जो डी
जो डी
जो आणि डी दोघे जोडीने फिरायचे. अगदी सकाळच्या चहा पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं एकत्र. पाहणाऱ्यांना त्यांचा हेवा, मत्सरच वाटायचा. शेजारचे-पाजारचे तर यांच्याबद्दल निव्वळ गॉसिप करायचे. पण फक्त जो आणि डी ला माहिती असायचं की 24 तास हे असं एकत्र राहण्याचं, प्रेम करण्याचं आणि खोटं वागण्याचं कारण काय आहे? रियालिटी शो चा शेवटचा राऊंड जिंकून फायनल 10 जोडयांपैकी त्यांनाही रक जोडी व्हायचं होतं. आणि म्हणूनच त्यांच्या शरीरावर जोडलेल्या कॅमेरापासून त्यांची तोपर्यंत सुटका नव्हती. आणि पाहणाऱ्यांना मात्र त्यांच्यात अमाप प्रेम,विश्वास, काळजी आणि तितकीच नात्याची जपणूक दिसायची...