हिवाळा ऋतु
हिवाळा ऋतु
सृष्टी रचेता विश्वकर्माजीने जेव्हा ही सृष्टी रचली, निर्माण केली. त्यावेळेस त्यांनी निसर्ग सृष्टी आधी बनविली. त्यानंतर या निसर्ग सृष्टीवर जीवजंतू, प्राणी,किटक, मुंगी, जलचर ,भुचर प्राणी, आकाशी हवेत उडणारे पक्षी निर्माण केले म्हणजे त्यांच्या अनेक जाती- प्रजातीला जन्म दिला. या भुवर स्थान दिले. त्यानंतर त्यांनी मानवाची निर्मिती केली.
पृथ्वीवरील प्राणी, पक्षी,पशु,मानव व सृष्टी या सर्व सजिवसृष्टीचे जीवनचक्र व्यवस्थित चालावे, सृष्टीचे संतुलन व मानवाचे संतुलन व्यवस्थित राखता यावे. यासाठी परमेश्वराने, विश्वकर्माजीच्या हाताने ऋतुचक्र तयार केले.
या ऋतुचक्रात प्रामुख्याने तीन मुख्य ऋतुचा समावेश परमेश्वराने करुन या सजिवसृष्टीचे, या मानवसृष्टीचे संतुलन राखल्या गेले आहे. ते तिन ऋतु म्हणजे हिवाळा, उन्हाळा,पावसाळा हे होय.
मित्रांनो...!
परमेश्वराने मनात आणले असते तर ,एकच ऋतु जीवनचक्रात ठेवला असता. पण नाही ...! परमेश्वराने जीवनचक्रात तीन ऋतु का ठेवले असावे. याचा अंदाज तुम्ही लावला का कधी..? किंवा याचे उत्तर तुम्ही कधी शोधले का..?
मित्रांनो ..! तुम्ही तुमच्या परीने उत्तर शोधा.! पण मी तुम्हाला याचे उत्तर सांगतो. याचे उत्तर असे आहे की, निसर्गाचे संतुलन वा मानवी जीवनाचे संतुलन राखण्यासाठी हिवाळा ,उन्हाळा,पावसाळा या तिन्ही ऋतूची गरज आहे.
पावसाळा ऋतु
आकाशात ढग जमा होतात, बाष्पीकरण होऊन आणि मेघाचा पाऊस जमिनीवर पडुन त्या पावसामुळे जमिनीत अन्नधान्य,फुल,फळे पिकवुन मानवाला जिवंत राहण्यासाठी पुरक असे खाद्य मिळते. पाऊस हा शेतीसाठी उपयोगी पडतो. नदी,नाले,धरण,ओढे,विहिरी इत्यादी जलशये भरुन पाण्याचा साठा केल्या जातो. हा पावसाळा ऋतु जीवनचक्रातील ,ऋतुचक्रातील एक अभिभाज्य ऋतु व घटक आहे. पण पावसाळा एकदम कमी व जास्त नको. त्याचा परिणाम मानवाला भोगावा लागतो. जीवनचक्रावर पडतो.
दुसरा ऋतु उन्हाळा ऋतु
पावसाळ्यात आपण पाहिले. पाऊस पडुन सगळीकडे वातावरण जलमय होते. ओलसर होते,जिकडे तिकडे चिखल होतो. प्रत्येक व्यक्ती मग विचार करतो, पुरे झाला हा पावसाळा, पुरे झाला हा पाऊस आता उन्ह पडायला पाहिजे. परमेश्वर मानवाचे ऐकतो. पाऊस बंद करतो.
उन्हाळा असा ऋतु आहे ज्यात पृथ्वीवरील तापमान जलदगतीने दिवसेंदिवस वाढत जाते. साधारणतः मार्च, एप्रिल, मे,जुन या चार महिन्यांत वातावरणात तापमानाचे प्रमाण वाढते ते साधारणत: 46 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत जाते. आजकाल जंगलतोड व सिमेंट रस्त्यामुळे वातावरणात खुप तापमान वाढुन या चार महिन्यांत गर्मीमुळे जीव व्याकुळ होऊन पाणी पाणी होतो. थंडी वस्तु पिण्याची व खाण्याची इच्छा होते. उन्हामुळे जेवढा त्रास तेवढा फायदाही आहे. तसेच उन्हाळ्यात गर्मीपासुन बचावासाठी पंखे,कुलर,ए.सी.चा उपयोग लोक करुन राहिले. आधुनिक संयंत्र व उपकरणामुळे गर्मीपासुन जीव वाचविता येते.
