द्वितीया
द्वितीया
डियर डायरी,
एम.बी.ए ला होते तेव्हा रोज आपली भेट व्हायची. आणि मग मी जरा मोठी झाले. सो कॉल्ड करियरच्या स्पर्धेत पळायला लागले. पैसे मिळवणं, मग ते मिळाल्यावर कामाचं समाधान शोधणं यातच 27 वर्ष निघून गेली. कोरोनाच्या निमित्ताने ती जीवघेणी स्पर्धाही जरा अराम करतेय असं वाटतं आहे. मग अशा वेळेला मी काय करू? एक लेखिका म्हणून मी लिहितच नाही काही. किंवा लिहायला घाबरते. माझं लिखाण चुकलं तर? कोणालाच आवडलं नाही तर? मग ते कसं लिहायचं? डोक्यात प्लॉटस खूप आहेत पण डेव्हलप करायचं म्हणजे वेळच मिळत नाही. असे अनेक बहाणे तिचा मेंदू द्यायला लागला. बघू या मेंदूला कधी इच्छा होते लिहिण्याची....
तुझीच
अना...