जॉय ऑफ़ गिव्हींग©®
जॉय ऑफ़ गिव्हींग©®
'ती' भावनिक गुंता जपणारी आणि तो प्रॅक्टिकली जे समोर आलं त्याचं स्वागत करत जगणारा! असे असले तरी दोघेही जमतील तसे संसारात एकमेकांना खूप जपत आणि स्वत:पेक्षा जोडीदाराच्या इच्छेने कसे सगळे पार पडेल याचा विचार करुन वागत असत!
त्याच्या वाढदिवसाला त्याने सुट्टी घेतली तर त्याच्या आवडीच्या गोष्टी ठरवून करता येतील असे मनात आलेले सांगण्याआधीच त्याने मला, अचानक टूरला जावे लागेल सांगितले. ती थोडी हिरमुसली तरी वाढदिवसाला घेतलेल्या शर्टच्या खिशात पत्र, पँटच्या घडीत ग्रिटींग कार्ड गुपचूप तिने बॅगेत ठेवले. त्याच्यासोबत जात असलेल्या त्याच्या टीममेटला फुले आणि मिठाई त्याला घेवून देण्याची व्यवस्था केली.
ऑफिसमुळे सोबत नसलो तरी आपला वाढदिवस साजरा करण्याची बायकोची धडपड पाहून तो मनोमन खूपच सुखावला!

