Sheshrao Yelekar

Drama

2.0  

Sheshrao Yelekar

Drama

जीवन एक कला आहे

जीवन एक कला आहे

2 mins
9.7K


जीवन एक कला

आहे मनाची प्रेरणा

कर्म सातत्याने

पुर्ण होते साधना

जीवन म्हणजे कला. कारण प्रत्येक माणसात एक वेगळेपण असते. त्या वेगळेपणाला त्याची अद्भुत कला असते. समाजात आपल्याला गरीबीतून उठलेले व्यक्तींचे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. पण त्याविषयी अधिक विचार न करता नशीबाचा खेळ म्हणून आपण बहुतांश वेळा कानाडोळा करतो.

माझ्या माहितीतील मी असे काही उदाहरणे सांगू शकतो की ज्यांच्या व वडिलोपार्जित फुटकी दाम दवडी नसताना किंवा कुठलाही व्यवसाय न करता आपल्या अल्प खाजगी संस्थाकडून मिळणाऱ्या पगारावर आज सुखी जीवन व्यापन करत आहेत. सद्य स्थितीत पैसा, बँक बॅलन्स ठिक ठाक आहे.

यशाचं शिखर गाठण्यासाठी यांनी काय केलं, वडिलांकडून मिळालेला धन नव्हता, चांगली सरकारी नोकरी नव्हती किंवा व्यवसायसुद्धा नव्हता. पण यांच्याकडे काहीतरी वेगळं होतं की त्यानं त्यांना जगणं शिकवलं.

आणि ती होती जीवन कला.

यांच बाह्य मनाला एवढं माहीत होतं की मी गरीबाचा मुलगा आहे, पण आंतर मन जाणून होता की आपल्या जवळ काम आहे आणि या पैशातून घरग्रहस्ती बरोबर मुलांचे भविष्य साकार करायचं आहे आणि डोक्यात एकच गोष्ट होती कमवलेली बचत होईल किती, यात कंजूसपणा नव्हता परिवाराच्या गरजा विचारात घेत, वायफळ खर्चाला दोन हात दूर राहतं साधं सरळ जीवन जगले.

यांची जीवन कला ही होती. कमवावं कसं आणि वाचवावं कसंबसं आणि बसं त्यांच्या आंतर मनाला या व्यतिरिक्त काही माहित नव्हते, बाह्य मन व्यवहारात असला तरी आंतरमन जीवनशैलीला कलात्मक वळण देत होता.

आंतरमनाला भविष्याची जाणीव झाली असता भविष्य कसं साकार होणार नाही.

कला म्हणजे टाळ मृदंग वाजवणे नसून, व्यक्तीचा सृजणात्मक ज्ञान विकसित होणं होय.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama