क्रांतीची मशाल
क्रांतीची मशाल
वाचनाचा छंद जोपासणारे शहीद भगतसिंग क्रांती साहित्याने देशप्रेमी झाले होते.आझाद क्रांतीचे रक्त त्यांच्या अंगात सळसळत होतं.भारतमातेला स्वतंत्र करण्याची त्यांनी शपथ घेतली होती.क्रांतीची पेटती मशाल हाती घेऊन स्वतःची कधी पर्वा केली नाही.त्यांनी भारतमातेला सर्वस्व अर्पण केलं होतं. मातृभूमीची परदास्यातुन सुटका करण्याचा त्यांचा आत्मविश्वास खुप दांडगा होता.म्हणुन शहीद भगतसिंग ह्यांना देश वेडे संबोधले जात होतं.
देश प्रेमाचे वृक्ष स्वतःच्या हिमतीवर मातृभूमि वर लाऊन गेले.परंतु बलिदानाचे मुळ आजही धरतीमातेच्या कुशीत घट्ट अजरामर आहे.शहीद भगत सिंग म्हणायचे,"जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है, दुसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हैं.."
