दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

कच्चा धाग्यातील प्रेम

कच्चा धाग्यातील प्रेम

1 min
177


"यावेळी तुला पाठवलेली राखी जराशी साधी आहे रे. पण गोड मानून घे..कारण त्या कच्च्या धाग्यात काही नसतं त्याच्या सोबतच्या फक्त भावना महत्वाच्या.. रक्षाबंधन ला आपण एकमेकांसोबत नाही असं पहिल्यांदाच झाले नाही का? पण यावर्षी वेळेत राखी तरी पाठवु शकले मी तुला.. माहित नाही पुढच्या वर्षी मी असेन की, नाही तुला राखी बांधायला.. म्हणून मग या चिठ्ठी सोबत खुप साऱ्या राख्या पाठवल्या आहेत.. इतक्या की,पुढची अजुन पन्नास वर्षे तरी तु बांधु शकशील..पण हे बघ दादा सर्व राख्या सांभाळून ठेव.आणि मी जरी नसेल ना तरी तु दर रक्षाबंधनला एक राखी बांधायची हाताला आठवणीने."

   तुझी मिनी..

कॅन्सर च्या शेवटच्या स्टेजवर असलेली आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या आपल्या बहिणीची चिठ्ठी वाचुन भावाला रडु आवरेना..डोळे पुसत राखी बांधु लागला.

 आपल्या थरथरत्या हाताने आजोबा राखी बांधताय हे पाहून त्यांची चिमुकली नात पुढे आली आणि त्यांना राखी बांधायला मदत करु लागली..

आजोबा मनातच बोलत होते.."असा एखादा धागा माझ्यासाठी ही बनवला असता देवा जो हाताला बांधुन मी माझ्या बहिणीचे रक्षण करुन तिचा जीव वाचवु शकलो असतो."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational