागरा घ्यायचं तिच्या मनात होतं पण साध्या भोळ्या दिसणाऱ्या तिचा सासूबाईंनी तिला.   ' शालुच घे ' म्हणून सांगितलं आणि जयच्या घरच्यांनी बाकीही साड्याअगदी भारी भारीतल्या निवडल्या .

विभा आणि सुधाबाई त्यांच्यापुढे काही बोलू शकल्या नाहीत .विभाने एक दोनदा बोलायचा प्रयत्न केला पण आईच्या दटावण्यामुळे ती गप्प बसली .त्यांचं बजेट पार कोलमडून गेलं .

तितक्यात जय आणि मंडळी त्यांची खरेदी आटोपून आली .बाबांचा चेहेरा उतरला होता .

" दादा बघ या साड्या आम्ही सिलेक्ट केल्या आहेत वहिनीसाठी बघ कुठल्या फायनल करायच्या त्या. तुझी पसंती माहीत आहे आम्हाला " जयची बहीण सरिता म्हणाली .

जयने अगदी महागातल्या साड्या पसंत केल्या आणि ते सगळे निघाले .विभाला त्याने तिची पसंती विचारली पण ती ही अगदी जुजबी .जयचे कपडे सिलेक्ट करतांना त्याने आपल्याला बोलवावे असे विभाला खूप वाटत होते पण त्याने तसे काहीच केले नाही . त्याचा सूट तिला आजिबात आवडला नव्हता पण ती गप्प बसली.

खूप मोठं बिल भरून विभाच्या बाबांना टेन्शन आलं होतं .पण त्यांनी ते चेहेर्यावर आजिबात दाखवलं नाही .घरी आल्यावर मात्र कोणालाच आपलं मन मोकळं केल्याशिवाय रहावलं नाही.

" काय ग हे आई मला काहीच माझ्या मनासारखं घेता आलं नाही . माझं लग्न आणि माझ्या सगळ्या साड्या त्यांच्या पसंतीच्या ? पैठणी आणि घागरा घ्यायचा होता मला तर ते महागडे शालू घ्यावे लागले .आता दागिनेही त्यांच्याच पसंतीचे का ग ? शी बाबा मुडच गेला माझा " विभा खूपच दुःखी होती.

" अग माझ्या बजेटची तर पार वाट लागली . आता बाकीचा खर्च खूपच कमी करावा लागेल. बघुया काहीतरी , पण जावईबापू आणि मंडळी खुश आहेत यातच सगळं आलं. विभा बेटा इतकं काय घेशील की अजून साड्या , त्यात काय इतकं ? " दिलीपराव म्हणाले.

" हो ग विभा बाबा म्हणतात ते बरोबरच आहे .ती मंडळी खुश राहायला हवीत .इतकं चांगलं स्थळ मिळालं आपल्याला .उद्या आता साड्या ब्लाऊज तयार करायला दे .उगीच विचार करू नको . बाकीचा खर्च कमी करू आपण .मला आहेत नव्या साड्या आणि बाबांनासुद्धा आहेत चांगले कपडे आम्हाला काही घ्यायची गरज नाही ." आई समजवण्याच्या सुरात म्हणाली.

विभाच्या डोक्यातून मात्र हे जातच नव्हतं.इतका खर्च झाला आणि तो ही आपल्या पसंतीच्या काहीच साड्या नाहीत हे तिला पटत नव्हतं.

विभाने तिच्या जिवलग सख्यांपाशी आपलं मन मोकळं केलं . स्वप्नाच्या डोक्यात एक मस्त प्लॅन आला आणि लगेच त्यांनी त्यावर अंमल केला..

विभाने विनयच्या आईला म्हणजे तिच्या होणाऱ्या सासूबाईंना फोन लावला " मम्मी नमस्कार ! अहो एक प्रोब्लेम झालाय .आपण काल खरेदी केलेल्या साड्यातल्या दोन साड्या मध्ये डिफेक्ट आहे हो . शालू मध्ये सुद्धा बारीक धागा निघालेला दिसतोय .काय करू ? मी बदलून घेऊ का साड्या ? आता लवकरच करावं लागेल म्हणजे माझे ब्लाऊज वगैरे वेळेवर शिवून होतील . काय करू सांगा ना ? " 

" अगं बाई ! असं झालं का ? आता दुसरं काय करणार ? तश्याच प्रकारच्या सारख्या साड्या बघून घे बदलून .असतील तिकडे आणि बाकीची तयारी करून घे .फार छान मिळाल्या होत्या तुझ्या साड्या पण काही इलाज नाही आता .चांगली झाप त्याला आणि तश्याच साड्या दे म्हण.कळव मला काय झालं ते .लगेच जा आणि सांग काय झालं ते ." लताबाई म्हणाल्या.

सगळ्याजणी परत साडीच्या दुकानात साड्या घेऊन गेल्या आणि त्या बदलायच्या आहेत अशी रिक्वेस्ट केली.बिल आणल्यामुळे काहीच प्रोब्लेम नव्हता.सगळ्यांनी मिळून मग शालू ऐवजी विभासाठी आणि तिच्या आईसाठी सुंदर पैठणी घेतली.हळदीची पिवळी साडी आधीसारख्या पॅटर्नची पण कमी किमतीची अशी घेतली. अशीच काहीतरी ट्रिक करून सगळ्या साड्या बदलून कमी किमतीच्या साड्या घेतल्या आणि त्या पैशात आईसाठी आणि जवळच्या लोकांसाठी साड्या घेतल्या.


काही वेळाने विभाने फोन करून साड्या बदलून आणल्याचं लताबाईंना सांगितलं आणि प्रेमाने सगळं सोल्व्ह केलं .

घरी येऊन आई बाबांना हे सगळं सांगितल्यावर आधी तर आईला काळजीच वाटली पण सगळं ठीक आहे असं समजल्यावर आईला आपल्या लेकीचा अभिमानच वाटला.

मायलेकी खरेदी बघण्यात हरवल्या . 

सध्या तरी सगळं ठीक आसलं तरीही आईच्या मनात कुठेतरी लेकीची काळजी सलत होती.काहीतरी लपवलं होतं पण ते कुठेही प्रकट न करण्यातच शहाणपण होतं.

लग्नाच्या वेळी विभाच्या सासूबाई आणि नणंद साड्या बघून जरा नाराज झाल्या पण सगळ्यांनी कौतुक केल्यावर त्यांच्या चेहेर्यावर आनंद दिसला . लताबाईंनी मनातल्या मनात देवाला हात जोडले आणि आपल्या लेकिबद्दल असलेला अभिमान पुन्हा एकदा सार्थ झाला .


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama