काळी साडी
काळी साडी
आई अहो ते वहिनी ने उद्या हळदी कुंकू ठेवले आहे.मी आज जावू का आई कडे.?. सोनल सुलभा ताई ना विचारत होती.
आज ऑफिस वरून जा मग आई कडे.
आई मी उद्याची सगळी तयारी करून जाते.उद्या संक्रांत तर मी संध्याकाळी परत येईन.
हो इथली नको काळजी करू जा तू.मी बघते.प्रवीण ला सांग फक्त.
हो आई सांगते पण अजून एक होत.
काय बोल.
आई ते आम्ही सगळ्यांनी काळी साडी नेसायची अस ठ रवले होते आणि प्रवीण ला ही आई ने बोलवले आहे.. जावयाला मान द्यायचा . हलव्याचे दागिने घालून फोटो काढायचे होते
सोनल तुला माहित आहे आपल्याला संक्रात बाधते,काळी साडी अपशकुन आहे.संक्रांती च्या दोन दिवस आधी प्रवीण चे बाबा अपघातात गेले.माझे पहिले मुल ही संक्रांती च्या आसपास गेले होते .तेव्हा मला ही हे नव्हते पटले की यात काळ्या साडी चा काही अपशकुन असेल पण जेव्हा प्रवीण चे बाबा गेले तेव्हा खात्री पटली की संक्रात आपल्याला शुभ नाही.मग उगाच का परीक्षा बघतेस.तू आणि प्रवीण दोघांनी ही काळे कपडे घालायचे नाहीत अस असेल तरच जा आई कडे नाहीतर नंतर जा.
सुलभा ताई ना किती ही समजावले तरी त्या ऐकणार नव्हत्या..म्हणून मग सोनल म्हणाली,.ठीक आहे आई नाही घालणार आम्ही काळे कपडे.
सोनल ने प्रवीण ला या बद्दल सांगितले,तो ही तेच म्हणाला,सोनल आपण तसा विचार नाही करत .अस काही अपशकुन वैगेरे नसतेच पण आई ला कोण सांगणार.असो. तू जा संध्याकाळी मी सकाळी येतो.
सोनल मग ऑफिस मधून परस्पर आई कडे गेली.तिची वहिनी विनिता तिने स्व ता बरोबर सोनल ला ही छान काळी इरकल साडी आणली होती.तिने सोनल ला दाखवली..ताई बघा ही साडी कशी आहे आवडली का तुमच्या साठी आणली आहे.
साडी खरच खूप सुंदर होती..विनिता मस्तच आहे ग साडी पण आमच्या कडे चालत नाही काळी साडी.
ताई अहो आज जाग कुठे गेले आणि तुम्ही या कसल्या अंधश्रद्धा बाळगून आहात.?
नको ग..सासूबाई ना समजले तर उगाच भांडण होईल.
दुसऱ्या दिवशी प्रवीण ही सोनल कडे आला.
विनिता ने प्रवीण ला सांगितले की सोनल ला काळी साडी आवडली आहे,तिला ती नेसायची ही खूप इच्छा आहे आज सगळ्या बायका काळ्या साडीत येणार..आणि सोनल मात्र वेगळया साडीत.बघा दादा तुम्ही सांगून बघा ताई ना.
मग प्रवीण सोनल ला म्हणाला,सोनल तुझी इच्छा आहे तर तू काळी साडी नेस आणि मनात काही आणु नको,काही ही होणार नाही.
मग सोनल ने छान ती इरकल नेसली.हलव्याचे दागिने घातले .खूप सुंदर दिसत होती ती.प्रवीण ने खूप सारे तिचे फोटो काढले.रात्री ते दोघे घरी आले.
आई ने विचारले की कार्यक्रम कसा झाला.यावर सोनल बोलली खूप छान .
मग दुसऱ्या दिवशी सोनल आणि प्रवीण कामा वर गेले.सोनल च्या लक्षातच आले नाही की तिने काल रात्री व्हॉट्स ॲप वर स्टेटस ला तिचे आणि प्रवीण चे फोटो लावले होते.कामात ती विसरून गेली.
