दिपमाला अहिरे

Horror

3.8  

दिपमाला अहिरे

Horror

काळजी घे!!

काळजी घे!!

2 mins
173


        निशाच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती आणि ती आई होणार होती तिचा नवरा तिला खूप जपत होता , काळजी घेत होता .आठवा महिना लागल्या नंतर तर तो तिला एकटीला जास्त सोडत नसे. पण एके दिवशी त्याला ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागले,पण निशाला सर्व सुचना देऊनच तो घराबाहेर पडला कारण येतांना रात्री त्याला उशीर होणार होता.

    रात्री दोन-तीन वाजे दरम्यान दाराची बेल वाजली निशा ने दरवाजा उघडला तर तिचा नवरा घाईघाईने आत आला तिला विचारु लागला जेवलीस का, औषधे वेळेवर घेतलीस का, ती नेहमी प्रमाणे त्याची वाट पाहत उपाशी झोपली होती आणि हे त्याला माहीत होते .

     तुमची वाट पहात होते मी तर तो तिच्या वर ओरडुन जाऊन ताट वाढुन आणले आणि स्वतः च्या हाताने तिला भरवुन ताट तिथे गॅस च्या खाली ठेवून तिला म्हटला मला जरा महत्वाचे काम आहे मी आलो लगेच जाऊन पण हो स्वतः ची आणि बाळाची काळजी घे.

 सकाळी आठ वाजेला निशाचा फोन वाजला म्हणून तिला जाग आली तिने फोन घेतला तर तिकडुन तिच्या नवऱ्याचा मित्र बोलत होता . एक काल रात्री अकरा वाजेला रवि च्या गाडीला अपघात झाला . रात्री मुद्दामच तुम्हांला कळवले नाही जागेवरच मृत्यू झाला.

    निशा ऊठुन अगोदर किचन मध्ये गेली गॅस खाली पाहिले तर ते अर्धवट जेवणाचे ताट तिथे होते आणि तिच्या कानात तोच एक आवाज येत होता काळजी घे. जणु त्याला माहीत होते ही उपाशीपोटी झोपणार म्हणून तो तिला खाऊ घालण्यासाठी आला होता पण हा भास नसुन सत्य होते हे ती कायमच सांगते.

    नंतर सतत तो आवाज तिला अधुनमधून येत असायचा डिलेव्हरी च्या वेळेस ही तो आवाज तिच्या भोवती घुमत होता. असे ती सांगत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror