नागपंचमी
नागपंचमी


मुस्की मुस्की कुठे आहेस? दूध आणलय बघ तुझ्यासाठी अना स्वतःशीच पुटपुटली... ओ बाबा तुम्ही मुस्कीला मगाशी का हाकललत? बिचारी माझी मुस्की... बिचारी वगरे काही नाही हा, आणि तुला आमचा नाही पण तिचा भारीच पुळका आहे आई असं म्हंटल्यावर अना खुप चिडली. तुला, मला खायला मिळतंय गं... जनावरांचे खूप हाल होत आहेत... त्यावर आईचा रिप्लाय तयारच होता, आपण काय अन्नछत्र उघडलं नाहीये... आणि कुत्र्या मांजरांना खायला घालण्यासाठी मी पोळ्या करायच्या का? हाच प्रश्न उद्या त्यांनी आपल्याला विचारला नाही म्हणजे मिळवलं अना पुटपुटली पण आईला गेलंच. हो का? फार तत्वज्ञानी झाला आहात आपण? घरातली कामं कर जरा सारखी त्या मांजरामागे नाहीतर मागचं अंगण आहेच. अना यावर खुद्कन हसली आणि मनातल्या मनात म्हंटली तुला कुठे माहितीये कोणाला भेटतो? गोब्या सापाला भेटताना मला आणि मुस्कीला जर यांनी पाहिलं तर आमचीही नागपंचमीला पूजा करतील.... या विचारांनी अना मोठमोठ्याने हसायला लागली.. आणि आई अजूनच चिडली....