नासा येवतीकर

Drama

2  

नासा येवतीकर

Drama

कृतार्थ जीवन

कृतार्थ जीवन

5 mins
475


मोरे सर नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत जात होते, तेंव्हा रस्त्याने जाणारी एक मुलगी सरांच्या पाया पडण्यासाठी वाकली होती. तिला उठवत सरांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि लागलीच ओळखलं तिला, " मीरा आहेस ना तू ....!" " होय सर, मी मीराच आहे " " काय करतेस सध्या, कुठे आहेस, शिक्षण चालू आहे की बंद केलीस ?" " सर, आपल्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मी पोलीस झाले. सध्या पुण्याला आहे आणि शिक्षण देखील चालू आहे " तिचे हे बोलणे ऐकून मोरे सरांना खूप आनंद झाला. पण नऊ-दहा वर्षापूर्वीचे चित्र आठवलं की सरांच्या अंगावर शहारेच येतात. मोरे सर आठव्या वर्गाचे वर्गशिक्षक होते. त्यांच्या वर्गात मीरा नावाची मुलगी होती. जी की अभ्यासात थोडी फार हुशार होती मात्र धावण्यात ती फारच चपळ होती. हरणाच्या वेगात ती पळत असे. तिला पळताना पाहून मोरे सर अनेक स्वप्न पाहायचे. ही मुलगी आपल्या शाळेचे नाव, आईबाबाचे नाव नक्की उज्ज्वल करेल. मीरा मध्ये काहीतरी भविष्य दिसत होतं. म्हणून मोरे सर रोज मीराची विशेष काळजी आणि विचारपूस करत असत. ती एक दिवस जरी शाळेत आली नाही तरी मोरे सरांना अस्वस्थ वाटायला लागायचे. शाळेत सर्वानाच माहीत होतं की, खेळाचे शिक्षक मोरे सरांची आवडती विद्यार्थिनी म्हणजे मीरा. तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तरापर्यंतच्या धावण्याच्या स्पर्धेत मीराने यश मिळविले होते. ती त्या शाळेतली पी टी उषा होती. शाळा सुरू होऊन दोन महिन्याचा काळ उलटला होता. स्वातंत्र्य दिनानंतर मीरा जवळपास दहा दिवस शाळेत आली नव्हती. मोरे सर तिच्या मैत्रिणीला मीरा विषयी रोज विचारपूस करत असे. उद्या येईन यापलीकडे काहीच उत्तर मिळत नव्हते. म्हणून एके दिवशी रविवारी मोरे सर थेट मीराच्या घरी गेले.

मीराचे घर म्हणजे एक लहानसे झोपडी होती. घरात मीरा तिच्या आई वडील आणि दोन लहान बहिणी व लहान भाऊसोबत राहत होती. त्यांना शेती नव्हती त्यामुळे तिचे बाबा सालगडी म्हणून काम करत होते तर आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत होती. दोन लहान बहिणी गावातल्या शाळेत शिकत होती तर छोटा भाऊ कधी घरी तर कधी आई सोबत शेतात जात असे. मोरे सर घरी आल्याचे पाहून तिला सुरुवातीला भीती वाटली पण सरांनी घरी येण्याचे कारण सांगितल्यावर तिच्या मनातली भीती दूर झाली. मोरे सरांनी तिला व तिच्या आईबाबांना शाळेत न येण्याचं कारण विचारलं असता कोणी ही उत्तर देत नव्हते. समस्या ही सांगत नव्हते फक्त एवढंच सांगत होते की, ती आता यापुढे शाळेत येऊ शकणार नाही. मोरे सरांनी खूप समजावून सांगितलं, " काही समस्या असेल तर मी सोडवतो, तुम्ही मीराला शाळेत पाठवा प्लिज...!" यावर तिच्या बाबानी म्हटलं, " नाही सर, काही समस्या नाही, पण मीरा शाळेत येणार नाही, घरी तिचा भाऊ एकटाच असतो, त्याला सांभाळण्यासाठी कुणी तरी घरी पाहिजे आता. " मोरे सर नाराज होऊन घरी परतले. मीराचे भवितव्य अंधारात जाईल असे वाटू लागले. मीराला शिकण्याची ईच्छा होती मात्र आई बाबा तिला शाळेत पाठवायला तयार नव्हते कारण मीरा नुकतीच उपवर झाली होती आणि यापुढे तिला शहरातल्या शाळेत पाठविणे त्यांना जिकरीचे वाटत होते. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. या दिवसांत मीराला बघायला स्थळ येऊ लागले ह होते. काही दिवसांनी मोरे सरांना हे सर्व कळाले. मीरा शाळेत न येण्याचे खरे कारण देखील कळाले तेंव्हा त्यांना खूप अस्वस्थ वाटले. परत एकदा त्यांनी मीराच्या घरी गेले. यावेळी त्यांनी मीराला शाळेत पाठविण्याची विनंती केली नाही तर मीराचे एवढ्या लहान वयात लग्न करणे तिच्यासाठी धोक्याचे आहे, तसेच लहान वयात लग्न करणे कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे तिला शाळेत पाठवू नका पण तिचे लग्न करू नका." सरांचे बोलणे आई बाबांना पटले. काही दिवसाचा कालावधी उलटला होता आणि हिवाळी क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक आले होते. मीरा शिवाय कोणतेच पदक मिळणार नाही याची खात्री होती. म्हणून मोरे सर परत एकदा मीराच्या घरी गेले.

हिवाळी क्रीडा स्पर्धेत मीरा कोणत्या कोणत्या खेळात यश मिळवू शकते हे सरांनी बाबाला समजावून सांगितले. दहा दिवसांसाठी तिला शाळेत पाठविण्याची विनंती केली. मीराच्या बाबानी ते विनंती मान्य केली. दुसऱ्या दिवशी मीरा शाळेत आली. याच गोष्टीचा फायदा घेत मोरे सरांनी मीराला तिच्या भविष्याचे चित्र दाखविले. ही शेवटची संधी आहे, यावेळी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेचे दार ठोठावे लागेल. त्या दिशेने तुला मेहनत घ्यायचं आहे. सरांचे बोलणे तिला पटले. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने अनेक स्पर्धेत यश मिळविले होते. आता विभागीय स्पर्धेसाठी तिची दोन स्पर्धेत निवड झाली. घरून परवानगी मिळते की नाही याची काळजी तिला लागली होती. पण मोरे सरांच्या शब्दांत जादू होती. त्याचीही परवानगी मिळाली. विभागीय स्पर्धेत मीराने चमकदार कामगिरी करत शंभर मीटर आणि रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. अनेक वृत्तपत्रानी तिच्या कामगिरीची दखल घेत बातम्या प्रसिद्ध केल्या. काही दिवसांनी ती आपल्या गावी परत आली तेंव्हा सारा गावच नाही तर जिल्हा आणि तालुक्यावर देखील तिचा सत्कार करण्यात आला. मीराच्या आईबाबाची छाती फुलून गेली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आई बाबाची परवानगी घ्यायची गरजच पडली नाही कारण आपल्या मुलींमध्ये कोणते कौशल्य आहे हे त्यांना कळाले होते. राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाली तेथे तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान राहावे लागले. मात्र प्रसिद्धी मिळाली, मोरे सर सोबत होतेच. तिची आठवीचे वर्ष असेच संपले. परीक्षेत पास व्हावे म्हणून तिला परीक्षा देण्यास आई बाबानी तयारी दर्शविली. त्यांचा मनोदय देखील बदलला. मीराला पुढील शिक्षण देण्याची आई बाबानी होकार दिला तर मोरे सरांनी दहावी पर्यंतचे शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली. मीरा रोज शाळेत येत होती आणि अभ्यासासोबत विविध खेळात ती चमकत देखील होती. चांगल्या गुणाने ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याला गेली. ती शिक्षण घेत होती एवढीच माहिती सरांना होती. पण अचानक रस्त्यात आज मीराची भेट झाली आणि पुन्हा एकदा भूतकाळ आठवून गेला. ती पोलीस कशी झाली हे सांगताना ती म्हणाली, " दहावीनंतर जिल्ह्याच्या ठिकाणी गेले. तेथे आपल्यासारखेच भोसले सर मिळाले ज्यांनी माझी सर्व व्यवस्था केली होती. तसेच खेळाच्या स्पर्धेत अनेक पदक मिळविले.याच बळावर बारावी व पदवी झाल्यानंतर पोलीस भरतीमध्ये अर्ज केला. लेखी परीक्षेत पास झाले आणि मैदानी स्पर्धेत सहज उत्तीर्ण झाले. मग काय पुण्याला पोलीस म्हणून नोकरी मिळाली. आई बाबा दोन बहिणी आणि भाऊ आम्ही सर्वजण एकत्र आता पुण्याला राहतो" हे सारे तिचे बोलणे ऐकून मोरे सरांना जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama