कमिटमेंट
कमिटमेंट
साहील आणि मधुरा दोघांच लग्न झाल. लग्न खुप थाटामाटात पार पाडल. साहील आणि त्याचे वडील त्यांची स्वतःची कंपनी संभाळत होते. मधुरा ही तिथेच जाॅब करत होती. त्यानंतर दोघांची ओळख झाली. ओळखीच रूपांतर प्रेमात झाल. तिला अस कधीही वाटल नव्हत की साहील एवढा श्रीमंत कुटुंबातील मुलगा तिच्याशी लग्न करेल, पण साहीलच मधुरावर खुप प्रेम होत आणि मधुराचही. म्हणुन घरच्यांच्या संमतीने त्यांच लग्न झाल . दोघांचाही राजाराणीचा संसाराला सुरूवात झाली होती. मधुराला तर सगळेच आधीपासून साहीलचे घरचे, मित्र- मैत्रिणी सगळेच ओळखत होते. ती सगळ्यांना समजुन घेणारी आणि सर्वांशी प्रेमाने वागत, ती सर्वांना आपलीशी वाटे. लग्नानंतर कंपनीची खुप कामे पेंडींग असल्याने साहील आणि मधुरा ऑफीस जाॅईन करतात.
लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ऑफीसला येणार म्हणुन त्यांचे आॅफीस फ्रेंन्ड्स खुप खुश असतात. दोघांचही स्वागत करतात. आता साहील बरोबर मधुराही त्याच्या कामात त्याला मदत करू लागली. दोघांच रूटीन बिझी होत पण ते त्यातुन स्वतःसाठीही वेळ काढत होते. साहीलचे आई आणि बाबा तर मधुराला मुलगीच मानत. त्यांना मुलगी नव्हती.आई तर नेहमी तिच कौतुक करायच्या, मधुरा आमची सून कमी आणि मुलगीच वाटते. मधुराही त्यांना आईच मानायची. दोघेही इतक तिला मुलीसारख खुप प्रेम करायचे, तिला तर आईबाबांचीही आठवण येत नव्हती. इतक चांगल सासर आणि जीवनसाथी तिला मिळाला होता. साहीलची आई तर ते दोघेही ऑफीसमधून आले की दोघांनाही चहा देत, घरच सर्व कामही करत. मधुराला घरच काही काम करू देत नसत. मधुराचे आई खुप लाड करते हे पाहून साहील म्हणायचा. " आई , तु माझी आई आहेस का मधुराची ग, 'का रे अस' का वाटतय तुला साहील ? अग तु मधुराचे किती लाड करते. ती आल्यापासून माझे तर लाडच नाही करत. मधुरा आणि बाबा आईमुलाच बोलण ऐकून हसायला लागले. आई गप्प रे, अस काही नाही. तुम्ही दोघही माझ्यासाठी सारखे आहात. चल आई, गम्मत केली तूझी. बाय, उशीर होतो ऑफीसला म्हणून साहील लवकर निघून गेला. असे हसत खेळत कुटुंब होत.
मधुरा आणि साहील दोघेही बाहेर फिरायला जायचे. त्यांना दोघांना फिरायची खुप आवड होती. एके दिवशी रात्री बाईकवरून ते दोघे घरी येत असताना भरधाव वाहनाने त्यांच्या बाईकला धडक दिली. या अपघातात दोघेही रोडच्या बाजूला पडले.मधुराला थोडीच इजा झाली होती, त्यांना हाॅस्पीटलमध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी साहीलच्या मेंदुला मार लागल्याचे सांगितले. तो कोमामध्ये गेला.तेव्हा त्याच्यवर सर्व ट्रिटमेंट केले. स्पेशालिस्ट डाॅक्टरांना ही दाखवल.पण तो काही शुध्दीवर आला नाही.साहीलचा श्वास चालु होता. त्याला काही समजत नव्हत. ना ऐकु येत होत ना बोलता येत होत. अशी त्याची अवस्था झाली. त्याच जीवनच बदलुन गेल. मधुराला तेव्हा खुप धक्का बसला.त्याच्या आईवडीलांना तर आपल्या एकुलत्या एका मुलाची झालेली ही अवस्था बघवत नव्हती. डाॅक्टरांची ट्रिटमेंट तर सूरू होती.पण परिस्थितीत काही सुधारणा झाली असे जाणवत नव्हते. तेव्हा डाॅक्टरांनी साहीलला घरी घेऊन जायला सांगितले. तेव्हा खचलेली मधुरा आपल्या साहीलला घरी घेऊन आली.
