दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

दिवाळी ची शिकवण..

दिवाळी ची शिकवण..

3 mins
118


"मम्मी ऐ मम्मी माझे ते हॉलिडे बुक कुठे ठेवले होते तु? मला होमवर्क पूर्ण करायचा आहे..दे ना? आता आता सुट्टी पण संपणार आहे आणि सर्व गेले ना आपापल्या घरी आता मला वेळ आहे.मग नंतर मी विसरून जाईन परत.ये ना लवकर ईकडे काय करतेय तु?" पहिल्या च्या वर्गात शिकणारी रीया आपली आई सीमा ला आवाज देऊन बोलवत होती..सीमा बेडरूम मध्ये सर्वीकडे अस्ताव्यस्त पडलेल्या कपड्यांचा पसारा आवरत होती.. तिथुनच रीयाला आवाज देत तिने सांगितले "रीया बाळ मी जरा कामात आहे..त्या टेबलच्या खालच्या ड्रावर मध्ये आहे तुझी बुक तु घेतेस का तिथुन?". बऱ्याच वेळा पासून सोप्यावर बसुन रवी आपल्या मुलीचे रीयाचे बोलणे ऐकत होता.त्यानेच उठुन तिला तिचे हॉलिडे बुक शोधुन दिले,कलर आणि पेन्सिल ही दिल्या.आणि तो सीमाशी बोलायला गेला "काय चाललंय तुझं एका तासापासून किती हा कपड्यांचा ढीग काल पासून नुसते कामंच चालु आहेत तुझे.म्हणुन म्हणतो मी तुला काय गरज आहे दिवाळीला सर्वांना आग्रह करुन करुन बोलावण्याची? कधी तरी आपणही जाऊ शकतो ना त्यांच्याकडे?"

सीमा - असुद्या हो सणादिनाला आपली माणसं नसली तर कसला तो सण आणि कसली मजा मला आवडते घरात माणसांची वर्दळ सणासुदीला तेव्हाच खरा आनंद आणि उत्साह असतो बघा.. आपले बालपण आठवते ना सुट्टी तर मामांच्या, काकांच्या गावी जाऊन किती मजा मस्ती करायचो आपण आपले पण भाचे आपल्या कडे नाही येणार तर कुठे जातील मग

आपल्या माणसांना जोडुन ठेवण्यासाठीच असतात हे असे सणसमारंभ.. प्रत्येक सण नक्कीच आपल्याला काहीतरी शिकवुन जातो. 

दिवाळी आली आणि गेली .. दिवाळीच्या फिव्हर मधुन बाहेर पडण्याची वेळ आली..दरवर्षी ची दिवाळी जातांना काहीतरी शिकवुन जाते.पण कधी कधी दिवाळी भुतकाळात डोकावायला भाग पाडुन जाते..

"सणासुदीचे दिवस, लग्न सोहळा , समारंभ

आपल्या माणसांसोबत सुख दुःख वाटण्याचा दरवेळी केलेला असतो तो एक नविन शुभारंभ."

परंतु जसजसा काळ पुढे जात आहे तस तसे या सर्व गोष्टींचे महत्त्व मागे पडतांना दिसत आहे.किंवा असे म्हणुया कमी होतांना दिसु लागले आहे..

जरा पुर्वीच्या दिवसांचा विचार करुयात जास्तच मागचा काळ नाही फक्त आपल्या बालपणीचे दिवस कधीतरी आठवतात.त्यावेळी दिवाळीची सुट्टी,मजा याची काहीतरी वेगळीच गंमत असायची.. माणसांना,नात्यांना जोडुन ठेवण्यासाठी सणसमारंभ निमीत्ताने चाललेली तळमळ त्यावेळी दिसायची.जी आज किंचित कमी होत चालली आहे..आपण असे म्हणतो की, दिवाळी संपता संपता फराळाचे डबे अर्धे झालेले असतात.पण पुर्वी तसे नव्हतेच फराळाचे एक दोन डबे जास्तीचे बनवून ठेवले जायचे. दिवाळसणासाठी घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याची पिशवी जातांना फराळाने गच्च भरून दिली जायची.. दिवाळी निमित्त माहेरी येणाऱ्या लेकी आणि सासरी जाणाऱ्या सुनांची एकच लगबग,जपली जाणारी नाती,आपुलकी,प्रेम आणि जिव्हाळा आजकाल नक्कीच कमी झालेला दिसतो आहे..दिवाळी संपल्यानंतर आपापल्या सासरी परत जाणाऱ्या मुलींना  खिडकीतून हात वर करून करुन दिले जाणारे निरोप..धुळीचे लोट उडवत दुर जाणाऱ्या पाठमोऱ्या बस कडे दृष्टीआड होईपर्यंत पहात उभी राहणारी घरातील सर्व मंडळी.. या सर्व गोष्टी कुठे पहायला मिळतात आजकाल..

आजकाल पहायला मिळते ती फक्त औपचारिकता. दिवाळीत घरांत माणसांची वर्दळ कमी दिसते. कारण आजकाल कुणालाही वेळ नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे.त्यामुळे आजकाल तेवढ्या आपुलकीने दिवाळीचे आमंत्रण नसते..बोलावणे असले तरी जायला वेळ नसतो.. लोकांमध्ये पुर्वी सारखी ओढ आणि उत्सुकता आज दिसत नाही.. औपचारिकता जास्त आपुलकी कमी दिसते.. आणि दिखाऊ पणा जास्त.. एकुणच काय तर घरं मोठी झालीत पण मनं छोटी आजकालच्या मामांच्या मोठ्या घरांना आमच्या आजोळच्या शेणाने सारवलेल्या ऐसपैस अंगणाची सर नाही.मोठमोठ्या आणि महागड्या आर्टिफिशियल लाईटिंगला, आकाशकंदील त्या मातीच्या दिव्यांची सर नाही ज्याच्यात आळीपाळीने तेल ओतुन रात्रभर दिवे तेवत ठेवण्याची लहानग्यांची शर्यत असायची. आजच्या डबाबंद महागड्या मिठाईत ती गोडी नाही जी रात्र रात्र जागुन आजी,मामी,वहिनीने डबे भरुन भरून बनवलेल्या करंजीला असायची.हलवाई कडुन बनवुन घेतलेले एक दोन किलो फराळ त्यात खाणार किती आणि देणार किती अशी अवस्था झाली आहे आजकाल.. काही ग्रामीण भागातील , घरातील अपवाद वगळता शहरातील दिवाळी ही अशीच दिसते.आर्टिफीशीयल रांगोळी, तोरणं,दिवे, कंदिल दिसायला मोठा झगमगाट. पण नात्यांमध्ये भावनांचा ओलावा थोडा कमी.. तोरणं, कंदिल,दिवे, घरभर पसरलेले रांगोळीचे रंग आवरता आवरता कालपर्यंत लहान मोठ्यांची गडबड गोंधळ असणारे घर आज किती रीकामे वाटते हे पाहुन पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा आणि आतकाळजाला वाटणारे दुःख येणाऱ्या काही दिवसांत कदाचित कुणाला जाणवणार ही नाही..

"यासाठी आजची दिवाळी ओसरतांना जणु एक संदेश देते

नकोच नुसती औपचारिकता आणि भपकेबाज पणा

नात्यांमध्ये असुद्या भावनीक ओलावा आणि आपलेपणा"


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational