STORYMIRROR

Sangita Tathod

Romance

3  

Sangita Tathod

Romance

खरं प्रेम

खरं प्रेम

1 min
164

असते का कधी 

खोटं खोटं प्रेम ?

असेलही असे काही

या जगात नाही नेम 


 प्रेम भावना असते

अगदी खरीखुरी

एकदा ती जुळली की,

पडत नाही त्यात दुरी


जपले जाते प्रेम

अखेरच्या श्वासापर्यंत

जवळ असो ,वा दूर

त्याला नसतो कधी अंत


महती काय सांगू

खऱ्या प्रेमाची ?

नकळत जुळते तार

मनाशी मनाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance