खजीना
खजीना


विनम्रता अमर्याद खजिना
महाराज घनदाट जंगलांत शिकार करण्याकरता गेले होते. शिकारीचा शोध घेत असताना त्यांना तहान लागली होती. आजूबाजूला सैनिक दिसले नाहीत. सैनिक दुसऱ्या रस्त्यानी सैनिक विखुरलेले होते. इकड़े तिकड़े बघितले, कुठे सैनिक दिसले नही. भरदुपारची वेळ होती. महाराज तहानेनी व्याकुळ झाले होते. ते इकडे तिकडे बघत होते पण नोकर नाही तेथे पाणीही नव्हते, पाण्याची सुराही कुठेही सापडली नाही. त्यांना काही अंतरावर विहिर दिसली. महाराज त्या विहिरीजवळ पोहोचले. आणि पाणी काढण्यासाठी प्रयत्न करीत असताना. जेव्हा राजा बादली, बकेट घेण्यास पुढे निघाले तेव्हा त्या विहिरीची खिराड़ी चक्र त्याच्या डोक्यावर लागले. आणि रक्त वाहू लागले. परंतु महाराज घाबरले नाहीत. रागावले नाही. हसून शांतीेने पाणी पिले ! आणि देवाचे धन्यवाद मानले, म्हणाले, ईश्वरा तुझे धन्यवाद,आहे. मी तुझे आभार कसे मानु ? आपले माझ्यावर अनंत उपकार झाले, जो माणूस विहिरीतून पाणी काढू शकत नाही, त्याला तू महासम्राट राजा बनवले. ईश्वरा किती दयाळू आहेस तू माझा सारख्या मूर्ख माणसाला एक बादलीभर पाणी काढता येत नाही, ज्यात पात्रता नव्हती अशा माणसाला तू पात्र बानविले आहेस. पण महाराजांना माहिती नव्हते, त्यांच्याजवळ विनम्रतेचा खजिना दडललेला आहे. महाराज एक विनम्र ह्रदयी दयाळू मायाऴू होते. तो अप्रतिम मूल्यवान अमूल्य खजिना होता.