ज्ञान
ज्ञान
गणित या विषयात मेघा चा हातखंडा होता अगदी लहानपणापासूनच तिला गणित विषय खूप आवडायचा. दहावी बारावी मध्ये मेघाने गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले होते... ती आजूबाजूच्या मुलांना एकत्रित करून त्यांचा गणिताचा क्लास घ्यायची आवड म्हणून..कोणतीही फी न आकारता तिने मुलांचा क्लास घेतला व मुलंही गणितात पारंगत झाली.. ज्ञान दिल्याने वाढतं हे मेघा ला कळलं होतं...