उन्हाळा नकोसा वाटला तरी ऋतुचक्रानुसार उन्हाळा जगावा लागतो,भोगावा लागतो.
हिवाळा ऋतु आणि त्याचे मानवी जीवनावरील सावट
ऋतुचक्रातील तिसरा ऋतु म्हणजे हिवाळा ऋतु. हिवाळा ऋतु साधारणत: नोव्हेंबर महिन्यापासून जोर पकडु लागतो. तर तो फ्रेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नरमतो. कमी जास्त दिवस मग हवामानानुसार चालतात.
हिवाळा ऋतुबद्दल काय सांगावे. तिन्ही ऋतु मधुन हिवाळा हा ऋतु खुप मस्त आनंदमयी ऋतु आहे. हिवाळा या ऋतुला निसर्ग प्रेमी व प्रेमी लोकांनी "ऋतूंचा राजा" असे संबोधन दिलेले आहे.
हिवाळा ऋतुत वातावरण आल्हाददायक असते. हिवाळ्यात सकाळचे उन हवेहवेसे वाटते. थंडी कमी असली तर काही वाटत नाही. पण थंडी जर जास्त असली तर थंडीचे सावट फार मोठ्या प्रमाणात सजीवांवर पडते. यावर आपण पुढे चर्चा करु.
आधी आपण हिवाळा ऋतु मानवाला का हवाहवासा आहे हे पाहु...!
हिवाळा हा ऋतु वर म्हटल्या प्रमाणे ऋतूंचा राजा आहे कारण या ऋतुत वातावरण जिकडे तिकडे प्रसन्न व आल्हाददायक असते. कुठेही निसर्गरम्य ठिकाणी सहल घेऊन जाण्यासाठी, किंवा कौटुंबिक पिकनिक, तीर्थ क्षेत्रात फिरावयास, दर्शनास जाणे,मित्रमंडळींबरोबर फिरावयास जाणे हवेहवेसे वाटते. प्रसन्नतेचे वातावरण असल्यामुळेच निसर्गाशी समरस होऊन मस्त जीवनाचा आनंद लुटावा असे प्रत्येक वयातील व्यक्तीला वाटते.
दुसरी गोष्ट हिवाळ्यात आपल्याला पौष्टिक आहार,पालेभाज्या, फळफळावर मुबलक प्रमाणात मिळते व ती खावीशी वाटते. आमच्या महाराष्ट्रात व विदर्भात चिकु, पेरु,ऊस, बोरं, संत्री, गाजर अशाप्रकारची हिवाळ्यातील फळे व पालेभाज्या खावीशी वाटते व खाण्यालायक मिळते. या ऋतुत अन्न पचायला हलके असते. आणि काहीही चटकमटक खाण्याची इच्छा होते. तसेच या मोसमात अनेक सुक्या मेव्याची पदार्थ बनवुन खावयाशी वाटते. सुकामेवा पण या मोसमात पोषक असतो. उत्पादनासाठी व बीज निर्मितीसाठी व जननप्रकियेसाठी हा ऋतु एकदम छान ऋतु आहे. सर्वच दृष्टीकोनातून हा ऋतु खुप चांगला.
आता बघुया थंडीचे सावट
थंडी जशी खुप चांगली हवीहवीशी वाटणारी तशीच ती धोकादायकही आहे. तसेही सगळेच ऋतु त्याच पध्दतीचे. थंडी धोकादायक कशी बघुया.
बरेच लोकांना सावट या शब्दाचा अर्थ कळला नसेल.
सावट म्हणजे संकट, जसे आपण म्हणतो दुःखाचे सावट म्हणजे दु:खाचा डोंगर कोसळणे. तसेच थंडीचे सावट होय. तर मित्रांनो. ही हवीहवीशी वाटणारी थंडी कधी विक्राळ रुप धारण करते याचा विचारही आपण करु शकत नाही. जसा जसा हिवाळ्यात पारा कमी कमी होऊ लागतो. तापमान कमी कमी होते. तसतसे वातावरणानुसार थंडीचा कहर मानवावर व प्राणी,पशुपक्ष्यांवर होतो. म्हणून निसर्गाशी माणसाने खेळ खेळु नये. तापमानात हिवाळ्यात घट झाली की, थंडीचा कहर सुरु होतो. बाहेर वावरणे ,कर्तव्यावर जाऊन कर्तव्य बजावणे कठीण होते. थंडीने रात्री शरीर गारठल्या जाते . शरीराला उब हवी असते. शरिराला उब देण्यासाठी पूर्वी चारपाच लोक मिळुन शेकोटी पेटवायचे व शेकोटीभोवती जमा होऊन गोष्टीमाथा करायचे. पण आता ते शक्य नाही. हे खेडेगावात जास्त चालायचे.
