कथा एका बातमीची
कथा एका बातमीची
आजच्या स्पर्धात्मक युगात जो तो धावपळ करित जीवन जगत आहे. जीवन जगणे साधे-सोपे काम राहिले नाही. जीवन जगणे म्हणजे रोजच तारेवरची कसरत करणे होय. समाजात अनेक प्रकारचे लोक जीवन जगत असतात.
गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला आपआपल्या परीने पाहिजे तेवढी मेहनत ही करावीच लागते. मग ती मेहनत बौध्दीक असो वा असो शारिरीक.
कोणी शारिरीक मेहनत करुन आयुष्यभर राबराब राबुन कुटुंबाचे पालन पोषण करतो. तर कोणी आपल्या बौध्दीक पातळीचा कस व निकष लावुन जीवनाचा गाडा खेचत असतो.
असेच बौध्दीक व शारिरीक मेहनत करुन प्रत्येक जण सुख असो वा दु:ख ..त्या गोष्टीचा बाऊ न करता आयुष्य जगत होते. आयुष्यात आपले समाधान हे थोड्याश्या गोष्टीत जास्त मानुन...!
पण एक दिवस , एक दिवस काय झाले...! अचानक एक हादरुन सोडणारी बातमी सर्व वर्तमानपत्रात, सगळ्या न्युज चॅनेल वर आली. त्या बातमीने संपुर्ण देशात आणि मग हळुहळु संपुर्ण राष्ट्रात, संपुर्ण राज्यात, जिल्ह्यात, शहरात व हळुहळु छोट्या मोठ्या गावातही पसरली.
त्या बातमीने सर्वत्र खळबळ माजली, सर्वत्र हाहाकार माजला. लोक विस्मयाने हादरुन गेले.लोकांच्या मनात खुप भिती निर्माण झाली.
ती बातमीही तशीच होती. सगळ्यांनाच हादरुन सोडणारी होती. प्रत्येकाच्या मनात जगण्याची व मरण्याची भिती निर्माण करणारी होती.
ती बातमी होती, संपुर्ण जगात, आपल्या देशातही कोरोना नावाची महाभयंकर महामारी आगीसारखी पसरली आहे. ही होती. जेव्हापासून या कोरोना नावाच्या आजाराचा फैलाव संपुर्ण जगात व आपल्या देशातही झाला. तेव्हापासून देशातला ,शहरातला, गावातला प्रत्येक जीव खुप हादरला होता.घाबरुन गेला होता. कारण ही महामारी संक्रमणाने पसरणारी होती. एखाद्या माणसाला समजा या आजाराची लागण झाली ,आणि तो व्यक्ती जर दुसऱ्याशी संपर्कात आला की, त्या दुसर्यालाही ह्या आजाराची लागण ताबडतोब व्हायची. आणि लागण झालेला माणुस जर गर्दीच्या ठिकाणी फिरत राहिला तर,त्याच्या संपर्कात जेवढे लोक येतिल ,तेवढ्या लोकांना त्या महामारीची लागण झाल्याशिवाय राहत नव्हती.
हि बातमी वर्तमानपत्रात, टिव्हीवर आणि अशा अनेक माध्यमातून प्रत्येक लोकांपर्यंत पोहचली होती. जो तो व्यक्ती या बातमीने हादरला होता.कोरोना हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होतो, हे निदर्शनास आले. पण यावर पाहिजे तशी ठोस औषधी व परिपूर्ण उपचार निघाला नव्हता. या आजारात रोगी पूर्णतः कमजोर व अशक्त होत होता. त्याच्या छातीत,नाकात, कफ जमा होऊन श्वास घेण्यास त्रास होत होता. श्वास नलिका मानवाची काम करत नव्हती. लोकांना ऑक्सिजन पुरविणे कठिण होत होते. जेवण चालत नव्हते.
आजाराची लक्षणे...!
जेवण करण्याची इच्छा न होणे,
अशक्तपणा अंगात खुप येणे,
गळ्यात व छातीत, नाकात कफ तयार होणे.
नाकाला श्वास घेण्याचा त्रास होणे.
ताप येणे, उलटी, मळमळ वाटणे.
इत्यादी लक्षण वाटायचे.
राष्ट्रीय स्तरावर,राज्य स्तरावर, शहर, गावखेड्यात जिथे तिथे रुग्ण आढळून येत होते. रोजची आकडेवारी वाढतच होती.लोक त्या वातावरणात, त्या येणाऱ्या रोजच्या बातमीपासुन व त्या पाॅझीटिव्ह रुग्णांच्या रोजच्या वाढत्याआकडेवारी
पासुन भयभीत होऊन कंटाळले होते.
सरकारने कडक धोरण अवलंबिले होते. जिथे तिथे राज्य पातळीवर, तालुका,जिल्हा, शहर पातळीवर कर्फ्यू लागणे सुरु झाले होते. रोजच लोकांचे रस्त्यावर फुकट फिरणे कमी झाले होते. रस्ते ,माॅल,दुकाने, बाजारपेठा ओस पडल्या होत्या. लोक घरात बसुन भितीने कंटाळून गेले होते. शेवटी किती दिवस असेच चालेल. असा प्रश्न प्रत्येकालाच रोजच पडत होता.
फक्त अत्यावश्यक वस्तुंची दुकाने एक दिवस आड चालु असायची. गर्दीत फिरणे, गर्दी करणे, पाचच्या संख्येने नाही फिरणे. हे सगळेच नियम सरकारने लावले होते.
लहान मुलांना या महामारीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळा ,तसेच काॅलेज बंद ठेवण्याचे फर्मान सरकारने काढले होते. गोळक्याने राहणे व फिरणे सरकारने बंद केले होते .किराणामाल दुकान, जनरल खाद्यपदार्थाची दुकाने, पेट्रोल, मेडिकल स्टोअर्स, हाॅस्पीटल चालु होती.
कितीतरी दिवस एस. टी महामंडळ , रेल्वे ,विमानसेवा बंद होती, कारण इकडून तिकडे गेल्याने ,एकदुसर्याच्या संपर्कात येण्याने हि महामारी वाढतच होती.
परगावचे मजुर मिळेल त्या साधनाने आपल्या गावी जात होते. कोणी बैलगाडी,ट्रकनी आपल्या मुळ गावी परतत होते.
ही महामारी खुप भयंकर होती. "न भुतो ना भविष्यती"अशी महामारी पाहिली नव्हती.
सरकारी,निमसरकारी इस्पितळात रुग्णांना इलाज घ्यायला जागा नव्हती. निव्वळ त्या वेळेस पैश्याचा बाजार चालु होता. खाजगी इस्पितळात खुप पैसे सामान्य जनतेकडून उकळत होते.
इस्पितळात आरोग्य सेविका,डाॅक्टर, वार्डबाॅय, परिचारिका,संपुर्ण स्टाफ यांनी २४ तास पाळीनुसार त्या काळात अहोरात्र सेवा दिली.
डाॅक्टर व टीमच्या अथक प्रयत्नाने कित्येक रुग्णांचे प्राण वाचुन ते बरे होत गेले. हळुहळु सावरले सगळेच जीवन जागेवर आले.
आता पेपर वाचणे व न्युज टिव्हीवर पाहणे बंद केले होते. कारण प्रत्येक अघटित, अनपेक्षित बातमी, शारिरीक व मानसिक त्रास व त्राण वाढवित असते.
समाप्त
