बहुगुणी तुलसी
बहुगुणी तुलसी
कार्तिक महिना॥ संपली दिवाळी॥
बहिण ओवाळी ॥ भाऊराया ॥१॥
काकड आरती॥ पहाटेच्या वेळी॥
दारात रांगोळी॥ सजे छान ॥२॥
भजन कीर्तन ॥ गायिली भुपाळी॥
टाळ वेळोवेळी ॥ वाजे आता॥३॥
कीर्तन सप्ताह ॥ भजन गायन ॥
तुलसी पुजन ॥ करु चला ॥४॥
तुलसी विवाह ॥ करु आयोजन॥
भक्तीमय मन॥ ठेवु चला॥५॥
मंगल दिपक ॥ तुलसीला लावु॥
अभंगात गाऊ॥ तुलसीला ॥७॥
वनस्पती विश्वात एकदा का मन रमलं, की त्यातून बाहेर यायला तयारच होत नाही. त्या वनस्पतीला सर्वांगाने कसं समजावून घेऊ नि किती कौतुक करू ,असं होऊन जातं.
आषाढ म्हटलं ,की जसं मेघदूत आणि यक्षानं कुटज फुलांनी दिलेलं अद्यावत आठवतं.....!, तसंच वारी, एकादशी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या वारकरी भगिनी, मंजिऱ्याची तुळशीमाळ परिधान केलेली विठूमाऊली चटकन नजरेसमोर येते. माझ्या मनात प्रथम श्रद्धाच जागी होते.
हो तुळस म्हटलं की श्रद्धाच ! औषधी, गुणकारी वनस्पती, हा भाव माझ्या मनात नंतर निर्माण होतो .औदुंबर, वड अशा अनेक वृक्षांना देवत्व लाभललं आहे .पण तुळस तुळसच !
दिसते एवढीशी, पण तिची व्यापकताही आकाशाला भिडणारी.! व्यापणारी पवित्रता शुद्धता ,आणि हवाहवासा निर्मळ, स्वात्विक आपलेपणा ! तिचे दर्शन सुद्धा किती सुखाचं असतं ना! तिच्या अस्तित्वानं, तिच्या स्पर्शाने जी उर्जा,संवेदना निर्माण होते, ती विलक्षण सुखदायी ! मला तरीही तुळस जिवलग सखीच वाटते .पुराणात( ब्रह्मवैवर्त देवीभागवत , स्कंदपुराण) तुळशी विषयी जशा अनेक कथा आहेत, तशा लोक साहित्यातही आलेल्या आहेत. त्यातही एक कथा एक गरीब जोडप्याला तुळशी नावाची एक मुलगी असते वय वाढेल तशी ती जड झाल्याने तिच्या रानात सोडले जातात. तिथे भेटतो विठोबा तिला सुखाचे दिवस येतात तोवर रुक्मिणी आठवण काढते. या कारणास्तव तुळशीला काही अटी घालून विठोबा पंढरपुरी जातो. पुढे रुक्मिणीनं संशयापोटी दिलेल्या त्रासामुळे तुळशी कोमजते . काही दिवसांनी विठोबा परत तुळशीकडे येतो. पण, विठोबा रुक्माई चा संसार बिघडू नये म्हणून ती धरणी मातेच्या पोटात शिरते .तेवढ्यात विठोबा तिचे केस धरून खेचतात. पण हातात येते छोटं झाड अन् केसांच्या मंजिऱ्या !विठोबाच ते रोप ह्रदयाशी धरतात .असे म्हणतात तेव्हापासून विठोबाच्या कंठात अखंड तुळशीची माळ दिसते. एकूण काय तुळशीचं झाडात रूपांतर झाल्यावर विठोबा जवळ म्हणजे परमेश्वराजवळ तिला कायम स्वरूपी राहायला मिळतं ना.!.भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण स्थान मिळाल्याचे तिच्या अंगच्या गुणामुळे !तिच्या अवघा देह सुगंधी झाला. दारात, अंगणात मनमोहक तुळस हवीच. खरतर तुळस लहानखुरी!अगदी साधी साधीच! तिच्याकडं ना सळसळणारी पान चटकन नजर वेधून घेणारी फुलं तरीही तिचं स्थान अमूल्य कोणतं बरं रहस्य दडलेलं आहे तिच्यात.? आपल्या पूर्वजांनी इतका बारकाईने अभ्यास केला होता .आहे ना..! खरंच इतक्या बारकाईने अभ्यास केला आहे ना !
खरंच आश्चर्य वाटतं तिच्यात आहेत अनेक औषधी गुणधर्म! तिच्या दारातलं अस्तित्वच मुळी वातावरण शुद्ध करणारे! सर्दी, ताप, खोकला आला की पहिल्यांदा आठवतो तो तुळशीच्या पानांचा काढाच! आज भरपूर प्राणवायू देणारी विषाणूंना विरोध करणारी दाह दूर करणारी ,कफनाशक पोटाच्या विकारांवर उपयोगी हृदयाला हितकारक, स्मृती वर्धक, त्वचारोग दूर करणारी, सौंदर्यप्रसाधनात उपयोगी असलेली.... एवढेच काय, मधमाशांनी डंक मारला तर त्या जागी तुळशीच्या मुळा जवळची माती लावली जाते.
एक ना दोन आणि उपयोग किती किती उपयोग सांगावेत ?चरक, धन्वंतरी, सुश्रुत अशा आयुर्वेदाचार्य पासून अलीकडच्या अनेक वैज्ञानिक तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. लॅमीएसी कुळातील तुळशीचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. ऑसिमम, सॅक्टम, ही भारतीय वनस्पती. हिरव्या पानांची "श्रीतुळस "आणि नाजूक नाजूक बांध्याची " कृष्ण तुळस "भारतात अगदी सगळीकडे उगवते. याशिवाय तुळशीचे आणखीही प्रकार आढळतात तुळशीची उंची तरी किती साधारण 30 ते 49 सेंटीमीटर. पान पाहिलीत का कधी निरखुन किंचित लव असलेली, मऊ मऊ मुलायम पान एकमेकांसमोर, लंबगोलाकार आणि दंतुर! पानसुद्धा सुगंधी आणि तैलग्रंथीयुक्त! पण हात लावून बघितलतं तर जाणारच हं ! किंवा पाण्यात, अन्नावर पान ठेवलं तरचं तो गंध त्यात उतरतो. आठवली का तुळस असलेल्या तीर्थाची चव आणि गंध ? आठवणारच या पानांसंदर्भात एक लोकोक्ती वाचायला मिळते.!
प्रतिदिन तुळशीबीज जो ,पानसंग नित खाये: रक्त,धातू दोंनो बढे, नामर्दी मिट जाये !!
ग्यारह तुळशीपत्र जो संघचार,. तो मलेरिया इकतारा मिटे सभी विकार!!
असे गुण पानात आहे म्हणून तर तीर्थात अन्नावर वापरलं असतं ना! तुळशीच्या औषध खोड तसे मऊ असली तरी बऱ्यापैकी टिकाऊ! म्हणूनच तर या खोडापासून म्हणी तयार करून माळ बनवली जाते. वारकरी म्हटला की त्याच्या गळ्यात तुळशीमाळ हवीच तो माळकरी तुळशी खोडाच्या शेंड्यावर साध्या किंवा शाखायुक्त मंजीरा येतात.आणि मंजिर्यात असतात ती अत्यंत नाजूक नाजूक इवली निळी जांभळी तेजमय फुलं ही फूले फूलताना खरंच बहिर्गोल भिंगातून हा डाव लाजत लाजत शहरात फुलणारं फूल किती गोड दिसते. म्हणून सांगू इवल्याशा फुलांच्या जिल्ह्यातल्या ते नाजूक केसर पिवळसर परागकणाचं गाठोडं डोळे भरून सांभाळून उभे असतात तुळशीचे बी किती काळभोर आणि सुंदर वाऱ्याच्या इवलीशी जुलाब देखील त्याला पुरेशी मग पावसाच्या सरी बरोबर अंकुरतात या बिया समूहानं तुळशीची रूप बघा कधीही सुट्टी नाही दिसणार त्याच्या एक अरुंद म्हणजे समूह तुळशीच्या वृंदाच्या सेवन म्हणून वृंदावन शिवाय रुंदीची कथा आहेच. रुंदीच्या पाटील व्रताचं संरक्षण लाभलेल्या दृष्ट जालंधराचा ची खोड त्याची शक्ती योजना मोडली आणि विष्णूने जालंधराचा वध केला पतिव्रता वृंदा सती गेल्यावर त्या जागी उगवली ती तुळस परमेश्वराचा सतत स्मरण करणारी तुळशीचे लग्न होत बाळकृष्ण बरोबर हे सुद्धा तिच्या गोड रहित सौभाग्याची आणि अखंड कुमार यांची ओळख अनिवार साधेपणा आणि अंतर्यामी कोमलता असलेली तुळस हरिप्रिया आणि जनप्रिया तुळशीच्या बाराही महिने फुलणारा पुष्पम हृदय मात्र विष्णूचा अर्थातच विश्व शक्तीचा अखंड यज्ञ शोधत असतं म्हणून तर मंजिरी यांची तुळशीमाळ परिधान केलेल्या परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करताना म्हटलं
तरुण तुलसीमाला कंधरम् कंज नेत्रम ! सदय धवलं हासम् विठ्ठलम् चिंतायामि..!!
