काही मनातले भाग - १
काही मनातले भाग - १
रोज रात्री ती भयाण अंधाऱ्या भविष्याकडे पाहत राहायची, नेहमी तिला वाटतं राहायचं प्रेम कसं असावं ? "बेभान आणि निरपेक्ष "! अन बेभान होऊन ज्याच्यासाठी तिने सर्वस्व पणाला लावलं, स्वतःचा अभिमान, आत्मसन्मान! पण, आता सारं काही संपलं होत! सिगारेट चा धूर तोंडातून काढून ती एकटक खिडकी बाहेर स्वतःच अस्तित्व पुन्हा नव्याने शोधायचं की नाही याचा विचार करत होती. जणू, तिच्या मनात विचारांचं थैमान चालू होत. तिच्या टपोऱ्या डोळ्यात ना कोणाबद्दल घृणा होती ना राग ना अश्रू ! जणू काही ती धगधगत्या अग्निदिव्यातून बाहेर पडली होती. तिच्या एकतर्फी प्रेमाची राख सिगारेटच्या धुरासोबत उडत चालली होती...जणू, तिला पुन्हा नव्याने उभं राहायचं होत, स्वतःसाठी, तिच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या तिच्या आईवडिलांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी. कारण, आयुष्य अन प्रेम कोणासाठी थांबत नाही ते नदीच्या प्रवाहासारखं वाहत राहत! प्रेम, घृणा, राग, दुःख अगदी साऱ्यांना सामावून ते पुढे निघून जातं. जे प्रेमाची भाषा जाणतात ते तरून जातात अन ज्यांना ही भाषा अवगतच नाही अश्यांना दूर भिरकावून पुढे निघून जातं...पुढच्या प्रवासाला...अनंताच्या...नव्या प्रेमाच्या शोधात...स्वः च्या शोधात...