नवरात्रीचा जागर
नवरात्रीचा जागर
दिनांक २६\०९\२२ सोमवारला नवरात्राची सुरुवात घटस्थापना होऊन झाली. नवरात्र एक सोहळा आहे. नवदिवस नवरात्रीचा. तो एक महोत्सव आहे. आदीशक्तीचा. माॅ पार्वतीने कालीचे रुप घेऊन नऊ दिवस नव रात्री तांडव करुन राक्षसांचा नरसंहार केला होता. नऊरुपात येऊन तिने नरसंहार करुन सृष्टीच्या नियमांविरुद्ध जाणाऱ्या राक्षसरुपी विकृतीचा संहार व नायनाट केला होता. तिचा तीव्र ताप व राग, तसेच तिचा क्रोध कोणीच शमवु शकत नव्हते. ती काली, दुर्गा, शारदा,चंडिका, इ. अनेक रुपात या नऊदिवस व नऊरात्री आली. तिचे ते रुद्र रुप पाहुन तिन्ही लोकात स्वर्ग लोक, पाताळलोक, भुलोकात भिती निर्माण झाली. तिचा हा क्रोध आता कोण शांत करेल याचा विचार ब्रम्हा, विष्णु, महेश, नारद,देवराज इंद्र यांना पडला. काय करावे हे कोणालाच समजेना. माॅ. काली प्रत्येक राक्षसांचा वध करुन त्यांची मुंडके एक एक करुन आपल्या गळ्यात लटकवत होती. मुंडक्याची माळा तिने तयार केली होती. त्रिदेवला प्रश्न पडला हे असेच चालत राहिल तर, सर्वत्र त्राही त्राही माजेल.
अशा वेळेस नारदमुणींनी एक युक्ती देवाधिदेव महादेवाला सुचविली.ती कोणती तर, वाचा नारदमुणी महादेवाला म्हणतात," हे देवाधिदेव महादेव पार्वती देवी तुमचीच एक अर्धशक्ती आहे, ती आदीशक्ती आहे. तुम्ही जसे क्रोधात येऊन तांडव करु लागतात,तुम्हाला कोणी थांबवु शकत नाही, तशीच आदीमाॅ म्हणजे माताकाली आहे. कालीच्या या रुपाला थांबवायचे असेल, तिला शांत करायचे असेल तर ते तुमच्याच हातात आहे. "
यावर महादेव नारदमुणीला म्हणतात," मुनीवर ते कसे काय मी समजलो नाही" आणि महादेव असे बोलुन आश्चर्य व्यक्त करतात.
पुन्हा नारदमुणी म्हणतात, देवाधिदेव महादेव तुम्ही स्त्रीचे स्त्रीत्व जाणा आणि यावर उपायही जाणा. महादेव म्हणाले कसे काय.?
मुनीवर," देवा तुम्ही भोलेभंडारी आहात, मी सांगतो ते करा, कोणतीही स्त्री आपल्या पतीपरमेश्वराच्या शरीरावर आपले पद ठेवणार नाही, त्याला आपल्या पदाचा थोडाही स्पर्श होऊ देणार नाही.
माॅ काली ही नरसंहार करत तिच्या पायात आलेल्या सर्वच जीवाचा विध्वंस करीत आहे. तेव्हा हे कार्य थांबवायचे असेल, हा माॅ कालीचा राग शमवायचा असेल तर देवाधिदेव देव महादेव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही माॅ कालीच्या पाऊलवाटेवर लोटांगण जा शयनमुद्रा अवस्था घ्या . महादेव या नारदमुणींच्या वक्तव्यावर आश्चर्य करु लागले. विस्मयाने पाहु लागले. पण नारदमुणींनी सविस्तर समजुन सांगितल्यावर त्यांनी मुनींचा शब्द पाळला व तसेच केले.
माॅ शक्ती, माॅ कालीच्या चरणी ते लोटांगण गेले. अशावेळेस माॅ. कालीचा पद महादेवांवर पडणार इतक्यात मातेचा क्रोध महादेवांना पाहुन शांत झाला. माॅ कालीने आपला पद बाजुला सारला. सारा जयघोष तिन्ही लोकात महादेव व पार्वती मातेचा झाला.
नवरात्री नंतर मग दसरा सण दहाव्या दिवशी साजरा झाला राग मातेचा शांत झाला..!
अशाप्रकारे यत्र,तत्र, सर्वत्र आदीशक्तीचा नऊ दिवस व नऊ रात्र समस्थ देवीची पुजा करुन आदीशक्ती कालीदेवी, महालक्ष्मी देवी, एकविरादेवी, पार्वती देवी,शारदादेवी, रेणुकादेवीचा जागर असतो. गोंधळ व जागरण असते.
म्हणून भक्तहो समाजातील कोणत्याही स्त्रीला आपली माता,भगिनी, पुत्री माना तिच्यावर अत्याचार करणे टाळा.
