मर्यादा
मर्यादा
काल महिला दिन जिथेतिथे सर्वच ठिकाणी खुप थाटामाटात पार पडला, कोणी बाईकरैली काढली, कुणी सत्कार कार्यक्रम घेतला,कोणी व्याख्याने, कवि सम्मेलन, लेखन स्पर्धा घेतली,व्हाटसअप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक वर स्त्रीचे गोडवे गात होते., महती गात होते,सगळेच कसे स्त्रीवर होत असलेल्या अन्यायावर, तिच्या स्त्रीत्व, स्त्री स्वातंत्र्यवर बोलले व त्यांनी लिहले, पण कोणी आपल्या वडिलांबद्दल, भावाबद्दल, मित्रांबदल वा समाजातील काही चांगल्या पुरुष जाती बद्दल बोलले नाही,बोलली ती एकच व्यक्ती व एकच स्त्री वा या स्त्री सारख्याच अजुनही काही स्त्रीया असतीलच ज्यांनी आम्हा पुरुषाबद्दल, नव्हे समाजातील काही चांगल्या पुरुषाबद्दल दोन शब्द चांगले बोलले, तेव्हा अशा माझ्या ताईला व त्या स्त्रीयांना माझा खुप मोठा मानाचा नमस्कार
