Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Chaitali Ganu

Fantasy


3.8  

Chaitali Ganu

Fantasy


मिशन नेक्स्ट

मिशन नेक्स्ट

2 mins 143 2 mins 143

नव्या नोकरीचा त्याचा आज 3 राच दिवस होता. इतर देशातून होणाऱ्या स्पेस टेस्टिंग्जचा आढावा घेऊन रीसर्च टीमला सांगणं. हे त्याचं मुख्य काम होतं. पण त्याचा छंद काही वेगळाच होता. त्याच्या वैज्ञानिक डोक्याला एका वेगळ्याच गोष्टीचा शोध घ्यायचा होता. आणि त्याचसाठी त्याने ही स्पेस रिसर्च कंपनी जॉईन केली होती.आणि पगारही चांगला होता. तसंही त्याच्या आई बाबांनी जमेल तसं आणि तितकं त्याला शिकवलं होतं. आता त्याला जे करायचं होतं ते नोकरी सांभाळून. 


हे सगळे विचार त्याच्या डोक्यात घोळत असताना. स्पेस रिसर्च सिस्टीमचा अलार्म वाजला. हा अलार्म म्हणजे स्पेस रडार वर कोणत्या तरी वेगळ्याच, माहिती नसलेल्या यानाचा त्यांच्या परिघात प्रवेश झाला असं होतं. आजपर्यंत अशा यानाचा प्रवेश त्यांच्या ग्रहावर एकदाच झाला होता.त्याला आठवत होतं त्यानुसार ते यान पृथ्वीवरून आलं होतं. आणि त्यावेळेस तो खूप लहान होता. पण त्याच्या आजोबांनी त्याला एलियनबद्दल सांगितलेली ही गोष्ट त्याच्या चांगलीच लक्षता होती. कसे ते पृथ्वी10 वरून आलेले एलियन्स त्यांच्या पृथ्वीवर चुकून आले. आणि पृथ्वी55 वरून त्यांना पृथ्वी 10 वर पोहोचवण्यासाठी त्याच्या ग्रहावरच्या इतर ग्रेनेजनी (पृथ्वी 55 वरचे रहिवासी)बरीच मदत केली होती. ज्यात त्याचे आजोबा ही होते.ती गोष्ट ऐकल्यापासून त्याच्या मनात स्पेस,ग्रह,तारे याबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. आणि आत्ता हे यान? 


आपल्या आजोबांनी जसं त्या एलियन्सना मदत केली तसं आपणही त्यांना त्यांच्या ग्रहावर परत जायला मदत करायची असं त्याने पक्क ठरवलं. तितक्यात त्याच्या बॉसचा त्याला मन लहरींद्वारे मेसेज आला. तो लगेच त्याच्या बॉसच्या केबीन मध्ये गेला. तर तिथे 3 एलियन्स आधीच हजर होते. त्यांना पाहून हा भलताच खुश झाला. त्याच्या बॉस ने त्याची ओळख त्या 3 एलियन्ससोबत करून दिली. आणि त्याला आदेश दिला की या एलियन्स सोबत त्याला काम करायचंय. आणि ते जसं वागतात, बोलतात,खातात ते सगळं शिकून घ्यायचं.पण का?त्याच्या मनात प्रश्न आला. तो एलियन 1 ने ओळखला.तो त्याच्या जवळ गेला आणि हसला. आणि म्हंटला की,तितक्यात अलार्म वाजला आणि अनय जागा झाला. आज स्कुल बस मधून जाताना ही स्टोरी सगळ्यांना एकदम रंगवून सांगायची हे ठरवून पटकन तो स्कूलसाठी रेडी व्हायला लागला.


Rate this content
Log in

More marathi story from Chaitali Ganu

Similar marathi story from Fantasy