खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते
प्रत्येकाचे जीवन ही एक परीक्षाच आहे आणि आपण त्या परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, ज्याला माहीत नसतं की हा आयुष्याचा पेपर कसा असेल" प्रत्येक मनुष्य हा जन्मापासून मरेपर्यंत शिकतच असतो. कुणी परिस्थितीतून शिकत तर कुणी शिक्षणा द्वारे शिकत असत. कुणी अनुभवां वरून शिकत तर कुणी प्रसंगातून शिकत. म्हणून तर म्हणते की शिक्षण हे कधी थांबत नाही ते निरंतर सुरूच असतं आणि त्यातून शिकणाऱ्याला कधी सुटका नसते त्यामुळे तो नेहमी विद्यार्थी बनलेला असतो आणि त्याला कधीही सुट्टी मिळत नाही आपण ही असेच एक विद्यार्थी आहोत ज्याला सुट्टी मिळत नाही शिकण्यापासून जर त्याला खरंच शिकण्याची आवड असेल तर. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते कारण ज्ञान संपादन करण्याचं काम तो निरंतर करत असतो त्याला आवड असते शिक्षणाची, त्याला आवड असते नवनवीन गोष्टी जाणून घ्यायची व त्या आत्मसात करण्याची त्यामुळे खऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात सुट्टी हा प्रकार नसतो. खरा विद्यार्थी हा झटत असतो सतत ध्येयप्राप्तीसाठी त्याला जीवनात काहीतरी प्राप्त करायचे असते त्यासाठी तो सतत कार्यरत असतो कारण त्याला माहिती आहे की एकदाचे आपण आपले ध्येय प्राप्त केले आपली स्वप्न पूर्ण केली तर मग सुट्टीच सुट्टी आहे. खरा विद्यार्थी हा सतत आत्मचिंतन करत असतो तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्यासाठी काय योग्य आहे व काय अयोग्य आहे आणि त्याच पद्धतीची वाटचाल तो सुरु ठेवतो. खरा विद्यार्थी हा पुस्तकी ज्ञान तर आत्मसात करतोच पण त्या व्यतिरिक्त त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी ,सामाजिक हालचाली यावर सुद्धा त्यांचे लक्ष असते त्यातूनही तो बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि आत्मसात करत असतो त्यामुळे त्याला सुट्टी नसतेच."खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसतेज्ञानप्राप्ती च काम त्याच सतत सुरू असतेआराम करायची सवड त्याला नसते ध्येय प्राप्त करण्याची उत्सुकता त्याला असते".