तो तर स्वतः काही करू शकत नव्हता. बेडरिडन होता.घरी कामासाठी इतर लोक ठेवले होते.केअरटेकरही त्याच्या वडीलांनी आपल्या मुलासाठी ठेवले होते.पण मधुरा स्वतः साहील साठी सगळ करत होती. ती त्याची काळजी घ्यायची. तासन् तास त्याच्याजवळ बसून राही. तिला वाटायच की आज ना उद्या तिचा साहील तिच्याशी बोलेल, हसेल तस काही होत नव्हती, पण तिने आशा सोडली नव्हती. साहीलनंतर कंपनीत जबाबदार व्यक्ती म्हणुन मधुराच होती.ती बाबांसोबत जाऊन कंपनीच्या कामही जबाबदारीने करीत. तिचा सगळा वेळ साहीलमध्ये जात. ती स्वतःकडेही जास्त लक्ष देत नव्हती. कारण तिच खर प्रेम आणि तिच सर्व जगच साहील होत.तिने त्याला शेवटपर्यंत साथ देईन ही कमिटमेंट केली होती. मधुराचे आईबाबा तिला आणि जावयाला भेटायला यायचे. एक वर्ष झाल तरी काही सुधारणा नव्हती. त्यांना मधुराची खुप काळजी वाटे. त्यांना वाटत होत की तिने दुसर्या लग्नाचा विचार करावा. साहील यातुन कधीही बरा होणार नाही. शेवटी आईवडील मुलीच्या काळजीपोटी बोलले. इतर भेटायला येणारे नातेवाईक आणि साहीलचे आईबाबाही तिला हेच सांगत होते. तिने सर्वाना सांगितल की, ' मी साहीलला अशा अवस्थेत सोडून दुसर्या लग्नाचा विचार नाही करू शकत.मान्य आहे , आमच्या लग्नाला थोडेच दिवस झाले होते.पण माझ आणि साहीलच एकमेकांवर खुप प्रेम होत आणि शेवटपर्यंत राहील. मि ही त्याला या अवस्थेत सोडून जाणार नाही, शेवटपर्यंत साथ देईन. मधुरा आणि साहीलच प्रेम आता दोघांच्याही घरच्यांना समजल होत. त्यामुळे तिला लग्नाविषयी परत कुणी काही बोलल नाही.
साहीलच्या आईबाबांना सुरूवातीला खुप वाईट वाटायच, त्यांनी तर जगण्याची आशा सोडली होती. पण मधुराने सर्वांना धीर दिला, ती सर्व जबाबदार्या स्वतः पार पाडू लगली.साहीलकडेही तिच लक्ष असायच. कंपनीसाठी साहीलने आणि बाबाने सुरूवातीला खुप मेहनत घेतली होती.सर्व स्टाफही चांगला होता. साहील नंतर सगळे मधुराला चांगला सपोर्ट करत होते. म्हणुन ती कंपनी सांभाळु शकली. आई बाबा आणि मधुरा साहीलला कधीही एकट सोडत नव्हते.डाॅक्टरांची ट्रिटमेंट चालुच होती.
जेव्हा मधुरा साहीलजवळ बसयची तेव्हा तिला पूर्वीचा साहील आठवायचा.आईची थट्टा करणरा, तिच्यावर उशीर झाला तर चिडणारा, तिच्याशी तर खुप बोलायचा, हसायचा आणि आता त्याच्याजवळ इतका वेळ बसते तरी तो काहीच बोलत नसायचा याचा तिला त्रास व्हायचा. पण त्या अपघातातुन तो वाचला आणि अश्या अवस्थेत का होईना तो तिच्या सोबत आहे, त्याने आपली साथ सोडली नाही ही बाब तिच्या मनाला दिलासा देऊन जायची. अस मधुरा आणि साहीलच एकमेकांवरील प्रेम बघून सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नव्हत. दोघांनी लग्नानंतरच्या आयुष्याची किती स्वप्न पाहीली असतील ना ! एका घटनेने दोघांच जीवनच बदलून टाकल होत. अशी ही मधुरा साहिलची ती एका नर्ससारखी काळजी घ्यायची.त्यांच्या घरी खुप लोक भेटायला यायचे. त्यांनी खुप चांगली माणसे जोडली होती. मधुरा इतक करते याच सर्वांना कौतुक वाटायच. नाहीतर आताच्या मुली कुणी केल नसत हे तिला ऐकायला मिळायच. सर्व लोक म्हणतात, की तो बेडरिडन आहे, त्याला काही कळत नाही, समजत नाही. बोलता येत नाही,ऐकू येत नाही.तो कोमामधुन कधीही बाहेर येऊ शकत नाही. पण तिला विश्वास आहे की तो यातुन बाहेर येईल, तिच्या मनाला वाटत की त्याला सगळ तिच कळत, तिचा विश्वास आहे की तो तिला इतक्यात एकटीला सोडून जाणार नाही. आजूबाजुचे लोकही म्हणतात, खरच कमिटमेंट द्यावी तर अशी या दोघांसारखी... आणि दोघही ती निभावत आहेत.
त्या दोघांनी सूरूवातीला एकमेकांना दिलेली कमिटमेंट पाळली होती. आजही त्या दोघांनी एकमेकांची साथ सोडलेली नाही.त्याच तिच्यावर खुप प्रेम होत पण त्याच्यापेक्षा जास्त तिच त्याच्यावर प्रेम होत म्हणुन ती आजही त्याच्यासोबत आहे आणि आयुष्यभर ती त्याच्यासोबत असणार आहे. अशी ही आयुष्यभरा साठीची कमिटमेंट साहील आणि मधुरा आजही पाळत आहे.

