झोपडी
झोपडी


कुळ्याच्या चार भिंती व कवलेरु छप्पर म्या, सहा वर्षाचा रामु, चार वर्षांचा दिनु व दोन वर्षाची मायी छकुली सुलभी व त्यायची माय येवढी मोठी मायवाली झोपडी.
प्रेमाधार जिचं आधार जिच्या चुल्ह्यावर चटणी भाकरीची रोज मेजवानी शिजते. थोड्याशा पावसात बायकोच्या कटकटी बरोबर अंगणात पोरांची किलबिल नांदते.
जिथं कुळ्याच्या भिंतीवर शासकीय मोहर नाही, राजकीय वातावरणाचा अजीबात ताप नाही.जिचं छप्पर सर्व संकटांना तत्पर असून ती आक्षा अपेक्षा विरहीत आहे.अशा झोपडीत माया संसार नेटका आहे.
सुख व दुःख सोडून मायी झोपडी सर्व ऊन पाऊस झेलून आहे. व्यवहाराचा गंध सोडून घामाचा सुगंध जाणून आहे.
पैसापेक्षा जिव्हाळाची नातं मोठं, प्रेमाच्या मोठमोठ्या खांबावर मायी झोपडी उभी आहे. भाकरीसाठी मरणं,झगडणं ह्याचं कंपन झोपडीच्या आत आहे.
बायकोच्या चेहऱ्यावरील हसु व पोरांची किलबिल हीच झोपडीची शान आहे.
माया झोपडीले अर्ध पोटी राहून सुखाने झोपण्याच दुरव्यसन असुन अंधारात अधिक चमकण्याची सवय आहे.अशी मायी झोपडी बहूरंगी तोऱ्यात उभी आहे.