थोड्या वेळात शेजारच्या काकू आल्या.सुलभा ताई कडे गप्पा मारायला यायच्या त्या.तेव्हा त्या म्हणाल्या,काय हो सुलभा ताई तुमच्या कडे तर संक्रांती ला काळी साडी नेसत नाही ना.मग काल सोनल ने कशी नेसली.?
तुम्हाला कसे माहित की सोनल ने काळी साडी नेसली होती.
तुम्ही सोनल चे व्हॉट्स ॲप नाही बघितले का..हे बघा फोटो म्हणत काकूंनी सोनल चे फोटो दाखवले.
सुलभा ताईंना खूप राग आला होता. संध्याकाळी सोनल घरी आली तेव्हा त्या तिला खूप बोलल्या..तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती अस बोलल्या.सोनल रडत रूम मध्ये बसली होती.
प्रवीण अजून आला नव्हता.बराच वेळ झाला प्रवीण घरी आला नाही.तेव्हा सोनल ने त्याला कॉल केला पण नॉट रीचेबल लागत होता.सुलभा ताई म्हणाल्या...बघ काल काळी साडी नेसलीस ना त्याचा हा परिणाम.. देव करो आणि माझा प्रवीण सुखरूप असो. सुलभा ताई देव पाण्यात ठेवून बसल्या.सोनल ही काळजीत होती आपण चूक केली का काळी साडी नेसून...प्रवीण कुठल्या संकटात असेल का? त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता.दोघी ही खूप घाबरल्या होत्या.प्रवीण च्या मित्रांना कॉल केला.ऑफिस मधून तो वेळेवर निघाला होता असे त्यांनी सांगितले.आता काय करायचे..? दोघी काळजीत होत्या.सुलभा ताई सोनल ला खूप बोलत होत्या.
रात्री एक वाजता घराची बेल वाजली..सोनल ने पळत जावून दार उघडले..दारात प्रवीण ला बघून ती रडू लागली..अरे कुठे होतास तू आणि फोन का लागत नव्हता तुझा..तुला माहित आहे का कसले कसले विचार डोक्यात येवून गेले.
अग हो सोनल जरा शांत हो..
प्रवीण अरे पण तू होतास कुठे इतका वेळ..तुला घरी सांगता येत नाही का? .सुलभा ताई म्हणाल्या.
आई अग मी घरी यायला निघालो तेव्हा माझा मित्र विलास त्याच्या बायकोचा कॉल आला,विलास ला मायनर हार्ट अटॅक आला होता.वहिनी एकटया होत्या म्हणून मी लगेच हॉस्पीटल ला गेलो.विलास ला ॲडमिट करून आलो..आता तो ठीक आहे तिथे रेंज नव्हती म्हणून माझा कॉल लागत नव्हता.
सुलभा ताई ना खूप लाजल्या सारखे झाले...सोनल माझं चुकलं बघ.मी तुला किती आणि काय काय बोलले.
आई तू सोनल ला का बोललीस..तिची काय चूक?
प्रवीण अरे मी तिचे संक्रांती चे फोटो बघितले काळ्या साडी तले..मला वाटले की या काळ्या साडी मुळेच तुला काही झाले असेल..तू संकटात असशिल..हा अपशकुन त्या साडी मुळे झाला अस खूप बोलले मी सोनल ला.सोनल मला माफ कर.
आई अहो. माफी नका मागू..पण हे शकुन अपशकुन काही ही नसते ओ..माझ्या वहिनी ने खूप आग्रह केला म्हणून मी काळी साडी नेसली पण फोटो टाकताना मी विसरले की तुम्ही ही फोटो बघणार.
असू दे सोनल..आज तू हा माझं भ्रम मोडून काढलास.खरच काळा रंग अशुभ अस काही नसते.सगळ्या योगा योगाच्या गोष्टी असतात.
सोनल मग आई कडे बघून हसली.
प्रवीण ही खुश झाला आजच्या या प्रसंगाने आई चे मत परिवर्तन झाले होते.