तर या थंडीचा कहर या थंडीचे सावट सगळ्यात जास्त गरीब लोकांवर पडतो. ज्यांना रहायला धड घर नाही. पांघारायला एक चादरही नशीबी नसते. घरात आठ ते बारा मेंबर राहणारे असतात. घालायला वस्त्र व पांघरायला चादर नाही तर ब्लँकेट तर दुरच राहिले.
गरिबांच्या घरी, घर काय राहायला झोपडीच असली आणि थंड गार हवेतील थंडीत त्या गारठलेल्या हिवाळ्यात जर राहायला धड घर नसेल तर थंडीने कुडकुडत त्यांना लहान मुलासकट दिवस काढावे लागतात. यात मग लहान मुले व आजारी वृध्द लोक थंडीमुळे देवाघरी पण गेलेली आहे.
गरीबी व गरिबीत होणारे हाल व थंडीमुळे जीवाचे हाल काय होते. हे त्या गरीबांना ,झोपडीतील लोकांनाच कळते, आपल्यासारख्या महालात राहणाऱ्या लोकांना नाही.
तसेच थंडीचे सावट रात्रअपरात्री पोटासाठी काम करणारे हात मजुर, बस ड्रायव्हर, वाहतूक चालविणारे, ट्रक ड्रायव्हर यांच्यावर खुप मोठ्या प्रमाणात पडलेले दिसतात.
काश्मीर सारख्या थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर थंडीचा कहर,थंडीचे सावट जास्त असते. जिथे बर्फ वृष्टी होते अशा ठिकाणी अती पडलेल्या थंडीमुळे जीवित हानी खुप होते.
तसेच या अती पडणाऱ्या थंडीमुळे वन्यजीव प्राणी व पाळीव प्राणी ,पशुपक्ष्यांवरही खुप परिणाम होतो. व कधीकधी ते थंडीमुळे मृत्युमुखी पडतात.
आता अजुन एक गोष्ट मला सांगाविशी वाटते.
आपले देशाचे नौजवान सैनिक, शुरशिपाई, सिमाप्रहरी रोज म्हणजेच वर्षभर ३६५ दिवस उन,वारा, पाऊस, थंडी, आरोग्य सांभाळत सीमेवर रात्रंदिवस तटस्थ असतात. कुठलेही तक्रार न करता. निसर्गाचा मारा झेलत ते शत्रूपासून आपला बचाव करतात. झिरो डीग्री तापमान, मायनस(-) डीग्री तापमानात थंडीशी सामना करत ,त्या बर्फाच्छादित प्रदेशात कर्तव्य बजावत असतात.त्यांना मृत्युला कवटाळून आयुष्याची बाजी लावुन, आपला श्वास मुठीत ठेवून घरच्या पासुन दुर राहुन जगावे लागते. आणि कधी जगता जगता मृत्यूला कवटाळून हे शुरशिपाई वीरगती सुध्दा प्राप्त होतात. तरीही ते शहिदांचे वीरमरण आनंदाने स्वीकारतात.
देशवासीयांची रक्षा करता करता त्यांना अगणित संकटाचा, थंडीसारख्या तीव्र सावटाचा सामना करावा लागतो.
म्हणून मनावेसे वाटते. थंडीचे सावट असो वा असो दु:खाचे सावट .... कोण्या शत्रुवरही पडु नये..!
थंडीचे सावट
सावट थंडीचे
मानवावरी तर कधी प्राणिमात्रावर पडे
आयुष्यात सजिव कसा धडपडे!
फुटपाथवर गरिब बिचारे
पहुडले पांघरुणी फाटके- फुटके वस्त्र
कधी झोपले तसेच निर्वस्त्र
दया माणुसकीला आली नाही
का मग जीव कुणाचा वर खाली झाला नाही.!

