टाईम मशीन
टाईम मशीन


ती आणि तो 90च्या काळातले. आत्ताच्या जमान्यात अगदीच ओल्ड फॅशन. त्यांचे कपडे, रहाणं, फिरणं सगळंच मेलोड्रामॅटिक. स्वप्नाळू, मनोहर, फुलपाखरा सारखं नाजूक. सगळ्यांच्या प्रेमात हे नाजूकपण असतं पण यांच्या जरा जास्तच होतं. मोबाईल, इंटरनेट, व्हिडीओ कॉलच्या जमान्यात हे दोघे फक्त पत्रव्यवहारच करायचे आणि फोन कामापुरता वापरून जमेल तसं, जमेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवायचे. असं हे इतरांच्या मते एकसुरी, कंटाळवाणं वाटणार त्यांचं आयुष्य एका गोष्टीमुळे खूप बदलून जाणार होतं. मोबाईल, कम्प्युटर चं हे युग त्यांना हे काळासोबत गिळून टाकणार होतं. अजिबातच टेक्नॉलॉजीच्या आहारी न गेलेल्या या जोडप्याला म्युझियममध्ये ठेवायचं असा फतवा निघाला. पण ते दोघं याला विरोध करू शकले नाहीत. आणि त्यांना म्युझियममध्ये शिफ्ट व्हावं लागलं.
पण तिथे जाऊनही त्यांच्यातलं प्रेम काही संपलं नाही... उलट २३ व्या शतकातही ते जतन करून ठेवलं गेलं. प्रेम कसं असतं हे तंत्राने अतिप्रगत झालेल्या पण भावनांनी कोरड्या झालेल्या मानवासाठी...