दैव
दैव
राम आणि श्याम एका साधारण घरातील दोन भाऊ दोघांची परिस्थिती साधारण होती.
दोन्ही भावांना पैसै कमवून मोठं व्हायचं होतं दोघांनाही दैव व कर्म यावर कमी जास्त विश्वास होता.
राम मोठा होता तो धार्मिक होता रोज सकाळी उठून अंघोळ झाल्यावर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा व स्वतः साठी सुख संपत्ती मांगायचा.
श्याम लहान असून मेहनत करायचा सकाळी उठून कामावर जायाचा आणि पैसे कमवून आणायचा
राम आणि श्याम दोघेही मेहनती होते परंतु राम दैववादी होता कमविलेला पैसा तो या नाही तर त्या मार्गाने खर्च करून टाकायचा.
श्याम स्वतः च्या मेहनतीचा पैसा वाचवायचा एवढं समजा की मी अधिक कमविन कसा व कमवलेला पैसा वाचविन कसा या विचारात तो असायचा.
वेळ निघत गेली थोड्या थोड्या बचतीतून श्याम जवळ घर व गाडी आली.तर रामच्या बचत न करण्याच्या स्वभावामुळे तो अगोदर होता तसाच आजही होता.
परंतु दोन्ही भावात एक गोष्ट सारखी होती काही होवो खाऊन पिऊन खुश राहायचं
शेषराव येळेकर
दि.१४/१०/२५
