Shobha Wagle

Fantasy Inspirational

2  

Shobha Wagle

Fantasy Inspirational

काळ स्वछंदी

काळ स्वछंदी

2 mins
66


चित्र पाहुनी आठवला

माझा काळ बालपणचा

किती मस्त काळ स्वछंदी

होता छान लहानपणाचा


बालपणाचा काळ सुखाचा. किती मस्त होते ते दिवस! शाळा गृहपाठ पटापटा करून आम्ही सगळी मुले खाडीच्या बाजूला असलेल्या पटांगणात खेळत होतो.

मुलागा मुलगी भेदभाव नव्हता. सर्व लहान मोठी एकत्र मिळून मिसळून खेळत होतो.

खेळताना मध्ये तहान लागली तर जवळ असलेल्या घरात जाऊन पाणी पीत होतो. तेव्हा तिकडच्या आजी कधी कधी लेमलेटची गोळी अथवा गरमा गरम चकली ही द्यायची बालपणी खाल्लेल्या चकलीच चव आता ही तोंडी आली.

सर्वांच्या आया आजी आमच्याच वाटायच्या. कधी कधी आवाजा करता ओरडायच्या तर प्रेम ही तेवढंच करायच्या.

नियमित दोन तासांवरी वेगवेगळे खेळ खेळत होतो. पकडापकडी, लगोरी ,विटीदांडू, वडाच्या पारंब्या पकडून एकमेकांना झोके देत होतो.

रिंगा रिंगा रोजीस, किती किती धम्माल केली होती. मुलासारखे खाडीत पोहत ही होतो. ते फक्त रविवारी सुट्टीच्या दिवशी.

खाडीत जेथे मासे पकडले जायचे त्याला *मानस*म्हणायचे . कोळी लोक माशाकरता जाळे लावताना व संध्याकाळी जाळे काढताना ते बघताना खूप मजा वाटायची. जाळ्यातले वेगवेगळे प्रकारातले मासे आणि त्याची ती तडफड बघून मासे का खातो? हा मोठा प्रश्न मला पडायचा. "नको नको त्यांना पकडायला"

"सोडा,सोडा त्यांना पाण्यात", असे सांगयचे विचार यायचे पण गावातले बरेच लोक ते ताजे मासे घेऊन जायचे. त्यात माझे बाबा तर कधी काका ही असायचे.

भातुकली खेळाची तर मजा विचारायलाच नको. बाहुला बाहुलीचे लग्न प्रत्येकाने आपल्या घरून खाऊचा जिन्नस आणायचा. नवरा नवरीला सजवणे, फुलांचे मण्याचे दागिने घालणे मोठ्या सारखे मंगळाष्टक म्हणणे व नंतर

लग्न लावल्यावर सगळ्याचा खाऊ एकत्र करून केळीच्या पानावर जेवण उरकणे. नाचत गात नवरा नवरीची वरात काढणे. आता नुसते आठवले तरी ती दृष्ये डोळ्या समोर येतात व अजून ही मी त्या बालपणात रमून जाते.


रम्य होते ते बालपण

ना चिंता ना विवंचन

स्वछंदी होते ते जगणे

होते आनंदी वातावरण.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy