akshata alias shubhada Tirodkar

Classics

2  

akshata alias shubhada Tirodkar

Classics

लाटा

लाटा

2 mins
73


खळखळता समुद्र आणि फेसाळलेल्या लाटा आणि ती किनाऱ्यावर एकटीच बसून समुद्राला न्याहाळात होती एवढ्यात तिला कोणी तरी हाक, मारली तिनी त्याच्याकडे पहिले तो सरळ येऊन तिच्या शेजारी बसला त्याने तिच्याकडे पहिले तिचा चेहरा उतरला होता.

"रेवा, इथे एकटीच आलीस?"

"हो तू हि, एकटाच आहेस की"

"मी नेहमी एकटाच एवेव्हनिंग वॉल्क साठी येतो पण तू"?

रेवा चे उत्तर न आल्याने "काय झालं रेवा तुझा चहेरा उतरलेला"?

रेवा ने सिद्धार्थ कडे पाहून म्हटले "तुला काय नवीन सांगू नेहमीचंच"

"म्हणजे, आज पण वाद झाला"

"हो"

"पण, कारण काय "?"

"कारण कशाला हवे आमचे स्वभावच मिळत नाही मग वाद होणार" 

"पण, काहीतरी मूळ असणार ना"

"काही नाही आज जरा लवकर ये बाहेर जाऊया माझ्या बहिणीकडे तर सुरु झालं माझी कामे तिथेच ठेवून तुच्या बरोबर फिरतो मग काय वाद झाला मन अशांत वाटत होत सकाळ पासून म्हणून सरळ दुपारीच इथे येणे केले"

"काय बोलू आता तुमच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली तशी तुमची भांडणे हि वाढत आहे कुठे तरी विराम व्हायला हवा"

मी विराम देऊन काय फायदा समोरून पण यायला हवे ना"

"ते हि खरं आहे रेवा मी बोलून पाहू का कारण मी तुला हि ओळखतो आणि त्यालाही"

"नको उगीच आणखी वाद वाढेल"

"ओके मी नाही बोलणार पण, कुठे तरी नात्यात समंजसपणा यायला हवा"

"हे त्याला कळत नाही, आमचं लग्न ठरलेले तेव्हा माझी आणि रिषभ ची पत्रिका जुळली गुण ही जुळले आणि सगळ्यांनी सुस्कारा सोडला असं म्हणतात ना कि पत्रिका आणि गुण जुळले कि संसार सुखाचा होतो पण माझ्या बाबतीत असे काहीच घडले नाही मुळात गुण जुळून ही आमचे स्वभाव खूप भिन्न आहेत त्यामुळे नेहमी वाद होतात"

"खरं आहे, तूच पत्रिका गुण ह्या पेक्षा त्याची मन जुळतात का हे पहिले पाहिजे फक्त चेहऱ्यावर पाहून आपण होकार देतो पण तोच चेहरा मग रंग दाखवतो"

"हो ना रिषभ मला पाहतच क्षणी भावाला पण त्याचा स्वभाव खूप वेगळा आहे"

"हो रेवा पण तू उदास होऊ नकोस" 

"नाही, अजिबात नाही तुला माहित आहे मी सध्या एकच गाणं माझ्या मनी गुणगुणत आहे "तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं में" मी माझ्या मनातली व्यथा कोणाला सांगू शकत नाही एक तुला मनमोकळे पण सांगू शकते आई बाबा जर कळले तर खूप दुःख होईल"

"हे बघ रेवा, मी एक मित्र म्हूणन नेहमी तुझ्या पाठीशी उभा होतो आणि राहणार तू चिंता करू नकोस जोरात येणाऱ्या लाटा कश्या किनारयावर येऊन शांत होतात तसेच रिषभ चा स्वभाव बदलेलल"                             

"त्याच दिवसाची मी वाट पाहते कि तो ही असाच किनाऱ्यावर माझ्या बरोबर बसून माझ्याशी चार प्रेमाचे शब्द बोलेल."

एवढ्यात, एक जोरात लाट येऊन रेवाच्या पायाला स्पर्श करून शांत झाली.                                                                      


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics